हा ब्लॉग शोधा

कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ एप्रिल, २०२३

चेरापुंजी


डोंगरमाथ्यांवर उतरलेले ढग सोडून जातात आपल्या आठवणींचा थोडा ओलावा तिथेच
काही मन जडलेले आणि जडावलेले मात्र 
थोडे अधिकच ढासळतात
आणि अगदी विरून जाईपर्यंत ओघळत राहतात त्यांच्या मार्गभर..
जमीन रुक्ष दिसत असली तरी या साल हरसालाच्या विरहाने
तिलाही फुटतात उमाळे
तिच्याही अंगभर उठतात हिरवे शहारे
तीही वाहत राहते अखंडपणे 
एक तालबद्ध प्रेमगीत गुणगुणत.
कधी अंगाखांद्यावरून अन कधी ओटीपोटातून 
लपंडाव खेळत राहतो तिच्या सगळ्या ओलसर भावनांचा प्रवाह..
खोल खोल हिरव्यानिळ्या डोहांत कोसळत राहतात तिच्या गीतातील
हाय फ्रिक्वेन्सीचे अवखळ सूर
आणि मग पुढे हळव्या अलवार तरंगांची वलये 
चौफेर पसरत जातात अनंतापर्यंत.
कानांनी नाही तर डोळ्यांनी ऐकायचे असते हे गाणे आपण
अन पाय बुडवून बसायचे असते तासनतास त्यात.
तो एकेक खळखळता आलाप त्वचेतून आपल्या रंध्रारंध्रात शोषून असतो घ्यायचा
अन स्वतःस सदेह त्यात पूर्ण झोकून दिले तर....
तर मात्र त्या स्पर्शित शीत नीलवर्णी कंपनाचा साज 
घेऊन जातो आपल्याला कुठल्याश्या वार्महोल मधून वेगळ्याच एका अजाण अनावृत्त मितीत,
थेट निर्मितीच्याच निर्मितीपर्यंत..!!
तिथे आपल्या तमाम जाणिवांच्या खुणांचा अनाहत नाद मिसळून जातो कोण्या अनादी कृष्णविवरात 
आणि आपल्या अस्तित्वाच्या इव्हेंट होरायजनवर दाटून राहतो फक्त एक प्रचंड तेजस्वी शुभ्र प्रकाश..
हीच समाधी, हेच सॅल्वेशन, हाच मोक्ष 





....

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

आजकल कुछ लिख नही रहा


आजकल कुछ लिख नही रहा
आजकल कुछ ठीक नही रहा

हर जुल्मपे आवाज उठानेवाला
आजकल कुछ चीख नही रहा

आँखों में कितने अक्स थे तेरे
आजकल कुछ दिख नही रहा

क्या देश पूरा नीलाम हो गया?
आजकल कुछ बिक नही रहा

हर चीज संजोए रखी थी कभी
आजकल कुछ टिक नही रहा

उम्रभर एक नाम के क़सीदे पढ़े
आजकल कुछ सीख नही रहा

वो याद नहीं करती, अत: राहुल
आजकल कुछ छींक नही रहा



..

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

तख़ल्लुस


इक इतने से तख़ल्लुस का, कितना बडा बोझ था
सुकून बस इक पल का, और दर्द कईं रोज था

कुछ अनकही दास्तानों में ही खोया रहा उम्रभर
न बना किसी का साहीर, ना मै कोई इमरोज था

तुम थे मेरे ग़म और ख़ुशी दोनों का ही ज़रिया
मरहम था तेरा पास आना, दूर जाना सोज़ था

दुनिया से ताउम्र लड़ता ही रहा हूँ अपनी जंगें
कभी था अकेला सिपाही, कभी मै पूरी फौज था

जिंदगी के तजुर्बे ने सिखाया कि मेरी कहानी में
हक़ीक़त थी गंगू तेली, पर ख्वाब राजा भोज था

