हा ब्लॉग शोधा

विज्ञानाधारीत तत्वज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विज्ञानाधारीत तत्वज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ मे, २०२५

आपले विश्व: भास आणि वास्तव

विश्वाचे रहस्य आपल्याला कधी उलगडेल का? मला नाही वाटत कधीच उलगडेल.
मुळात ज्याला आपण विश्व समजतो ते आपण समजतो तशा स्वरूपात अस्तित्वात तरी आहे का अशी मला शंकाच आहे. जे विश्व आपल्याला जाणवते ते काय आहे? तर आपल्या पाच सेन्सेसनी म्हणजे इंद्रियांनी जो काही सिग्नल आपल्या मेंदूला दिला त्याचा आपल्या मेंदूने लावलेला काहीतरी अर्थ. पण आपल्याला हेही माहीत आहे की आपल्या सेन्सेसला जाणवत नाही असेही खूप काही आहे या विश्वात. 

भाग 1: प्रकाश वा तरंग


साधारण 400 ते 750 नॅनोमिटर एवढ्याच तरंगलांबीचा प्रकाश आपल्याला दिसतो, त्याच्याहुन छोट्या वा मोठ्या तरंगलांबी आपल्याला दिसत नाहीत. आणि हे जे आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही त्याला आपण कसे शोधतो? तर काहीतरी क्लुप्ती लावून आपण या अननोन गोष्टींना आपल्या पाच इंद्रियांनी ओळखता येईल अशा अवस्थेत आणतो. उदा. आपल्याला एक्सरे दिसत नाहीत. पण ते आहेत हे कळते, कसे? तर फोटोग्राफीक प्लेटवर एक्सरे टाकले की ती प्लेट काळी होते. ते काळे होणे आपण आपल्या सेन्सेसनी पाहू शकतो म्हणून आपल्याला कळते की एक्सरे अस्तित्वात आहेत. पण अशा अगणित गोष्टी असू शकतात ज्यांना आपण कधीही अशा स्वरूपात आणू शकणार नाही जेणेकरून आपल्या पाच सेन्सेसला त्यांची जाणीव होईल. हे विश्व जे आपल्याला 400 ते 750 या खिडकीतून दिसते ती खिडकी जगातल्या एकूण प्रकाशाच्या वा एकूण इलेकट्रोमॅग्नेटीक तरंगांच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. जेवढ्या तरंगलांबी आपल्याला डिटेक्ट झाल्यात त्यांच्या तुलनेत ही खिडकी आहे फक्त 3 × 10⁻²⁶ टक्के इतकी. 10 चा वजा 26वा घात म्हणजे बघा आपल्याला किती अल्प प्रमाणात जाणवते हे विश्व. बरे हे झाले जेवढ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगलांबी आपल्याला आजपर्यंत कळल्यात त्यांच्या तुलनेत. ज्या आपल्याला अद्याप कळल्याच नाहीत त्या तर यात गृहितही धरलेल्या नाहीत. आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. पण हे रंग काही खरेच एखादी अस्तित्वात असलेली वस्तू नाहीयेत. तर ते फक्त आणि फक्त आपल्या मेंदूने काही विशिष्ट तरंगलांबींना दिलेला एक अर्थ आहे. आपले इव्होल्यूशन थोडे वेगळे झाले असते आणि आपल्याला एक्स रे किंवा गॅमा रे दिसत असते तर आपल्याला रंग नावाची कल्पनाही कधी आली नसती. इतकेच नाही तर इतर प्राण्यांना जाणवणारे रंग आणि आपल्याला जाणवणारे रंग हे पूर्णतः वेगवेगळे असू शकतात. इतकेच नाही तर आपल्यालाही एकमेकांना होणारा रंगांचा आभास वा त्यांची प्रतिमा ही प्रत्येकाच्या मेंदूत वेगवेगळी असू शकते. प्रकाश वा रंग म्हणजे केवळ आपल्या अवतीभोवती अस्तित्वात असलेल्या अगणित तरंगलांबींतील एका छोट्याश्या भागाचा आपल्या मेंदूंनी लावलेला एक कृत्रिम अर्थ होय. ज्या वेव्ह आपल्या मेंदूला जाणवेल असा सिग्नल तयार करतात त्यांना आपण प्रकाश समजतो. प्रकाश हा फक्त आपल्यासाठी अस्तित्वात आहे. विश्व हे ऑलरेडी अनंत तरंगांनी भरलेलेच आहे, प्रकाश आणि अंधार असे काहीही विश्वात अस्तित्वात नाही. आपल्या मेंदूला जे तरंग डिटेक्ट होतात तो प्रकाश आणि जे तरंग थोड्या वेगळ्या प्रकारे डिटेक्ट होतात तो आवाज असा आपल्या मेंदूने या तरंगांचा लावलेला कृत्रिम अर्थ आहे. अनेक लोकांना वेगवेगळे रंग पाहून आवाज ऐकू येतात तर अनेकांना आवाज ऐकून वेगवेगळ्या चवी जाणवतात. हे मेंदूचे आजार असतात. पण यामुळे आपण समजतो तसे रंग वा आवाज वगैरे काही अस्तित्वात नसून आपला मेंदू त्याचा काय अर्थ लावतो तेच आपल्याला खरे वाटते हे सिद्ध होते. प्रत्यक्षात प्रकाश नाही की रंग नाहीत की आवाज नाही. ते आहेत असे आपल्याला वाटते कारण आपल्या मेंदूने त्याचा तसा अर्थ लावलेला असतो. मेंदूने रंगाला आवाज म्हणून अर्थ लावला की आपल्याला रंग ऐकू येतात. प्रत्यक्षात विश्वात अनंत तरंगलांबी आहेत, त्यातील अगदी अल्पशा भागाला आपल्या मेंदूने दिलेले कृत्रिम अर्थ वा स्वरूप म्हणजे प्रकाश, रंग वा आवाज.



भाग 2: वस्तुमान, मॅटर


ढोबळपणे ज्याला आपण स्पर्श करू शकतो ते म्हणजे मास, मॅटर वा वस्तुमान असे आपण मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का? विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करत नाहीत वा करूच शकत नाहीत. पण मी हा मोबाईल हातात धरून लिहितोय, तो काय त्याला स्पर्श केल्याविना? माझा मोबाईल टचस्क्रीन आहे. टाइप करताना मी त्याला टच म्हणजे स्पर्श तर करतोच आहे ना? आपण वस्तूंना, इतर माणसांना स्पर्श करतो. एखादा स्पर्श तर आपल्याला किती रोमांचित करतो ते काय खोटे असते? सर्वात आनंददायी सुख तर स्पर्शातच आहे. ते खरे नाही का? तर याचे उत्तर आहे की होय जगातल्या कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना कधीही डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा थेट स्पर्श करू शकत नाहीत. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करू पाहतो तेव्हा तो स्पर्श नसतो. प्रत्येक पदार्थात ऍटम असतात, सगळ्या ऍटममध्ये इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तुजवळ जाते तेव्हा त्या दोन्ही वस्तूंमधले इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असल्याने ते एकमेकांना प्रतिरोध करतात. कितीही जोर लावला तरी दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना स्पर्श करतच नाहीत. ते एकमेकांना प्रतिरोधच करतात. त्यामुळे आपल्याला जी स्पर्शाची जाणीव होत असते तो खरा स्पर्श नसतो तर तो आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉन्सला दुसऱ्या व्यक्ती वा वस्तूतील इलेक्ट्रॉन्सनी केलेला केवळ प्रतिरोध असतो. तुम्ही कितीही ताकद वा प्रेशर अप्लाय करा की कितीही स्ट्रॉंग ग्लू लावून पहा. दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करूच शकत नाहीत. ऍटोमिक लेव्हलवरच नाही तर क्वांटम लेव्हलवर सुद्धा हेच खरे आहे.
साधारणतः जिथे आपल्याला प्रतिरोध होतो त्या ठिकाणाला आपण वस्तुमान किंवा मॅटर समजतो. त्याला आपण वस्तू वा मास समजतो. मास म्हणजे काहीतरी ठोस असा पदार्थ असे आपण समजतो, पण मास म्हणजे असा कोणताही पदार्थ नसतो तर मास म्हणजे फक्त अशी काहीतरी रचना असते जी आपल्याला वा प्रकाशाला वा इतर वस्तूंना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रतिरोध करते. जसे दोन चुंबकांचे समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. हे ध्रुव कोणत्याही माध्यमाविना एकमेकांना दूर ढकलतात. कुणालाही दूर ढकलण्यासाठी आपल्याला नेहमी हातांची वा एखाद्या वस्तूची गरज भासते. या मॅग्नेटसना मात्र अशा कोणत्याही हाताची वा वस्तूची गरज लागत नाही. मात्र तरीही ते एकमेकांना दूर ढकलतात. याचे कारण काय? तर या मॅग्नेट भोवती एक मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. आणि हे फिल्ड दुसऱ्या मॅग्नेटच्या समान ध्रुवाला जवळ येण्यास प्रतिरोध करते. अगदी असेच मॅटर म्हणजे कोणतीही वस्तू नसते तर ती फक्त एक वेगवेगळ्या फिल्ड्सची गुंडाळी वा कॉम्बिनेशन असते जे त्याच्याहून इतर फिल्ड्सला जवळ येण्यापासून वा स्वतःच्या आरपार जाण्यापासून विरोध करते. सगळे विश्व ज्या मूळ कणांपासून बनले आहे त्या कणांना कोणताही आकार नाही. इलेक्ट्रॉनला कोणताही आकार नाही. त्याला काहीही डायमेन्शन्स नाहीत. अशाच कोणताही आकार वा डायमेन्शन्स नसलेल्या मूळ कणांपासून हे विश्व बनले आहे. मुळातच डायमेन्शन वा आकार नसलेल्या वस्तुंपासून काहीही ठोस कसे बनेल? मॅटर ही कोणतीही आपल्या कल्पनेतील फिजिकल अस्तित्व असलेली ठोस गोष्ट नाही तर फक्त वेगवेगळ्या मूल कणांच्या वेगवेगळ्या फिल्ड्सच्या मिश्रणातून तयार झालेले व इतर फिल्ड्सला प्रतिरोध करणारे एक महाफिल्ड आहे. जसे एकमेकांना दूर ढकलणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड्ला कोणतेही फिजिकल अस्तित्व नसते तसेच मॅटरला सुद्धा कोणतेही फिजिकल अस्तित्व नाही. ते आपल्याला तसे जाणवते कारण आपल्याला होणाऱ्या प्रतिरोधाला आपले मेंदू तसे एक काल्पनिक रूप देतात. जसा प्रकाश वा रंग आपल्याला वाटतात तसेच अस्तित्वात नाहीयेत तर ते फक्त आपल्या मेंदूने लावलेले काल्पनिक अर्थ आहेत तसेच मॅटर हे सुद्धा आपल्याला वाटते तशी कोणतीही वस्तू नाहीय तर तेही फक्त आपल्या मेंदूने आपल्याला होणाऱ्या विविध फिल्ड्सच्या प्रतिरोधाचा लावलेला एक कृत्रिम व अवास्तव अर्थ आहे. कोणताही स्पर्श हा खराखुरा टच नसतो तर तो फक्त इलेक्ट्रॉन्सनी एकमेकांना केलेला प्रतिरोध असतो. मॅटरचे वजन किंवा वस्तुमान हेही त्या फिल्डमध्ये किती ऊर्जा आहे त्याचे एक प्रमाण असते. मास आणि एनर्जी हे एकच आहेत हे आपण जाणतो ना? त्यामुळेच मास हे सुद्धा फक्त एक विशिष्ट प्रमाणात एनर्जी अंतर्भूत असलेले फिल्ड असते. वजन, आकार वा ठोसपणा हा फक्त आपल्या मेंदूने त्या फिल्डला दिलेला अर्थ आहे.


