पावसा तू पुरुषच आहेस
होरपळत राहतोस वर्षभर,
समुद्राच्या कुशीतून उठून उंच उंच आकाशात उडतोस
वर्षभर दिसत नाहीस तरी ठाऊक आहे मला,
कुठेतरी एकांती ढसा ढसा रडतोस..
तुझ्या मनात कढ दाटून येतात कित्येकदा,
मात्र प्रत्येकदा तू ढासळत नाहीस
काळवंडतोस, ताड ताड कडाडत राहतोस,
पण तरीही नेहमीच कोसळत नाहीस
जग सगळेच किती खारट आहे,
पण त्यातून केवळ गोडवा वेचून तू तुझ्या प्रियजनांस देत राहतोस.
अन तरीही कधी ऊणा राहीलास म्हणून तर कधी अधिक वाहीलास यास्तव
त्यांच्याच दुषणांनी स्वत:स हिणवून घेत राहतोस.
तू पडतोस अन धरती फुलून येते,
म्हणून स्वत:चा थेंब अन थेंब संपेतो पडत राहतोस, थकत नाहीस..
पण कितीही प्रेमाने समरसून झिरपलास ना गड्या,
तरीही या तुझ्या स्त्रीच्या गाभ्यापर्यंत तू कधीच पोचू शकत नाहीस
पुरूष रे तू पुरुषच..!!