सरहदें तोड़नी चाहीं मगर अपने दायरे में ही रहा
मै किनारे से टकराकर, मिट जानेवाली मौज था

राहुल तेरी क़ीमत इस दुनिया में होगी ही कितनी
तू किसी से था खोया, और किसी की खोज था






*तखल्लूस-शायरीतले नाव
*ज़रिया-Source
*सोज़-दुःख


रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

बयालीस

 

उद्याकडे जाताना उगा, कालच्या आठवणींनी मागे ओढू नये
वाढदिवसाच्या शुभेच्छांतही कोणी, जुने उल्लेख जोडू नये

कशापाठी अजूनही जीवापाड धावतो आहे तेच कळत नाही
वाटते थांबावे सगळे; ज्ञान, अनुभव, वय, काहीकाही वाढू नये
 
पुरे झाल्या उन्हाच्या झळा, पुरे उजेडासाठी जळणे जाळणे
बसावे कवटाळून आपला अंधार, आता सकाळ उजाडू नये 

सुबह भुल भी जाएं रास्ता गर तो, शाम होते घर ही लौट चलेंगे  
आता कोणत्याही नाविन्याची, अनोळखी सीमा ओलांडू नये 

अंतर्मनाच्या अनाहत नादात, मिसळू नयेत हळवे वेदनेचे सूर
गावी फक्त किशोरची गाणी, नाजुकशी तलतची धून छेडू नये  

ठेवावी मूठ अगदी घट्ट झाकून, सव्वा लाख दुखऱ्या गुपितांची
कैफीयत आपल्या व्यथांची, जिवलगांच्याही पुढ्यात मांडू नये 

Dont ignore the simplest, dont seek only the best
ऐकत रहावा मनसोक्त गुलजार, अन समीरलाही मोडीत काढू नये 

नको भूतकाळाची फार दुरुस्ती, नको भविष्याचे अति व्यवस्थापन 
स्वीकाराव्यात त्रुटी आपल्या, केल्या चुकाही आवर्जून खोडू नये

जितने मिलें हैं वफा ओ दर्द ओ सितम, काफी है इक उम्र के लिये
आता कुणीही मनाला आपल्या, नव्याने आवडू वा नावडू नये 

स्थिर व्हावे, स्थावर रहावे, खोल झाल्यावर खळखळाट करू नये 
आता शहाणा हो राहुल, बेचाळीशीत तरी पोरकट दळण कांडू नये



..

सोमवार, २१ मार्च, २०२२

कविता - जागतिक कविता दिन

 

उगीच वाटते की आपणांस कळते कविता
आपलीच आपल्याला किती छळते कविता

बागडत राहते कधी उनाड पोरासारखी गावभर
कधी अव्यक्ताच्या पिंजऱ्यात व्याकुळते कविता

शब्दांच्या अमिषालाही फसत नाही कैकदा
कुणास ठाऊक का मला अशी वगळते कविता

आनंदाचा चेहरा होते, कधी सुखाचा कल्लोळ
स्वप्नांचे किती पुष्पहार गळा माळते कविता

माझ्या हाकांना देत नाही प्रतिसाद अनेकदा
तुझ्या आवाजास मात्र नेहमी भाळते कविता

वार फुलांचेही सहन होत नाहीत तिजला
अनावधाने जखम होऊन भळभळते कविता

मनाच्या अगदी खोल आत ठेवतो दडवून
तरी व्यथेतून थेंब थेंब ओघळते कविता

किती मोहक होतो तुझ्या माझ्यातला दुरावा
आपल्यातल्या अंतरात जेव्हा मिसळते कविता

दुःखाचे सरपण लपवून ठेवतो मी तिजपासून
अन्यथा अंतर्बाह्य मला खाक जाळते कविता

तू सोडून अन्य विषय नाही तिला बोलायला
पण नाव मात्र तुझे कटाक्षाने टाळते कविता

माझ्या हातांतून स्त्रवत नाही कागदावर कधी
तुला पाहताना नजरेतून जी निथळते कविता





..








शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

41

काळासोबत कधी अगदी उर फाटेस्तोवर पळलो
कधी अनंतासाठी कोण्या एकाच क्षणात रेंगाळलो
मीच कुठे माझा मलाही आहे पुरेसा अद्याप कळलो

डोळ्यांपेक्षा दुनियेस या मनानेच अधिक पाहीले
सुन्न प्रतिसादही संवेदनांनी खोलवर जाणवत राहीले
कोरड्या ओल्या दोन्ही भावनांनी सारखेच हळहळलो

कधी आभाळाला मारली घट्ट बिलगती मिठी
कधी मातीच्या इवल्या कणावर वाहीली दिठी
कधी उगवलो मध्यरात्री, कधी मध्यान्ही मावळलो

ठेवले रितेच कित्येकदा चांगुलपणाचे रकाने
कितीदा सद्गुणांची अन बसलो मांडून दुकाने
कधी ठाम राहीलो सत्याशी, कधी सहज ढळलो

भरले कुणी दोन डोळ्यांत विश्वाएवढे दाटून
कुणी झाले बारमाही पाऊस, कुणी गेले आटून
लपवले कुणास मनात अन कुणावर खुलेआम भाळलो

गाठली स्नेहसोबतीने कधी आनंदाची निळीभोर शिखरे
कधी एकांती कारेत कोंडली स्वप्नांची स्वच्छंद पाखरे
कधी गोठलो स्पर्शून कुणा, कधी फक्त आठवून वितळलो

सत्कर्मासाठी कधी लागलो मी संकटांच्या कच्छपि
कैकदा फक्त सापडलो नाही म्हणून ठरलो नाही पापी
गुन्ह्यांचा केला माज, कधी भलेपणातही ओशाळलो

शिरलो कधी अज्ञाताच्या व्योमी खुशाल शड्डू ठोकून
तर कधी परिचितांच्या गर्दीतही राहीलो जरा संकोचून
लगडलो सुखाच्या वेलीस कधी, कधी अश्रूंतून ओघळलो

राहीलो कधी लाचार होऊन नि शोषणास झालो राजी
हुकुमाचा एक्का बनून अन कधी मारली हरेक बाजी
लढलो कधी प्राणपणाने, कधी बिनविरोध ढासळलो
मीच कुठे माझा मलाही आहे पुरेसा अद्याप कळलो



..

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

लाईक करणार नाही

तुझा नवा डीपी आवडला पण लाईक करणार नाही
आंतरीक सुखाला मी असे सामाईक करणार नाही

होऊ दे खुशाल हल्ला मनोभूमीवर तुझ्या कटाक्षांचा
मी तरीही प्रतिक्रियेचा सर्जिकल स्ट्राईक करणार नाही

वाढले जरी कितीही माझ्या ह्रदयाचे ठोके तुला पाहून
मी झूम मीटमध्ये म्यूट माझा माईक करणार नाही

तेव्हा धुंद आवेगात करून बसलो किती पोरकटपणा
आता वेड्या मनास मी अजून तऱ्हेवाईक करणार नाही

सगळीकडे बाजार आहे भरला देवाणघेवाणीचा तरीही
मी मनास तुझ्या अपार ओढीचे गिऱ्हाईक करणार नाही

वाहत राहील ओझे अगतिकतेच्या पखालींचे असेच सदा
अलवार भावनांना मी तुझ्या वेदनेचा पाईक करणार नाही

तुझा नवा डीपी आवडला पण लाईक करणार नाही
वैयक्तिक सुखाला मी असे सामाईक करणार नाही


..