भाग 3: अंतर आकार आणि दिशा


समजा विश्व पूर्णतः रिकामे असून पूर्ण विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय की एकाच जागी स्थिर आहे? तो गतिमान असलाच तर कोणत्या दिशेला जातो आहे? हे आपण सांगूच शकत नाही. का? कारण एखाद्या वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी जाणे वा दिशा बदलणे हे ओळखण्यासाठी आपल्याला काही ना काही संदर्भ बिंदू हवा असतो. कसे?
तर समजा आपण त्या इलेक्ट्रॉनच्या जवळ गेलो आणि मग त्याला पाहीले. मग जर तो आपल्यापासून जवळ वा दूर गेला म्हणजे त्याची पोजिशन आपल्या पोजिशन पासून बदलली तर आपल्याला कळेल की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. त्याचे अंतर आपल्या पासून वाढले तर आपल्याला कळेल की तो दूर जातोय. कमी झाले तर कळेल की तो जवळ येतोय. इथे आपण एक संदर्भ झालो. इलेक्ट्रॉन आपल्या पोजिशनच्या तुलनेत दूर गेला म्हणून आपल्याला वाटते की तो हलतो आहे. पण जर एका इलेक्ट्रॉनला असा कोणताही संदर्भ नसेल, त्याची पोजिशन जवळ आहे की लांब हे ठरवण्यासाठी कोणताही दुसरा संदर्भ बिंदू नसेल तर तो इलेक्ट्रॉन स्थिर आहे की गतिमान आहे हे आपण सांगूच शकणार नाही.
थोडक्यात काय की जर काहीही रेफरन्स किंवा संदर्भ नसेल तर आपल्याला अंतर समजूच शकत नाही. बंद लिफ्टमध्ये जर फ्लोअरचा नंबर डिस्प्ले केलेला नसेल तर आपण किती अंतर वा किती फ्लोअर पार केले हे आपल्याला कळूच शकत नाही. कारण अंतर कळण्यासाठी काहीतरी रेफरन्स बिंदू किंवा तुलना करण्यासाठी एखादी संदर्भ रेषा आवश्यक असते. बंद लिफ्टमध्ये ते नसते. म्हणजेच काय की अंतर काय असते तर एखाद्या संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूच्या वा जागेच्या पोजिशनची तुलना. अमुक तारा इतके प्रकाशवर्षे दूर आहे हे आपण आपल्या संदर्भात सांगत असतो. पण विश्वात फक्त एकच तारा असता इतर काही नसते तर तो तारा नेमका कुठे आहे हे सांगताच आले नसते. हेच दिशा किंवा डायमेंशन्सचे आहे. अनोळखी प्रदेशात आकाशात ढग असतील तर आपल्याला दिशा कळत नाहीत. का? तर दिशा कळण्यासाठी सूर्य किंवा ध्रुव तारा हे आपले रेफरन्स आहेत. तेच नसले तर दिशाच नसतात. एखाद्या वस्तूचा आकार सुद्धा आपण त्याच वस्तूतील इतर भागांपासूनचे अंतर वा उंची यांच्या संदर्भात ठरवतो. वा इतर वस्तूंच्या तुलनेत ठरवतो. डोंगर उंच आहे हे आपण पायथ्याच्या तुलनेत ठरवतो. एखादी बिल्डिंग चौकोनी आहे की त्रिकोणी हे आपण त्याच बिंडिंगच्या टोकांच्या एकमेकांतील अंतरावरून ठरवतो.
दिशा असो की अंतर की अगदी आकार हे सुद्धा कशाच्या तरी संदर्भातच आपण ठरवतो. कोणताही संदर्भ नसला तर आपल्याला अंतर, आकार वा दिशा हे कळूच शकत नाहीत. थोडक्यात काय की हे सुद्धा आपल्या मेंदूने कुठल्यातरी एका संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूंच्या पोजिशनला दिलेले अर्थ आहेत. जर आपल्या मेंदूला ही रेफरन्स बघण्याची क्षमताच नसती तर आपल्यासाठी अंतर, दिशा, आकार हे अस्तित्वात नसते. काहीतरी संदर्भ हवा असणे हा ती क्वांटीटी अबसोल्युट नसण्याचा पुरावा आहे.
जर विश्वात इतर काहीही नसेल फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर दिशा, अंतर, वेग हे सगळे अस्तित्वातच असू शकत नाही. तो इलेक्ट्रॉन भलेही गतिमान असो, म्हणजे फिरता असो, पण त्याचा वेग, त्याने कापलेले अंतर हे काहीही मोजले जाऊ शकत नाही. किंबहुना त्यावेळी स्पेसला स्पेस सुद्धा म्हणता येणार नाही. कारण स्पेस म्हणजे सुद्धा एक विशिष्ट एरिया/वोल्युम असते. आणि जिथे अंतर वा डिस्टन्सच अस्तित्वात नाही तिथे एरिया वा वोल्युम कुठून असणार.