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

अनुठा हुआ है

सदियों से एक ख्वाब आँखों में टुटा हुआ है
आ भी जाओ कि अब के सावन रुठा हुआ है

उपरी मुस्कान की दौलत पे न जाना दोस्तों
मुझे अंदर से किसीने पुरी तरह लूटा हुआ है

तुमने लबों से छुए थे जिस नज्म के चंद लफ्ज
उसके मिसरे ने कहा कि एक शेर जुठा हुआ है

कभी सोचा नही था की हम इतना सोचेंगे तुम्हें
ये एहसास नया है, इस बार कुछ अनुठा हुआ है

तुम सुकुन की बरसात बनकर यहाँ आ जाओ
मुझमें जज्बातों का लावा कबसे फुटा हुआ है

ये कैसा वक्त है कि इमाँ के मानी ही बदल चुकें
मैने जो सच कहा था वो भी अब झुठा हुआ है

तुम अपने नाम की ठंडी महक सांँसों में दे जाना
इस गुमनामी से मेरे वजूद का दम घुटा हुआ है

मै उजालों के बोझ लिये धूप धूप जलता रहा
और वो कहता है कि राहुल और कलुटा हुआ है



..

गुरुवार, २९ जुलै, २०२१

आवाज चांदण्यांचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
ही रात्र निजायाची, हे स्वप्न जागण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
ही अट मुकेपणाची, हे गुज सांगण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा ठराव थांबायचा, हे संकेत वाहण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा ऋतू सावरण्याचा, हे वय पांगण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा उमाळा तुटणारा, हे श्वास बांधण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा इशारा सलगीचा, हे बहाणे लाजण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा हुंदका फुटणारा, हे कढ थांबण्याचे

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, 
हा जोगवा दयेचा, हे शाप भोगण्याचे



..

सोमवार, १२ जुलै, २०२१

चलो इक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनों

क्या इक बार फिरसे अजनबी बन गएँ हैं हम दोनों
बिन कुछ कहे ही शर्त ए जुदाई मान गएँ हैं हम दोनों

न चैन है जरा हमको, और न तुमको थोडा भी करार है
क्यूँ यूँ सुलगती आग में जलने पे ठन गएँ हैं हम दोनों

कोई शिकवा नही रखा, कोई गीला भी नही किया
कैसी रंजीदगी है कि बिना रुठे ही मन गएँ हैं हम दोनों

बेखुदी में सोचते रहें की उलझ रही हैं दो रुहें, जब कि
आसानी से सुलझ गया जो रिश्ता बुन गएँ हैं हम दोनों

कितना कुछ कहना है आपसे मगर कह नही पातें हैं
ऐसी खामोशी है कि जैसे हो बेजुबान गएँ हैं हम दोनों

जिंदगीभर हमें आप के साथ चलना था मेरे हमसफर
पता ही न चला कब अलग राहें चुन गएँ हैं हम दोनों



..

मंगळवार, ६ जुलै, २०२१

दीप्ती और उर्मिला

आपकी नई तसवीर नही है पास मेरे
और आपने कोई डीपी भी नही लगाई है
कितने रोज हुए खामोशी में बहते हुए
चॅटबॉक्स में इक अजीब सी तनहाई है

कितनी मायूसी से बीत गया वो स्टेटस
आपकी नजर से जो नजर मिला न पाया
फूट फूट रोई वो हर नज्म मेरे सामने
जिसे मै आपकी आवाज दिला न पाया

अपनी वोही पोस्ट हमें अच्छी लगती है
जिसे आपके लाईक का तोहफा मिले
जितनी बार नोटीफिकेशन में आपका नाम हो
लगता है हम आपसे उतनी दफा मिले

बातचित नही करनी तो ना सही
खैरियत पुछने का सिलसिला तो रहे
आप नहीं तो मेरे स्टेटस में आपके मानिंद
कभी दीप्ती और कभी उर्मिला तो रहें



..