भाग 4: काळ


अरिस्टॉटल म्हणतो की काळाला आपण भूत, वर्तमान, भविष्य अशा तीन भागांत विभाजित करतो. भूतकाळ घडून गेलेला असला तरी सध्या अस्तित्वात नाहीय. भविष्यही याक्षणी अस्तित्वात नाहीय. जे अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान. थोडक्यात वर्तमान म्हणजे काय तर दोन अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींच्या मधला अगदी अल्प असा काळ.
जावेद अख्तर म्हणतात की जसे आपण ट्रेन मधून जात असताना झाडे मागे जाताना दिसतात, पण प्रत्यक्षात ती एकाच जागेवर स्थिर असतात आणि आपणच पुढे जात असतो, तसे काय घ्या काळ हा एकाच जागी स्थिर असेल आणि आपणच पुढे जात असू.
असो, तर काळ म्हणजे काय हे बघण्याआधी एन्ट्रोपी या गोष्टीला उजळणी देऊ.
एन्ट्रोपी हा विश्वाचा स्थायीभाव आहे. स्थायीभाव हा शब्द किती बरोबर आहे माहीत नाही कारण स्थायी नसणे म्हणजेच एन्ट्रोपी. ते म्हणतात ना चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट.
एन्ट्रोपी म्हणजे विश्वात वाढत जाणारी अस्ताव्यस्तता किंवा फाफटपसारा. क्षणोक्षणी विश्वाची एन्ट्रोपी वाढत जात आहे. आता याक्षणी विश्व जसे आहे त्यापेक्षा पुढच्या क्षणी ते वेगळ्या स्थितीत असते. याला एन्ट्रोपी वाढणे असे म्हणतात. जर विश्व आहे त्याच स्थितीत कायमचे स्थिर राहीले तर एन्ट्रोपी वाढणार नाही.
जसे अंतर, दिशा यांच्यासाठी काहीतरी संदर्भ हवा असतो तसेच काळ मोजण्यासाठी सुद्धा काहीतरी संदर्भ हवा असतो. आणि काळ आपल्याला मोजता येतो वा जाणवतो वा भासतो तो केवळ आणि केवळ एन्ट्रोपी मुळे.
मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे जर विश्वात फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर इतर काही संदर्भ नसल्याने त्याची पोजिशन, मूव्हमेंट हे सगळे शून्य असेल आणि म्हणून विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल कारण विश्वात काहीही बदल होणार नाही. जेव्हा अजून एक इलेक्ट्रॉन येईल आणि त्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये काही इन्ट्रॅक्शन होईल तेव्हा विश्वाची एन्ट्रोपी वाढू लागेल. कारण मग एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्या तुलनेत काहीतरी हालचाल करेल. पण जर दोघेही स्थिर राहीले तर मात्र एन्ट्रोपी शून्यच राहील. कारण काहीतरी वेगळा बदल होणे म्हणजे एन्ट्रोपी. जर पुढे अजून अनेक इलेक्ट्रॉन, ऍटम वगैरे विश्वात येत राहीले तर मात्र विश्वाची एन्ट्रोपी वाढत राहील. कारण ते सगळे एकमेकांशी काही रीऍक्शन करतील ज्यामुळे पुढे पुढे अनेक बदल होत जातील. हे बदल वाढणे, त्यायोगे विश्व अधिकाधिक अस्ताव्यस्त होणे म्हणजे एन्ट्रोपी.
आज विश्वात असंख्य वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू एकमेकांच्या तुलनेत दर क्षणी बदलत असतात. सगळ्यांमध्ये नवनवे कॉम्बिनेशन आणि त्यायोगे नवनवे बदल घडत असतात, म्हणून विश्वाची एन्ट्रोपी लगातार वाढत आहे.
पण जर समजा, विश्व एका क्षणी जसे आहे अगदी तसेच्या तसेच दुसऱ्याही क्षणी राहीले, तिसऱ्याही क्षणी राहीले तर? म्हणजे जर विश्व आता या घडीला जसे आहे अगदी तसेच्या तसेच कायमचे राहीले त्यात अगदी सूक्ष्म बदलही झाला नाही तर? तर आपण म्हणू की विश्व स्थिर झाले. किंवा काळ थांबला.
पण आपल्या समजुतीप्रमाणे तर काळ कधीच थांबू शकत नाही. बरोबर ना? विश्व थांबले म्हणून काय झाले? काळ तर चालतच रहायला हवा.
ग्राउंडहॉग डे किंवा टॉम क्रूजचा 'एज ऑफ टुमारो' या फिल्म पाहिल्या आहेत का? त्यात काय होते? तर जग पुन्हा पुन्हा एका पूर्वस्थितीत पोचत असते. काल सकाळी 7 वाजता जे घडले अगदी तसेच्या तसे आज सुद्धा घडत असते. काल मेलेले लोक पुन्हा जिवंत होतात, काल घडलेल्या सगळ्या घटना अनडु होतात आणि आज सगळे विश्व पुन्हा पुन्हा त्या एकाच पूर्वस्थितीला पोचत असते. इथे काय होते? तर इथे विश्वाची एन्ट्रोपी कमी होते. क्षणोक्षणी काहीतरी बदल होत जाणे म्हणजे एन्ट्रोपी वाढणे. काहीच बदल न होणे म्हणजे एन्ट्रोपी स्थिर होणे, आणि जे बदल झालेत ते रिवर्स होणे वा अनडू होणे म्हणजे एन्ट्रोपी कमी होणे. या फिल्म मध्ये एका दिवसात जे जे बदल होतात, युद्ध होते, संहार होतो, एलियन येतात ते सगळे काही पुन्हा रिसेट होते. सगळे काही एका क्षणात रिवर्स होते. म्हणजे एका दिवसात जी अस्ताव्यस्तता वाढली होती ती परत तिच्या पूर्वपदावर येते. म्हणजेच एन्ट्रोपी कमी होते. आणि एन्ट्रोपी कमी होते म्हणजेच काळ मागे जातो.
विश्वाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याला आपण काळ असे समजतो. प्रत्यक्षात काळ वगैरे काही अस्तित्वात नाही. जर या फिल्म्सप्रमाणे काही बदलांनंतर विश्व पुन्हा जसेच्या तसे होत राहीले तर काळ हा एका लूप मध्ये फिरतोय असे आपण समजू.
फिल्म किंवा व्हिडीओ म्हणजे काय असते? तर अनेक फोटो एकामागून एक ठराविक स्पीडने डोळ्यापुढे आणले की आपल्याला ते फोटो हलत असल्याचा भास होतो. विश्वात होणारा प्रत्येक बदल हा त्या फिल्मच्या एकेका फोटो सारखा आहे, आपण ते एकामागून एक क्रमाने पाहतो म्हणून आपल्याला तो काळ वाटतो. फ्रेममध्ये बदल होतो म्हणून तो काळ वाटतो.
जर आपण एकच फोटो त्याच्या अनेक कॉपी बनवून त्याचीच फिल्म बनवून प्ले केली तर फिल्म तर रन होत असेल पण आपल्याला मात्र ती एकाच क्षणात थांबल्यासारखी वाटेल. कारण फ्रेम बदलत असल्या तरी सगळ्या फ्रेम्स मध्ये एकच फोटो असल्याने तो बदल तंतोतंत आधीच्या स्थितीसारखाच वाटेल त्यामुळे फिल्म चालू आहे की नाही हे आपल्याला कळूच शकणार नाही. सेम असेच काळाचे आहे. विश्वाच्या आपल्याला दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या फ्रेम बदलत्या असतात म्हणून आपल्याला काळाचा भास होतो. विश्वाचे निरंतर बदलणे किंवा एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम मध्ये जाणे म्हणजे एन्ट्रोपी. जर विश्व एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत गेले मात्र ती दुसरी स्थिती तंतोतंत आधीच्या स्थितीसारखी असेल तर एन्ट्रोपी वाढणारच नाही. आणि त्यामुळे काळ व्यतीत झालाय हे आपल्याला कळणारच नाही. विश्व जसेच्या तसेच राहीले तर काळाची जाणीवच होणार नाही. एन्ट्रोपी वाढलीच नाही तर आपोआप काळ नष्ट होतो, किंवा स्थिर होतो.
मात्र विश्व हे प्रत्यक्षात लगातार एका स्थितीतून दुसऱ्या नव्या स्थितीत परिवर्तित होत आहे. ते कधीही पूर्वस्थितीला येत नाही. हे जे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत परिवर्तन होणे आहे त्यालाच आपण काळ समजतो. म्हणजे काय की आपण एक रेफरन्स पॉईंट पकडतो. विश्वाची आजची स्थिती हा तो रेफरन्स पॉईंट. पुढच्या क्षणी विश्वाची स्थिती बदलते. आपल्या रेफरन्स पॉईंट पेक्षा विश्व हे एका वेगळ्या स्थितीत येते. फिल्म मध्ये नेक्स्ट फ्रेम येते तसे. हे पुढच्या क्षणामधील बदल विश्वाला पूर्णतः नव्या स्थितीत घेऊन जात असतात म्हणून आपल्याला ते वेगळे जाणवते. विश्वाच्या या परिवर्तनाच्या असंख्य स्टेप्स आहेत. आपला मेंदू जितक्या समर्थपणे या सगळ्या बदलाच्या स्टेप्स ओळखू शकतो त्याला आपण काळ असे समजतो. जसे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या एका फेरीला आपण एक दिवस समजतो, व सूर्याभोवतीच्या एका फेरीला वर्ष समजतो.
समजा आज जे बदल होताहेत त्याऐवजी विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा फक्त आहे त्या जागी व्हायब्रेट होत असता, इतर कोणतेही इन्ट्रॅक्शन वा रिऍकशन करत नसता. तर काय झाले असते? पृथ्वी आहे त्या जागी, सूर्य,चंद्र, सगळ्या गॅलक्सी आहेत त्या जागी फक्त व्हायब्रेट होत राहील्या असत्या तर एन्ट्रोपी वाढलीच नसती. जर हे व्हायब्रेशन एक सेकंदाचे असते. म्हणजे दर एका सेकंदाने प्रत्येक गोष्ट पुन्हा तिच्या मूळ स्थितीला आली असती तर जी काय एन्ट्रोपी तेवढ्या वेळात वाढली असती ती परत एक सेकंदात शून्य झाली असती. आणि त्यामुळे काळ सुद्धा वाढलाच नसता. जर फक्त एका सेकंदात व्हायब्रेट होऊन प्रत्येक वस्तू परत मूळ जागी आली असती तर विश्वाचे आयुष्य हे नेहमीकरता एका लूप मध्ये फक्त एक सेकंदाचे ठरले असते.
जर विश्वाची एन्ट्रोपी कमी होऊ लागली, म्हणजे विश्व पुन्हा पूर्वस्थितीला येऊ लागले तर काळ उलटा फिरू लागला असे आपण म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट ज्या क्रमाने बदलली त्याच क्रमाने उलटी झाली तर विश्वाची एन्ट्रोपी कमी कमी होत जाईल. असे झाल्याने आपण पुन्हा लहान होऊ, पुन्हा डायनोसॉर अस्तित्वात येतील. पुन्हा जग बिगबँगच्या स्थितीला येईल आणि त्या क्षणी एन्ट्रोपी शून्य होईल.
विश्वाच्या अ या स्थितीला आपण रेफरन्स पॉईंट धरतो आणि त्या क्षणापासून विश्वाची एन्ट्रोपी किती स्टेप्स मध्ये वाढली त्याला काहीतरी प्रमाण देऊन त्याला काळ असे समजतो. प्रत्यक्ष काळ वगैरे काही नाहीय. तर फक्त विश्वात जे परिवर्तन होतेय वा जे बदल होताहेत त्या बदलाच्या एका गृहीत संदर्भ स्थितीपासून होणाऱ्या परिवर्तनाच्या आपल्याला होणाऱ्या जाणिवेला आपण काळ समजतो. जर विश्वात आपल्याला जाणवेल असा बदल झालाच नाही तर काळ आपल्यासाठी स्थिर होईल. मग आपण काळ मोजूच शकणार नाही. जसे विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन असला तर तो जरी गतिशील असला तरी आपण तो गतिशील आहे की स्थिर आहे ते सांगूच शकणार नाही कारण त्यासाठी आपल्याकडे त्या इलेक्ट्रॉनच्या स्थितीत होणारा बदल ओळखायला कोणताही दुसरा संदर्भ बिंदूच नसेल. त्यामुळे विश्वात जर फक्त एकच इलेक्ट्रॉन अस्तित्वात असेल तर विश्वात काळ अस्तित्वातच असू शकणार नाही. कारण त्यावेळी विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल.
जरी एक इलेक्ट्रॉन नाही तर आता आहे तितक्याच वस्तू विश्वात असतील मात्र विश्वाची कोणतीही पूर्वस्थिती जर होणारा बदल ओळखण्यासाठी संदर्भाला नसेल, किंवा सगळेच बदल हे तंतोतंत पूर्वीसारखेच असतील तर एन्ट्रोपी वाढणार नाही आणि त्यामुळे काळही असणार नाही. जर विश्वाची एन्ट्रोपीच अजिबात वाढली नाही तर आपल्याला विश्व अगदी कोट्यवधी वर्षे आहे त्याच अवस्थेत अस्तित्वात राहीले तरी काळ मात्र स्थिर आहे असेच वाटेल.
थोडक्यात काळ म्हणजे विश्वाच्या स्थितीत होणाऱ्या जाणवण्याइतक्या बदलाचा त्या बदलाच्या पूर्वस्थितीशी असणारी तुलनात्मक विविधता ओळखण्याची आपल्या मेंदूची क्षमता. हे बदल होतात म्हणून आपल्याला काळ भासतो. जर विश्व पूर्णतः स्थिर असते तर काळ अस्तित्वातच नसता. किंवा आपले मेंदू काळ ही कल्पना करूच शकले नसते. काळ म्हणजे आपण समजतो तसा वेळ नाही तर फक्त विश्वाच्या बदलत्या स्थितींमधली आपल्या लक्षात येणारी क्रमवारी आहे.
जर विश्वातल्या आपण ओळखू शकतो त्या सगळ्या वस्तू नष्ट झाल्या तर काळ नष्ट होईल. कारण सगळे काही नष्ट झाले तर काही बदल होणार नाहीत, काही बदल झाले नाहीत तर एन्ट्रोपी शून्य होईल. विश्वाच्या स्थितीतील बदल मोजायला आपल्याकडे काहीही संदर्भ नसेल आणि त्यामुळे काळ नष्ट होऊन जाईल.
काळ नावाचे काही अस्तित्वातच नाही. काळ ही सुद्धा अंतर, वेग, दिशा यांच्यासारखी फक्त रिलेटीव्ह संकल्पना आहे. काळ हा या विश्वातील बदलांच्या फ्रेम्सच्या क्रमामुळे केवळ आपल्याला होणारा एक भास आहे. या फ्रेम्समधील बदल जितक्या क्षमतेने आपण ओळखू शकतो तितका त्याचा वेग ठरतो. प्रत्यक्षात काळाला वेगही नाही, तो फक्त आपल्या बदल ओळखण्याच्या क्षमतेचा एक आभास आहे.






टीप: सगळ्या इमेजेस ह्या एआयने जनरेट केल्या आहेत : चॅट जीपीटी, डीप एआय, एम एस डिझायनर इत्यादि

 

..


गुरुवार, २१ मार्च, २०२४

देवाची निर्मिती आणि कारण

अनेकदा जगभरात सापडणाऱ्या आदिमानवांच्या गुहांत विचित्रशी गुंफाचित्रे दिसून येतात. तीन डोक्यांचा प्राणी, गोल चेहऱ्यावर तोंड नाक काही नाही फक्त एक डोळा असलेला आणि खाली सापासारखे शरीर असलेला प्राणी अशी अनेक विचित्र भित्तिचित्रे अशा अनेक गुहांत बघायला मिळतात. आता तुम्ही रात्री हिस्ट्री चॅनल बघत असाल तर पहीली प्रतिक्रिया हीच असेल की आदिमानवाच्या काळात नक्कीच पृथ्वीवर एलियन येत असणार आणि म्हणूनच तर त्यांनी त्यांची भित्तिचित्रे गुफांत काढून ठेवली. जर त्यांनी तेव्हा असे एलियन पाहिलेच नसतील तर ते तशी चित्रे का काढतील? कुणालाही हा विचार बरोबरच वाटेल. आणि खरेच या अशा विचित्र चित्रांच्या पॉसिबल कारणांपैकी एलियन हेच कारण सकृतदर्शनी जास्त शक्य वाटते. 

चित्र : आदिमानवाच्या गुहेतील विचित्र आकाराचे एलियनचे वाटणारे चित्र 


कॅलिफोर्नियातील अशाच एका आदिमानवांच्या गुहेत एकदा छताच्या बाजूला एक ऑरगॅनिक फॉसिलसारखे काहीतरी सापडले. हे फंगस असणार असे आधी वैज्ञानिकांना वाटले. अनेक गुहांत असे वेगवेगळे फंगस सापडतच असतात. पण जेव्हा त्याचे स्ट्रक्चरल एनालिसिस केले तेव्हा लक्षात आले की ते फंगस नाहीय तर आता जसे तंबाखू खाऊन थुंकतात, तसे तेव्हाच्या मानवाने काहीतरी चावून ते गुहेच्या छतावर फेकले होते आणि ते तिथेच चिकटून राहिले होते. तो तसा चोथा फक्त आणि फक्त दातांनी चावल्यामुळेच बनत असतो. हे कळल्यानंतर मग पुढे त्याचे केमिकल एनालिसिस केले असता लक्षात आले की त्यात सायकेडेलिक (अंमली) पदार्थ होते. हा एका प्रकारच्या धोत्र्याच्या फुलाचा चावून टाकलेला चोथा होता. त्या गुहेत या धोत्र्याच्या फुलाचे चित्रदेखील काढलेले आहे. या फुलात सायकेडेलिक ड्रग्ज असतात. म्हणजे आजच्या भाषेत अंमली पदार्थ किंवा नशीले ड्रग्ज. हे ड्रग्ज खाल्ल्याने माणसाला भ्रम होऊ लागतात, चित्रविचित्र आकृत्या दिसू लागतात. अगदी अतर्क्य अशा जाणीवा होतात व विचित्रशी दृश्ये दिसू लागतात. सायकेडेलिक ड्रग्जच्या नशेमुळे या विचित्र भ्रामक अनुभवाबरोबरच सोबत एक भन्नाट अशी आनंदाची फीलिंग सुद्धा येते, म्हणून त्याचे व्यसन लागत असते. या गुहेतील धोत्र्याच्या फुलाव्यतिरिक्त ही अशी एलियनची वाटावीत अशी विचित्र चित्रे असणाऱ्या आदिमानवांच्या बहुतांश अतिप्राचीन गुहांत विशेषत्वाने मशरूम्सची देखील अनेक चित्रे चितारलेली सापडतात. आणि गंमत ही आहे की सायकडेलिक ड्रग्जचा म्हणजे नशील्या पदार्थांचा मशरूम हा देखील एक उत्तम नैसर्गिक सोर्स आहे. स्पेनमध्ये सापडलेल्या एका गुहेतील मानवी केसांचे एनालिसिस केले असता त्यातही ते ज्याचे केस होते त्या माणसाने भ्रम निर्माण करणारे ड्रग्ज घेतले असल्याचे आढळून आले. 

The mushrooms of Selva Pascuala in situ Photo courtesy of Juan Francisco Ruiz López

चित्र : आदिमानवाच्या गुहेतील मशरूम्सची चित्रे. या मशरूम्समधेही नशीले पदार्थ असतात

 

बहुदा ब्राझीलमधील एका आदिवासी जमातीत एका झाडाची मुळे आणि दुसऱ्या एका झाडाची पाने असे एकत्र चावून खातात. त्याने अशीच नशा होते आणि मेंदूत भ्रम निर्माण होतात. आता एका खाद्य नसलेल्या झाडाची मुळी कशाला लोक खातील? आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या एका रँडम झाडाची पाने (तीही खाद्य नाहीत) त्या मुळीसोबत खाल्ली तर  त्याने अशी नशा होईल हा शोध त्यांनी कसा लावला असेल कुणास ठाऊक. पण अगदी आदिमानवाच्या काळापासूनच सगळ्या जगभरातच सगळ्या काळांत मानवांकडून असे हॅल्यूशिनेशन्स म्हणजे भ्रम निर्माण करणारे ड्रग्ज घेतले जात होते याचे पुरावे सापडतात.
आफ्रिकेत अनेक आदिवासी जमातींत झाडांची मुळे वा इतर काही पदार्थ खाऊन मृत माणसांच्या विश्वात जायची परंपरा आहे. हे नशीले पदार्थ खाल्ल्यावर माणसे अनेक दिवसांपर्यंत स्वतःचे भान हरपून नशेत राहतात. पण ही नशा आहे अशी जाणीव नसल्याने ही नशा केलेली माणसे मृत माणसांच्या विश्वात जातात असे ते लोक मानतात. एशियामध्ये सुद्धा अनेक मानवी समूहांत अजूनही असे काहीतरी खाऊन मृत पूर्वजांच्या जगात जाता येते अशा मान्यता आहेत. भारतातही गांजा, धोत्रा हे अनेक धार्मिक कार्यांत वापरले जातात. भांग हा पदार्थ असाच एक सायकेडेलिक म्हणजे नशीला धार्मिक पदार्थ आहे. आजचे दारू, अफू वा LSD वगैरे सारखे ड्रग्ज हे त्याच आदिम नशेचे आधुनिक प्रकार आहेत. इतकेच नाही तर सोमरस जो आता विलुप्त झालाय तो सुद्धा एक वनस्पती बेस्ड सायकडेलिक पदार्थच असेल अशी अनेक अभ्यासकांना दाट शंका आहे.
तर देवाच्या रूपाचा जन्मसुद्धा अशाच सायकडेलिक ड्रग्जमुळे झाला असणार हे नक्की. नशा करून जे भ्रम होऊ लागले त्यात तीन डोकी असलेला देव, अर्धे प्राण्याचे अर्धे माणसाचे शरीर असलेला देव, आकाश आपल्या खांद्यावर उचलून पृथ्वीवर पडू न देणारा देव आणि अशा शेकडो अतर्क्य आकृत्या नशेत माणसाला दिसल्या असणार. यांपैकी ज्या आकृत्या आणि नशेतली एक प्रचंड आनंदाची अनुभूती हे एकत्र असत ते देव झाले आणि ज्या आकृत्या दिसल्या तेव्हा आनंदापेक्षा अधिक त्रास झाला त्या आकृत्या सैतान झाल्या. आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि विचित्र दिसतेय याचा अर्थ लावण्यासाठी माणसाने हे कोणीतरी दिव्य व दुसऱ्या जगातील अलौकिक वा स्पेशल लोक आहेत अशी समजूत करून घेतली आणि त्यातूनच देव वा सैतान या कल्पना जन्माला आल्या. माणसाला वेळोवेळी पडलेले अनेक अतर्क्य आणि अनाकलनीय प्रश्न आणि त्याला नशेतून आलेली ही विचित्र मात्र सुखावह अनुभूती यातूनच देव संकल्पना जन्मली असणार यात वाद नाही. आणि आदिमानवच नाही तर काय घ्या सॅक्रेड गेम्समध्ये दाखवलेय तसे अनेक सो कॉल्ड बाबा लोक आजही आपल्या प्रसादांतून भक्तांना कोणतेतरी सायकडेलिक ड्रग्जच देत असणार व कदाचित त्यामुळेच भक्तांना परमानंदाची अनुभूती होत असेल. 