शुक्रवार, २८ मे, २०२१

जरासी बात

जरासी बात पर भी अक्सर भर आने लगे हैं
अश्क तेज़ाब बनकर दिल को जलाने लगे हैं

वो भी दौर था के अपनापन था रिश्तों में
अब तो लोग बस फर्ज़ निभाने लगे हैं

हमसफर थे जो जिंदगी के इस कारवाँ के
वो शक्स सफर अधूरा छोड कर जाने लगे हैं

युंँ तो पोंछ दिये थे हाथों से कईं दफा मगर
ज़ख्म फिरसे आँखो में आने लगे हैं 

जिंदादिल तो तब थे जब जेबें खाली थी
जरूरतों ने मार दिया, जबसे कमाने लगे हैं

जिनसे बदतमीजी ही तमीज हुआ करती थी
वो दोस्त आजकल तहजीब सिखाने लगे हैं

छोड आता हूंँ हर रोज गांव की सरहद पर
दर्द बिल्ली की तरह फिर लौट आने लगे हैं

खुशियों का कारोबार थम सा गया है और
अब हम अपने दुःख पे भी लाइक्स पाने लगे हैं

*ये कहना था उन से मोहब्बत है मुझ को
ये कहने में मुझ को ज़माने लगे हैं

अपने ही दिल पर और सितम ढाने लगे हैं
इश्क के मज़लुम फिर इश्क लडाने लगे हैं



..
*हा शेर जनाब ख़ुमार बाराबंकवी यांचा आहे

बुधवार, १९ मे, २०२१

पास रहती है

टुटे दिल मे भी इक दिवानी सी आस रहती है
दम घुटे रिश्तों में भी कहीं थोडी सांस रहती है

यारों ये मुहब्बत इक ऐसी अजीब बिमारी है 
जो आम होके भी हर किसी की खास रहती है

युँही नही महका करते ये रंगीं बदन फुलों के
उन्हे भी किसी दीदावर की तलाश रहती है

बहती हुई नदी को देख कर हैरान होता हूंँ मै
भरी होके भी उसे समंदर की प्यास रहती है

भूख नही मिटती आजकल शमशान घाट की
हर वक्त वहाँ भुनती हुई कोई लाश रहती है

वो मोड जहाँ से आगे घर दिखाई नही देता
लौटते वक्त वहाँ की सडक उदास रहती है

कौनसे युनिट मे नापोगे इस फासले का दायरा?
वो दूर है मुझसे पर दिल के बहुत पास रहती है



..

गुरुवार, ६ मे, २०२१

प्रितम प्यारे

साँस लेना भी कैसी आदत है
जीये जाना भी क्या रवायत है
-गुलजार
...
आम ही तो दिन था कल भी इस न्यू नॉर्मल का,
हाँ कुछ सिलवटें दिखीं थीं आसमाँ के बिस्तर पे,
दोपहर में थोडे गर्म झोंके चुभे थे आँखो में,
कंधे झुके झुके से लग रहे थे सामनेवाले पहाड के,
शाम को पेडोंके पत्ते झटपटा के दबी सी आवाजों में कुछ सिरीयस बात कर रहे थे..
मगर अंदेशा कतई नही आया था आनेवाली खबर का..

अभी चंद दिन पहले ही तो लाया था रेमडेसीविर कहींसे जुगाडकर,
'सब ठीक है' बता रहे थे बाकी यार दोस्तों को हम खुद हर रोज,
वो डॉक्टर दोस्त जो देख चुका है इस साल कईं कोविड के और भी सिरीयस मामलें,
कह रहा था 'स्लो है मगर इंप्रूव्हमेंट है'
व्हिडीओ कॉल में देते थे तसल्ली, होती थी हौसला अफजाई,
हर बार फोन रखने पे भर आती थी इक उदासी सी, 
एक दुसरे को मगर कहते रहते, 'अब ठीक है', 
सब ठीक लग भी रहा था...
हाँ मगर दवाईयों की, तसल्लियों की और दुवाओं की भी अपनी इक लिमिट है,
कहने को स्लो इंप्रूव्हमेंट होती रही मगर
सांसोंपे लगे बायपॅप मास्क के पहरे आखीर तक हठे ही नहीं
SpO2 नामक कोई जरुरी लेव्हल खुन में रूठी ही रही इतने दिन
धीमे धीमे टूटते ही रहे फेफडों के रेशें..
पुरा चेहरा भी नही देख पाये आखरी कॉल में आक्सिजन मास्क के पीछे,
और अब कभी देख भी नही पायेंगे..
वो स्कूल, वो हॉस्टल, नोंक झोन्क, गिले शिकवे,
मस्तियाँ, किताबें, वो पुरा का पुरा बचपन...
सबकुछ समेटकर हमे सौंपकर बस खामोशी से वो चल दिया
इतनी हताशा, इतनी बेबसी ताउम्र के लिये हमें थमाकर बस चल दिया..