Your Brain On Magic Mushrooms | IFLScience

 चित्र : सायकेडेलिक ड्रग्जमुळे मेंदूवर परिणाम होऊन होणारे विचित्र आभास

 

मानवी मेंदू विचार करायला लागला तेव्हा ज्या गोष्टी अतर्क्य वाटतात त्यांचे उत्तर शोधण्यासाठी देव नावाचे एक सोपे उत्तर त्याला मिळाले. आजारी का झालो? देवाने केले. पाऊस का पडतो? देव पाडतो. मी का जन्माला आलो? तर देवाचा काही प्लॅन आहे. जग कसे अस्तित्वात आले? तर देवाने बनवले. अशा स्वरूपात अनेक अनाकलनीय प्रश्नांसाठी देव हे एक खोटे पण चपखल उत्तर माणसाला मिळाले. पण हा देव अस्तित्वात आहे तर दिसत का नाही? असा प्रश्न आल्यावर मग तो देव दिसण्याची अनुभूती घेण्यासाठी हे अनेको सायकेडेलिक ड्रग्ज वापरण्यात आले. कुणालाही हे ड्रग्ज घेतल्यावर जे चित्रविचित्र भ्रम निर्माण होत ते म्हणजे देवच आहे अशी त्यांची समजूत होत राहिली. सायकेडेलिक ड्रग्जमुळे जे अत्यंत आनंदाचे अद्भुत असे फिलिंग येते त्यामुळे इतका आनंद देणाऱ्या या विचित्र आकृत्या नक्कीच दिव्य लोक वा देव असणार अशी माणसांची खात्री पटली असणार. मात्र अशा प्रकारे पॉप्युलर झाल्यावर आणि त्यामुळे या ड्रग्जची मागणी वाढल्यावर पुढेपुढे त्या ड्रग्जच्या वनस्पती कमी पडू लागल्या असतील. आणि त्यानंतर मात्र या ड्रग्ज घेण्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी मग कधीही हे ड्रग्ज डायरेक्ट न घेता त्यासाठी काही ठराविक दिवस/ऋतू ठरवले गेले असणार. अजून त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठाने वगैरे बनविण्यात आली असणार. अनुष्ठान केल्याशिवाय हे ड्रग्ज (किंवा प्रसाद) घेणे देवाला आवडत नाही वगैरे अफवा पसरवण्यात आल्या. या सगळ्या अटी पूर्ण करणारे सुद्धा खूप लोक असतील मग सगळे जुळून आल्यावरही वनस्पती पासून ड्रग निर्माण करण्यापर्यंतचा वेळ घालवण्यासाठी प्रार्थना वगैरे आल्या. त्यानंतर या वनस्पतींची अधिकच कमतरता भासू लागल्यावर मग मात्र काही विशिष्ट लोकांनाच हे मिळेल अशी व्यवस्था आली. नंतर या सगळ्या नशेच्या अवडंबरात पुढे अजूनच श्रेष्ठत्व आणण्यासाठी पवित्रता किंवा दिव्यतेची भावना घुसडण्यात आली आणि आणि मग देव हळूहळू प्रस्थापित झाले. अर्थात यात सुरुवातीला तरी काही भामटेगिरी नसेल. नशा आणि त्यातून होणारे भास किंवा भ्रम या खऱ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत असेच लोकांना वाटत असणार. योग्य ज्ञानच नसल्याने हे केवळ आपल्या मेंदूचे खेळ आहेत अशी त्या लोकांना कल्पनाही आली नसेल. त्यामुळे या अनुभूतींसाठी जे देव संकल्पनेचे एक्सप्लेनेशन त्यांना समर्पक वाटत होते त्याहून वेगळी इतर काही शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.  

 Buy Trippy Tapestry Mushroom God Space Colorful UV Backdrop XL Dark  Tapestry Psychedelic Uv-reactive Fluorescent Wall Art Online in India - Etsy

चित्र : सायकेडेलिक्सच्या भ्रमांतून दिसणाऱ्या आकृत्या ज्यांना संभाव्य देव समजले गेले असेल

 

माणसांचा एक सामान्य गुण असा आहे की माणूस हा खूप लवकर फॉलोवर बनतो. 'सबमिशन टू ऑथॉरिटी' हा माणसाचा मोठा सद्गुण आणि दुर्गुणही आहे. जेव्हा ऑथॉरिटीने सांगितलेल्या गोष्टीची तार्कीक चिकित्सा करून ती पडताळून पाहून मगच स्वीकारली जाते तेव्हा तो सद्गुण होय, आणि जेव्हा तार्कीक चिकित्सा न करता परंपरा, संस्कृती, भीती, अज्ञान, दुराभिमान यांपोटी काही स्वीकारले जाते तेव्हा तो दुर्गुण होय. कुणीतरी ऑथॉरिटी सांगतेय म्हणजे ते स्वीकृत करायचेच ही सहज सामान्य मानवी प्रवृत्ती आहे. कधी ही ऑथॉरिटी एखादा नेता असतो, कधी देवाचा पुजारी, कधी धर्मगुरू, कधी गुरु, कधी सोशियल मीडिया इन्फ्लुएन्सर तर कधी एखादे पुस्तक.!! आपण संविधानाचे नियम पाळतो हेही सबमिशन टू ऑथॉरिटीच आहे. यात संविधान ही ऑथॉरिटी आहे. काहींसाठी ती गीता, बायबल, कुराण अशीही असू शकते. आणि आजही बहुतांश (अगदी पीएचडी वगैरेंपर्यंत शिकले सवरलेले लोकही) तार्कीक चिकित्सा न वापरता सर्रास सबमिटेड टू ऑथॉरिटी होतात. आणि त्यांची ही ऑथॉरिटी देव, धर्म अशी काहीही असू शकते.
पण खरे हे आहे की माणसाला पडणारे सगळे प्रश्न सुटण्याइतके ज्ञान त्याला अद्याप प्राप्त झाले नसल्यामुळे देव नावाची एक युनिव्हर्सल संकल्पना त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणून जुन्या काळी समोर आली. पुढे काळानुरूप देव आहे तर दिसत का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. मग देव दिसणे ही सर्वसामान्य नाही तर वैयक्तिक अनुभूती आहे अशी अट आली. आणि ही वैयक्तिक अनुभूती सायकेडेलिक ड्रग्जमुळे वेगवेगळे अतर्क्य (ज्याला दिव्य सुद्धा म्हणू शकतो) दृश्ये बघितल्यामुळे अजून ठाम झाली. जसे गणितातील सगळ्या व्हेरिएबल्सला जर झिरो ही किंमत दिली तर अंकांऐवजी फक्त व्हेरिएबल्स असणारी जवळजवळ सगळी इक्वेशन्स परफेक्टली सुटतात. मात्र ही इक्वेशन्स अशाप्रकारे परफेक्टली सुटत असली आणि तद्वत कोणत्याही इक्वेशनसाठी शून्य हे चपखल उत्तर ठरत असले तरी ते खरे उत्तर नसते. तसेच देव हे अनेक प्रश्नांवरचे एक सपशेल खोटे पण चपखल उत्तर होते म्हणून ते पॉप्युलरली एक्सेप्ट झाले. इतकेच नाही तर निर्बुद्धपणे त्यावरून इतरांच्या हत्या सुद्धा करण्याइतकी माणसे त्या उत्तराने मोहित झाली. सोबतीला या कल्पनेच्या दृढीकरणासाठी सायकेडेलिक्स होतेच. नंतर नंतर तर ज्यांनी हे सायकेडेलिक ड्रग्ज आयुष्यात कधीही घेतले नाहीत ते लोकही 'सबमिशन टू ऑथॉरिटी' या गुणामुळे इतरांच्या नशेतील भ्रमांचे अनुभव ऐकून देव या संकल्पनेला अगदी आजतागायत शिरोधार्यच मानून चालले आहेत.  
असो, एक खूप छान वाक्य आहे. त्यात देव, धर्म या सगळ्या कल्पनांचे परफेक्ट सार सांगितलेले आहे.
Believing in your own hallucinations is called insanity, and believing in someone else's hallucinations is called as religion.



माहीतीचे संदर्भ:

https://psychedelicspotlight.com/5-examples-of-ancient-psychedelic-cave-art/
 

https://www.businessinsider.in/science/news/ancient-humans-were-getting-high-on-hallucinogenic-drugs-during-cave-rituals-3000-years-ago-study-claims/articleshow/99321171.cms
 

https://bigthink.com/the-past/psychedelic-origins-mystical-rites-religion/ 

 

चित्र सोर्स :

https://www.aboriginal-bark-paintings.com/wp-content/uploads/2020/03/Arnhen-Land-Cave-painting.jpg 

https://i0.wp.com/www.mushroomthejournal.com/wp-content/uploads/2015/01/Selva-Pascuala_20110929mushroom_closeups_036.jpg?resize=650%2C433&ssl=1

https://www.imperial.ac.uk/news/image/mainnews2012/23110.jpg

https://i.etsystatic.com/18130733/r/il/94f8be/3777150921/il_570xN.3777150921_2b6z.jpg


..

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

The evolution of god and religion - in seven generations (देवाची उत्क्रांती)

जशी सजीवांची उत्क्रांती होत असते तशी मानवी समाजात देवाची आणि त्याच्या जोडीने धर्मांचीही उत्क्रांती होत गेलेली आहे. देवाचा जन्म कसा झाला हे युवाल हरारीने 'सेपियन्स' मध्ये छान सांगितले आहे. त्यामुळे आपण सरळ तो कसा बदलत गेला याची ढोबळ सात जनरेशन्समध्ये टाइमलाईन बघू. तशी देव ही संकल्पना इतकी कॉम्प्लेक्स होत होत इव्हॉल्व्ह झाली आहे की त्याचे ७०० वा अगदी ७००० जनरेशन्स मधेही परफेक्ट वर्गीकरण होणार नाही. त्यामुळे हे अगदीच ढोबळ निरीक्षण आहे हे लक्षात घ्यावे.  
सगळ्यात आधी फर्स्ट जनरेशनचा देव ही एक अदृश्य शक्ती होती. आणि तो कुठेतरी वर आकाशात स्वर्ग नावाच्या काल्पनिक जागेत राहत होता व तिथूनच मानवाच्या जीवनाला प्रभावित करत होता. पण या कल्पनेला खूप दिवस झाले. त्यात काही थ्रिल राहीले नाही. असा कसा देव जो कसा दिसतो तेही माहीत नाही? देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसला पाहीजे ही कल्पना प्रबळ होऊ लागली. मग दुसऱ्या जनरेशन मध्ये सूर्य, आकाश, चंद्र, पाऊस हेच देव आहेत असे जगातल्या सगळ्या संस्कृतींत सांगण्यात आले. आता देव अदृश्य मधून दृश्य स्वरूपात तर आला, पण लवकरच हे सगळे सुद्धा अगदीच सामान्य होऊन गेले. सूर्य असो की आकाश की इतर काही असे विश्वाचा भाग असलेले देव, ते नित्याचेच होते आणि काहीच वेगळे करत नव्हते. आता देवाला नुसते दृश्य नाही तर ऍक्टिव्ह सजीव/मानवी रूप दिले पाहीजे आणि त्याने याच रूपातून विश्वाची निर्मिती वा संचलन केले पाहीजे ही नवी कल्पना समोर आली आणि तिसऱ्या जनरेशन मध्ये मग ग्रीकचा केऑस वा भारताचा ब्रम्हा असे अनेक मानवसदृश सजीव स्वरूप घेतलेले देव निर्माण झाले. या जनरेशनच्या देवांचे जन्म कुठेतरी अतर्क्य ठिकाणी, अतर्क्य पद्धतीने होत होते (म्हणजे पित्या व मातेपासून होत नव्हते). आणि या जनरेशनचे देव लाखो करोडो वर्षे राज्य करत होते. उदाहरणार्थ चीनच्या 'युहांग' या देवाने १७५० इऑन इतका काळ राज्य केले. एक इऑन म्हणजे एक लाख ३० हजार वर्षे. असेच काहीसे अचाट कालमापन आपल्याकडेही युग वगैरे कल्पनांच्या बाबतीत सुद्धा आहे. इतकेच काय तर या देवांना जी मुले होत होती तीही नेहमीच्या पद्धतीने होत नव्हती. ती मुले उपजत नव्हती तर तयार केली जात होती. अशा प्रकारे मग कुणी टायटन्स जन्माला घालत होता तर कुणी सूर्यचंद्र. पण कल्पनेत का होईना मानवसदृश रूपात आले असले तरी अजूनही हे सगळे देव माणसाच्या संपर्काच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांचाही प्रभाव कमी होऊ लागला. मग देव आपल्याला डोळ्यांनी दिसला पाहीजे ही कल्पना तर मानवाच्या मनात आलीच पण तो प्रत्यक्ष आपल्यात आला पाहीजे, या पृथ्वीवर वावरला पाहीजे अशी साधारण लोकांची भावना होऊ झाली. आता पहील्या जनरेशनचा अदृश्य/रूप नसलेला देव असो वा दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन मधला रूप असलेला मात्र कुठल्यातरी अनएक्सेसिबल ठिकाणी राहणारा देव असो, तो लोकांना जास्त रुचेना. हळूहळू मानवाची बौद्धिक वैचारिक पातळी वाढू लागल्याने या तीन जनरेशन्सच्या देवांवर प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली.
मग आले चौथ्या जनरेशन मधले देव अवतार रूपात पृथ्वीवर. आता देवांनी माणूस म्हणूनच जन्म घेतला जेणेकरून तो लोकांना अधिक आपलासा वाटावा. मग एक साधारण माणूस म्हणून जन्मलेला कृष्ण गीतेत म्हणाला की मीच देव आहे. जगातल्या अनेक संस्कृतींत अनेक जण देव म्हणून घोषित झाले. तेच राजे झाले, मग त्यात भारताचा कृष्ण असो की मेसोपोटेमियाचा नरामसन. खूप वर्षे हे देव चालले. माझ्यामते देवाच्या मानवी अवताराला (म्हणजे खरेतर राजाला) प्रत्यक्ष असलेल्या शहरांशी/ठिकाणांशी जोडण्याची कल्पना सगळ्यात श्रेष्ठ होती कारण रामानंतरही कित्येक वर्षांनी लोक अयोध्या वा पंचवटी हे प्रत्यक्ष पाहू शकत होते. ही अशी मथुरा, जेरुसलम, मक्कासारखी जिऑग्राफिकल लोकेशन्स देवाशी निगडित करण्याच्या कल्पनेमुळे देवाचा प्रभाव कित्येक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकत होता. म्हणजे देव कुठल्यातरी अतर्क्य आणि न दिसणाऱ्या स्वर्ग या ठिकाणाहून आधी सूर्य पाऊस आदी रूपांत दृष्टीक्षेपात म्हणजे आकाशात आला. आणि पुढे तर तो थेट पृथ्वीवर मानवी शहरांतच आला. पण देव पृथ्वीवर आला आहे आणि तरीही तो आपल्याला हवे तसे का करत नाही? अशी लोकांची भावना झाली. देव इतका कमजोर आहे का? की तो प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊनही इथले दुःख संपवू शकत नाही? बरे हा देव स्वतः राजा/सम्राट बनतो पण आम्हाला मात्र गरीबच ठेवतो. अशी जागरूकता समाजात येऊ लागली. मग यातून लोकांना पटेल असा देवाच्या ऑथॉरिटीचा दुसरा मार्ग शोधण्याची धडपड चालू झाली आणि मग आला पाचव्या जनरेशनचा येशू ख्रिस्त. त्याने सांगितले की मी देव नाही तर देवाचा पुत्र आहे. तोही सम्राट वगैरे नाही तर लोकांहून गरीब, भणंग फकीर असलेला पुत्र.! अर्थातच देवापेक्षा देवाच्या पुत्राकडून लोकांनी कमी अपेक्षा करायला हवी. पण नाही, नेपोटीजमला अगदी आजपर्यंत मानवी समाजात किती महत्व आहे हे आपण पाहतोच. त्यामुळे देव नाही देवाचा पुत्र असला तरी त्यानेही तेवढेच चमत्कार केले पाहीजेत अशी लोकांची अपेक्षा झाली. आता रे ब्वा? मग आता यातून मार्ग काढण्यासाठी पुढच्या सहाव्या जनरेशन मध्ये आले प्रेषित मुहम्मद. त्यांनी सांगितले की ना मी देव आहे ना मी देवाचा पुत्र आहे. मी फक्त देवाचा प्रेषित म्हणजे मेसेंजर आहे. मी काही चमत्कार करणार नाही. जे करायचे ते देव करणार. मी फक्त देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवणार. आता फक्त देवाचा संदेश पोचवणारा प्रेषित आला आहे म्हंटल्यावर चमत्कार वगैरे करण्याचा काही प्रश्नच राहत नाही वा आपल्या अडचणी सांगून देवाला जबाबदार ठरवण्याचाही प्रश्न येत नाही. प्रेषित हा मुख्यत्वे एकमार्गी संदेशवाहक असतो. म्हणजे फक्त देवाचा संदेश माणसांना पोचवणारा. माणसांचे संदेश देवापर्यंत पोचवणे हे त्याचे काम नोहे. ही प्रेषिताची संकल्पना तशी खूप काळ अनचॅलेंज्ड रहायला हवी होती पण लवकरच यांनतरही मग नवी कल्पना घेऊन आले सातव्या आणि लेटेस्ट जनरेशनमध्ये गुरु नानक. ते ना देव होते, ना देवाचे पुत्र, ना देवाचे प्रेषित. ते फक्त देवाचा संदेश चांगल्या रीतीने समजावून सांगणारे गुरु होते.  
काळानुसार प्रबोधन आणि एकंदर प्रगतीमुळे मानवी समाज बऱ्याच अंशी वैचारिक दृष्ट्या प्रगत होत गेला. आणि या सगळ्या देव वगैरेंसारख्या गोष्टींबद्दल त्याच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. एकंदर देवाच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या ऑथॉरिटीवर आक्षेप घेण्याची किंवा प्रूफ मागण्याची लोकभावना कालानुरूप अधिकाधिक रुजू लागली. जशी जशी पुढची पिढी हुशार होत जाईल तशी तशी या ऑथॉरिटीची जवाबदेही देखील वाढत राहील आणि पुढे घोषित होणाऱ्या प्रेषित अथवा गुरूंवर म्हणजे पर्यायाने देवावरच प्रश्न उपस्थित होतील म्हणूनच मग माझ्यानंतर कोणीही प्रेषित होणार नाही हे प्रेषित मुहम्मद यांनी आणि गुरु ग्रंथ साहीब हेच इथून पुढे गुरु राहतील, नवे गुरु जन्माला येणार नाहीत असे गुरु गोविंद सिंग यांनी जाहीर केले. सातव्याच जनरेशनमध्ये घेता येतील अशा दलाई लामांच्या प्रथेलाही कदाचित लवकरच असा कायमस्वरूपी अंत मिळेल. 