सांँस लेना भी कैसी बुरी आदत है,
जीये जाना भी क्यों इतनी मुश्किल रवायत है?


..

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

सब चंगा सी

सांँसों का थोडा पंगा सी, जुबाँ पे जरा अडंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

फिजा मे नफरतों का जहर सी, सुबह भी दोपहर सी
भाईचारे की बात करो तो, भडकता है यहाँ दंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

सियासी हिसाब पे पर्दा सी, सिस्टीम बनी मुर्दा सी
चोर हैं शाही लिबासों में, और राजा भइल नंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

बढती बिमारी ए करोना सी, हर इक आँख में रोना सी
हवाओं में इतना मातम फैला, कि झटपटाता तिरंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

इलाज मिलने में देर सी, अस्पतालों में लाशों के ढेर सी
जानेवाली जानें हैं सस्ती, दवा का इंतजाम महंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

फेफडों में आक्सिजन कम सी, शमशानों में मातम सी
किसने फैलाई ये आग, किसका दामन खून में रंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

हर शक्स यहाँ मजबूर सी, हुकुमत बडी ही मगरूर सी
पाप क्या, खुद को धोते धोते, थक गयी नमामी गंगा सी
झूठ नही बोलता मै, मुल्क में बाकी सब चंगा सी

यारियाँ मजहबों में बांँटी सी, हर एक आवाज काटी सी  
कलम रोक ले लिब्रांडू, वरना मिल जायेगा कहीं टंगा सी



..

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

गलत बात

एक मुठ्ठीभरसा दिल है, जिसकी मुठ्ठी में मेरी कायनात है,
मै अपने अंधेरे छाँट रहा हूंँ, तेरे उजालों की सौगात है।

कहीं कोई शोर छूट रहा है, कहीं इक खामोशी टूट रही है,
कुछ वफा के ऐब हैं मुझमें, कुछ इबादत के इल्जामात हैं।

सांँझ की बोझल आंँखों में, सिमटीसी मंद रौशनी है,
इक आधा बुझा दिन है, इक आधीसी जली रात है।

नही है उसे चाहना लेकीन, चाहत पे नही इख्तियार मेरा, 
उसके खयाल पे खिलती है धूप, सोचूँ तो होती बरसात है।

उम्मीद करोगे टूट जायेगी, खुशी चाहोगे तो रुठ जायेगी,
मोहब्बत वो बला है जिसमे, अपनी शह ही अपनी मात है।

छुपाये रखा है उसे, खुद उसीसे छुपाकर दिल में मगर
खुशबू मेरे एहसासों की अब, डाल डाल है पात पात है।

अगरचे सच्ची है मेरी चाहत, अगरचे पाक मेरे जज्बात हैं,
खूबसुरत है मेरा इश्क मगर, गलत बात तो गलत बात है।




..

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

माळले नाही

संयमाची फुले वाहीली, उतावळ्या निखाऱ्यांत तुला जाळले नाही
चंदनाचे अंग असेच झिजविले, सहाणेवर त्यास उगाळले नाही  

तू उगवत राहिलीस पुन्हा पुन्हा मनाच्या देठावर फुल होऊन
मीच करंटा जे तुला मी माझ्या नशीबाच्या हारात माळले नाही

तू विजेसारखी अनपेक्षितपणे समोर क्षणभर आलीस तेव्हा
निस्तब्ध होतो झालो जरासा, नाही मी तुला टाळले नाही

हो सुखाचे आव आणतो खूप मी या सोशियल मीडियावर
उगा जाहीरपणे कधी माझे अश्रु कुणापुढे मी ढाळले नाही

मला नाही होता येत कधीच, व्यक्त मनाजोगते तुझ्यापुढे
पण असा एकही क्षण नाही की मनात तुला सांभाळले नाही

तू असतेच बागडत सदैव एकरूप, अंतर्बाह्य माझ्यात
मी एक क्षणही माझ्या डोळ्यांतून रूप तुझे गाळले नाही

तू कुणा अनोळखी गाभाऱ्यात सुगंध होऊन दरवळतेस
माझे आसक्त श्वास तुझ्या रेशमी धुपाने कधी गंधाळले नाही

 

 

 

..

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

कुणाला सांगणार नाही


होय आहे उदास थोडासा, पण कुणाला सांगणार नाही
सांत्वनेस्तव मी तुझ्या ओंजळीतले अर्घ्य मागणार नाही

मीच या अंधाऱ्या दिशा आहेत पांघरल्या माझ्या नभी
मला उजेडासाठी तुझ्या माथ्याचा सूर्य लागणार नाही

तुझा आभास पुसल्यावर डोळे ओघळतील माझे जरासे
पण ही वीण उसवली की मी पुन्हा वळून बघणार नाही

नाही ओवायाचे शब्द माझे आता पुन्हा तुझ्या गळ्याशी
तसेही तुजविण यापुढे माझी कविता कधी रंगणार नाही

सुख आपुलकीचे, सौख्याचे ज्यात आहे अनंत गुणिले मी
ते एकोणीस माझ्या उरल्या हयातीने देखील भागणार नाही

संवाद सुटला, अन खोल आत माझ्या आर्तसे तुटले काही
खुंटलेत श्वास त्याचे कायमचे, हा कोंब आता जगणार नाही

प्राणही असते दिले तुला पण तू नेमका दुरावा मागीतलास
दुखावलो कितीही त्याने तरी तुझ्या मनाविरुद्ध वागणार नाही






.

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

2020


एक साल ये कुछ ऐसे गुजर गया
कोई बोझ जैसे सीने से उतर गया

खिलखलाती मुस्कानों को कैद कर के
आंँखो में उदासी का पानी भर गया

सबको जीने मरने की जंग में उतारकर
जाने कितनी जिंदगियों को कुतर गया

मुखौटे पहनकर जीनेवाले चेहरों पर
ये मजबुरियोंके और नकाब धर गया

भूख जलते पांवों से रास्तोंपे चलती रही
जाने कौन घर गया और कौन मर गया

चलती फिरती दुनिया को लगाम लगाई
सारा जहाँ जैसे बेजान सा ठहर गया

एक ख्वाब मेरी आंखो में कत्ल हुआ
दिल टूटकर चारो तरफ बिखर गया

मार्च मे आया था एक बुरा सपना बनकर
चलो उसे खत्म करके ही दिसम्बर गया

एक साल ये कुछ ऐसे गुजर गया
कोई बोझ जैसे सीने से उतर गया

 

 


..

रविवार, २० डिसेंबर, २०२०

चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी



मै कहीं दूर किसी पहाड की चोटी पे
कुछ हसरतें बो रहा था एक बंजर सी मिट्टी पे
कुछ सर्द सी सिसकियाँ थी, जो मैने दिल की आग में तापी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी

मैने उम्मीदों के अलाव में उसे नही जलाया
मैने उसे कोई वास्ता देकर नाम से नही बुलाया
मैने कभी उससे अपने रिश्ते की गहराई नही नापी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी

ख्वाबों के परिंदे पलको से उतार दिये
कुछ संभाले हुए लम्हें थे, मैंने गुजार दिये
खिलखिलाते सिलसिले पे रख दी, इक लंबी सी चुप्पी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी



.