आधी सांगितल्याप्रमाणे देव संकल्पनेचा इतका बहुरंगी आणि व्यापक विस्तार झाला आहे की आज देव या संकल्पनेची केवळ एक सर्वमान्य अशी व्याख्या सुद्धा होऊ शकत नाही. इतकेच नाही तर इतके प्रबोधन व वैचारिक जागरूकता होऊनही आजही अगदी पहील्या जनरेशन पासून ते सातव्या जनरेशन पर्यंतच्या प्रत्येक व्हर्जनला मानणारे कोट्यवधी लोक आहेत. काही जुन्याच स्वरूपाला मान्य करणारे आहेत, काही जुन्या नव्या दोन्ही स्वरुपांना मानणारे आहेत तर काही नव्या स्वरुपांना मानणारे आहेत. जोपर्यंत भीती, असहायता किंवा अज्ञान या गोष्टी राहतील तोपर्यंत जुन्या/नव्या स्वरूपात देव हे टिकूनच राहतील. त्यामुळे इथून पुढेही देवांचे हे इव्होल्यूशन चालूच राहील. पण हे खरे की देवाचे इव्होल्यूशन हे एका अदृश्य अतर्क्य चमत्कारी शक्तीपासून आता अधिकाधिक मानवी आणि बिना चमत्कारी स्वरूपाचे होत चालले आहे. पुढे कधी जेव्हा ते तंतोतंत मानवी होईल तेव्हा देव नष्ट होतील.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देव

 
 

आईन्स्टाईन हा गोष्टी समजून घेण्यासाठी इतक्या चपखल आणि सोप्या संकल्पना वापरतो की बस्स. आईन्स्टाईन म्हणतो की जगातील एकूण एक पवित्र मानले गेलेले धर्मग्रंथ हे फक्त आणि फक्त मनोरंजनात्मक आणि अवास्तव अशा बालबुद्धीच्या कथांनी भरून पडले आहेत. त्यांना खरे मानणे वा त्यांवर विश्वास ठेवणे हे केवळ बालिशबुद्धी असलेल्या माणसांचेच काम होय. आईन्स्टाईनच्या या वक्तव्याचा विचार केला तर खरेच पटते की, पंख असलेली माणसे, अर्धा माणूस अर्धा प्राणी असलेली पात्रे, प्राण्यांच्या पोटी जन्मास येणारी माणसे किंवा माणसांच्या पोटी जन्मणारे प्राणी, माणसांची भाषा बोलणारे पशुपक्षी, मरून पुन्हा जिवंत होणारे लोक, अचानक अदृश्य होणारे लोक, पाण्यावरून पायी चालणारे लोक, हवेत उडणारे लोक, लैंगिक संबंधाविना नुसत्या प्रार्थना वा आशीर्वादाने जन्मणारे लोक, स्वर्ग-नरक ह्या अशा निर्बुद्ध गोष्टींनी जगातले तमाम पवित्र धर्मग्रंथ भरून पडले आहेत. मग विचार करा की या अशा बालिश कथांना खरे मानणारे, त्याच्यासाठी दुसऱ्या माणसांशी लढणारे लोक हे मूर्ख नव्हेत तर अन्य काय?
ही वरची सगळी बालिश कृत्ये करणाऱ्या पात्रांना देव असे म्हणण्यात येते. आणि देव हीच संकल्पना माणसाच्या संपूर्ण इतिहासात त्याच्या प्रगतीस एकंदर सर्वाधिक बाधित ठरली आहे. म्हणजे कसे? तर माणसाला अत्यंत कुशल क्षमतेचा मेंदू तर मिळाला, मात्र देव या संकल्पनेने त्याला चिकित्सा आणि औत्सुक्य, विवेकपूर्ण विचार, तर्कबुद्धी या मौल्यवान गुणांपासून दूर ठेवले, जेणेकरून या मेंदूचा उपयोग त्याला योग्य रीतीने करताच आला नाही. म्हणजे असे की, माणसाला पाऊस का पडतो, आजार का होतात, सूर्य का उगवतो? विजा का चमकतात, बियातून झाड का उगवते, एका प्राण्याच्या पोटी तोच प्राणी का जन्माला येतो, माणसे अकाली का मरतात हे आणि असे कित्येक प्रश्न लाखो वर्षांपासून पडत राहीले. पण या सर्वप्रश्नांचे उत्तर म्हणून हे सगळे देव करतो हे अत्यंत सुमार परंतु चपखल कारण मान्य केल्यामुळे त्याच्या बुद्धीला पुढे या आणि अशा इतर प्रश्नांवर विचार करण्याची, तर्काधारित, विवेकपूर्ण कारणे शोधण्याची गरजच पडली नाही. आणि त्यामुळे बहुतांश काळ मानवी आयुष्य हे एखाद्या साचलेल्या दुर्गंधी डबक्यासारखे अप्रवाही बनून राहिले. केवळ एक वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याने माणसाच्या लाखो पिढ्या देव या सुमार संकल्पनेच्या प्रभावाखाली एका अत्यंत मर्यादित अशा कुपमंडूकासारख्या जीवनशैलीत खितपत पडल्या. उदाहरणार्थ एखादा आजार का झाला? याला जर तो देवाच्या कोपामुळे झाला हे उत्तर मान्य केले की मग आजाराची नेमकी कारणे शोधणे, त्यावर इलाज शोधणे, आजार टाळण्याच्या उपायांचा विचार, अभ्यास करणे या सगळ्या क्रिया आपोआप रद्दबातल होतात. आजार होणे वा तो बरे होणे हे देवावर सोपवल्याने माणसे इलाज शोधण्याच्या कामी निरुद्योगी राहून मागच्या लाखो पिढ्यांत प्रचंड प्रमाणात नाहक मरत राहीली आहेत. माणसाची आज जी काही प्रगती झाली आहे ती देव या संकल्पनेला छेद देण्यापासूनच सुरु झाली आहे. आग का लागते? तर देव लावत असेल म्हणून आग लागते या विचारातून बाहेर पडून गारगोट्या घासून माणसालाही आग निर्माण करता येते ही जाणीव होणे हा मानवी प्रगतीचा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरतो. आग ही माणसाच्या कंट्रोल मध्ये न येता एक दैवी गोष्टच राहीली असती तर आपण काहीच प्रगती करू शकलो नसतो. देव आणि प्रगती हे म्हणूनच एकमेकांना म्युच्युअली एक्स्क्लुडेड आहेत. देव प्रभावी असला की प्रगती खुंटणार आणि देव कमजोर झाला की प्रगती वाढणार हेच खरे आहे. कुठेतरी आपल्यासाठी अतर्क्य असणाऱ्या गोष्टींचे कारण वा कारक हा देव आहे हा संस्कार मनात ठेवल्यामुळे आपली तर्क आणि विचारांची पातळी एक मर्यादा ओलांडू शकत नाही. आणि गंमत म्हणजे हेही खरे आहे की इतिहासात ज्यांना कळले की देवबिव काही नसते, त्यांनी देव या संकल्पनेचा अत्यंत चतुराईने वापर करून इतरांवर त्याच देवाची भीती घालून विनासायास राज्य केले.

आपण भारतीय लोक हे अत्यंत बुद्धिमान आहोत असे मानतो, आणि ते खोटेही नाही. पण तरीही एक सीव्ही रामन सोडले तर अजून एकही विज्ञान नोबेल आपण मिळवू शकलो नाही. का? तर माझ्या मते तरी देव, कर्म, अध्यात्म, धर्मग्रंथ या आणि अशा अनेक भ्रामक समजुती आणि संस्कारांनी आपण नकळत स्वतःस मर्यादित करून ठेवले आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणविण्याची आणि चाकोरीबाहेरचा तर्कशुद्ध विचार करण्याची आपली क्षमता ही त्या अनेक भ्रामक गोष्टींच्या पगड्याखाली मर्यादितच राहते. अर्थात केवळ नोबेल मिळविणे हाच वैज्ञानिक प्रगतीचा निकष आहे असे माझे म्हणणे नाही, आणि याचे स्पष्टीकरणही मी पुढे देतच आहे.
 
वाईट गोष्ट ही की आहे की मानवाने अगदी इवल्याशा काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून इतकी देदीप्यमान प्रगती करूनही आजही अगदी शिक्षित लोकांच्याही मानेवरून देव या तद्दन खोट्या आणि बालिश संकल्पनेचे जोखड उतरले नाहीय. अशा गोष्टींचेही स्पष्टीकरण आईन्स्टाईन अत्यंत हुशारीने देतो. आईन्स्टाईन सांगतो की well educated आणि well trained यात जो फरक आहे तोच शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या आणि न बाळगणाऱ्या लोकांत आहे. म्हणजे कसे की तुम्ही एखाद्या कुत्र्याला वा सर्कशीतील प्राण्याला जर trained केले तर तो अतिशय चित्तथरारक अशा कसरती लीलया करू शकतो. मात्र तो well trained असलेला कुत्रा वा प्राणी एखाद्या वैज्ञानिक आणि विवेकपूर्ण प्रश्नावर मात्र अजिबात विचार करू शकत नाही. याचप्रमाणे अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले परंतु तरीही देव वा इतर कोणत्याही भ्रामक संकल्पनांना शिरोधार्य मानणारे लोक हे त्या well trained कुत्र्या वा सर्कशीतील प्राण्यांहून काहीही वेगळे ठरत नाहीत. एखाद्या क्षेत्रात वा एखाद्या विषयात असे लोक अगदी अतोनात प्राविण्य मिळवू शकतात, पण सारासार विवेकबुद्धी वा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यातून येणारी चाकोरीबाहेरचा विचार करायला लावणारी कल्पकता त्यांच्याकडे नसल्याने एका मर्यादेबाहेर ते प्रगती करू शकत नाहीत.

समजा एक संपूर्ण देशात टॉप मारलेला इंजिनियर आहे, तर त्याने टॉप मारले म्हणून तो well educated झाला असे नव्हे. तर त्याने त्या क्षेत्रात इतरांनी पूर्वीच केलेल्या कामात अत्यंत अधिक प्राविण्य मिळविले आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. तो well educated झाला असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तो त्याला शिकविलेल्या गोष्टींच्याही पलीकडे जाऊन, त्याच्या जुन्या संकल्पनांच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन विज्ञाननिष्ठ विचार करून त्याच्या क्षेत्रात अजून वेगळी आणि नवी मौलिक भर टाकू शकेल. आपण well trained तर होतो पण well educated होत नाही म्हणून नवनिर्मिती किंवा एखादी अगदी जगावेगळी, विस्मयकारी कन्सेप्ट जन्माला घालू शकत नाही. आपली शैक्षणिक व्यवस्था आपल्याला फक्त well trained बनवते. किंबहुना आपण कदाचित जगातील सर्वात श्रेष्ठ well trained माणसे बनवू शकतो. पण यामुळे आपण पूर्वीच्याच गोष्टी अजून थोड्या मॉडिफाय करणे अथवा आधीच्या स्ट्रॅटेजीत थोडा वेगळा एप्रोच घेणे याबाहेर काहीही करत नाही. अर्थात हेही प्रगतीच्या दृष्टीने एक पुढचे छोटेसे पाऊल असले तरी आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातील मर्यादेमुळे आपल्याकडून अगदी ग्राउंडब्रेकिंग म्हणता येईल अशी कामे घडत नाहीत हेच सत्य आहे. म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनात अगदी शून्य आहोत असेही नाही, पण आपण फक्त एका सेफ आणि सोयीस्कर अशा लिमिटपर्यंतच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो. तो पूर्ण स्वतःत भिनवत नाही. 

वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त विज्ञान याच विषयाशी संबंधित नव्हे. इतिहास, कला, भाषा, व्यवसाय, राजकारण इतकेच काय तर धर्मासहीत प्रत्येक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन हा बेस्ट आऊटपुट देऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करणे ती तर्क, विवेक आणि विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेणे, प्रत्येक दाव्यावर प्रश्न उपस्थित करून विवेक आणि तर्काच्या निकषांवर त्याची उत्तरे अथवा उद्देश तपासून पाहून मगच ते स्वीकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य, पूर्वग्रह हे नाकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय. ग्रंथप्रामाण्य म्हणजे कोणत्याही ग्रंथात वा पुस्तकात लिहिले आहे म्हणून त्यास सत्य मानने. यात फक्त धर्मग्रंथ येतात असे नव्हे, तर अगदी विज्ञानाच्या पुस्तकांतही जे लिहिले आहे ते शतप्रतिशत खरेच आहे असे मानण्यालाही वैज्ञानिक दृष्टिकोन नकार देतो. धर्मग्रंथ असो, राजकीय ग्रंथ असो वा अगदी वैज्ञानिक जर्नल असो, त्यांना पवित्र वा श्रेष्ठ मानून जसेच्या तसे न स्विकारता त्यातील प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या, तर्काच्या आणि विवेकाच्या कसोटीवर पारखून घेणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य नाकारणे होय. याचप्रमाणे कोणा मोठ्या धर्मगुरूने, धर्मसंस्थापकाने, नेत्याने, देवाने, देवाच्या पुत्राने, देवाच्या प्रेषिताने किंवा एखाद्या सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाने जरी एखादी गोष्ट सांगितली असेल तरीही ती आदरापोटी वा श्रद्धेपोटी वा भीतीपोटी जशीच्या तशी न स्विकारता तर्क आणि बुद्धीच्या कसोटीवर तपासून घेणे म्हणजे व्यक्तिप्रामाण्य नाकारणे होय. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, भावनांचा पगडा न ठेवता तथ्यांवर विचार करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. बुद्धिप्रामाण्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. समजा एखादा माणूस इतिहासाचा अभ्यास करत आहे, मग जर त्याने आधीच ठरवले असले की अमुक राजा चांगला आणि अमुक राजा वाईट तर तो कधीही जे सत्य आहे ते शोधू शकणार नाही. कारण त्याच्या मनात एक पूर्वग्रह आहे. याचप्रमाणे आपला आणि परका ही भावना मनात ठेवून कुणाचीही वा कशाचीही तुलना केली तर तीही चुकीचीच ठरेल. थोडक्यात काय तर बुद्धिप्रामाण्य स्वीकारणे, आणि ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य नाकारणे, पूर्वग्रह त्यागणे म्हणजेच well trained ची सीमा ओलांडून well educated होणे होय.  
 
आजच्या जमान्यातही सर्वदूर आढळणारी अत्यंत खेदाची गोष्ट ही की बाकी तर सोडाच पण अगदी वैज्ञानिक क्षेत्रातील कित्येक माणसेदेखील पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाहीत जेणेकरून ते ही well trained ची सीमा ओलांडून well educated हा दर्जा गाठू शकत नाहीत. देव किंवा इतर अनेक भ्रामक संस्कारांतून ते बाहेर येऊ शकत नाहीत आणि त्यायोगे ते नकळत स्वतःलाच मर्यादा घालून घेतात. जरी एखाद्या तंत्रज्ञान वा विज्ञानाच्या क्षेत्रात असे लोक अतिशय प्रवीण असले तरीही त्यांच्या मानसिकतेत कुठेतरी आत देव ही अवैज्ञानिक आणि असत्य संकल्पना प्रभाव टाकत असल्याने ते एका मर्यादेबाहेरचा विचार करू शकत नाहीत हे खरेच आहे. अर्थात वर सांगितल्याप्रमाणे ही well trained आणि well educated ची सीमा अधोरेखित करणारी फक्त देव ही एकमेव संकल्पना नाही. अनेक पूर्वग्रह, मर्यादित विचार, संकुचित वृत्ती असे इतरही खूप कारक आहेत. एवढेच की देव हा या सगळ्यांपैकी सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक सार्वत्रिक असलेला कारक आहे.

मागे पुण्याच्या मेटेरॉलॉजी डिपार्टमेंटच्या मुख्य वैज्ञानिक असलेल्या एका शास्त्रज्ञ स्त्रीने नाही का पितरांचे जेवण दुसऱ्या जातीच्या स्त्रीने बनवल्यामुळे ते बाटले म्हणून पोलीस तक्रार केली होती. पहीली गोष्ट म्हणजे शास्त्रज्ञ असूनही पितर श्राद्ध वगैरे घालणे आणि त्यातही एका विशिष्ट जातीच्या व्यक्तीने त्याचा स्वयंपाक केला म्हणून ते बाटले असा ग्रह करणे हे दोन्ही विचार चूक किंबहुना शुद्ध भंकसच होत. पण मुख्य शास्त्रज्ञ असूनही त्या मॅडम या well trained आणि well educated ची सीमा ओलांडू शकल्या नाहीत. मागे एका भारतीय वंशाच्या नासात काम करणाऱ्या स्त्रीने आपल्या डेस्कवर कोणत्यातरी देवतांचा फोटो असल्याचे पोस्ट केले होते. एका हायकोर्ट जजने वक्तव्य दिले होते की सेक्स केल्याने नव्हे तर मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते. आपल्या आरबीआयच्या एका गव्हर्नरने तर अय्यपाच्या अवकृपेमुळेच केरळात पूर आला असेल का याची शक्यता कोर्टाने पडताळून पहायला हवी असे बोलले होते. म्हणजे पहा ना, हे सगळे लोक अत्यंत उच्च शिक्षित आणि त्या त्या क्षेत्रात सर्वाधिक प्राविण्य मिळवून अगदी टॉपला पोचलेले लोक आहेत, दोन जणी तर शास्त्रज्ञ आहेत, आणि तरीही हे सगळे लोक अशी निरर्थक निर्बुद्ध वक्तव्ये, कामे करतात. याचे कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि well trained ची सीमा ओलांडून well educated होण्यातली त्यांची असमर्थता होय. आता यावर देव आणि इतर धार्मिक अंधश्रद्धांच्या समर्थनार्थ अनेक लोक बाबा बुवांच्या दारी जाणारे डॉ. अब्दुल कलाम आणि स्वप्नात येऊन देवीने गणित सांगितले असे म्हणणारे रामानुजन यांची उदाहरणे देतात. पण दुर्दैवाने हेच म्हणावे लागेल की या दोघांचे त्यांच्या क्षेत्रातील प्राविण्य अत्यंत अलौकिक होते यात काही वादच नाही, मात्र माणूस एका क्षेत्रात खूप प्रवीण असला म्हणून तो माणूस इतरही प्रत्येक क्षेत्रात आदर्शच असेल नाही. म्हणून त्यांच्या क्षेत्रात अत्यंत प्रवीण असले तरी अब्दुल कलाम हे बाबा बुवांच्या समोर लीन होणे या कृतीत सपशेल चूकच ठरतात (तू कोण मोठा टिक्कोजीराव?असा मला प्रश्न विचारला जाणे क्रमप्राप्तच आहे. पण एखादा कोणी मोठा टिक्कोजीराव नाही म्हणून जे चूक आहे त्याला चूक म्हणण्यास तो लायक नाही असे थोडेच आहे?). आणि रामानुजन यांचीही स्वतःच्या खालावत्या प्रकृतीबद्दलची काळजी आणि ढासळता आत्मविश्वास, यामुळे त्यांनी दैवी गोष्टींमध्ये आधार शोधणे ही मानसिकता अधोरेखित होते. तसेही आपल्या कामाला दैवी गोष्टीची वा पावित्र्याची जोड दिली की त्याचे महत्व वाढते आणि चिकित्सा कमी होते हे जे तमाम धर्मसंस्थापकांनी वापरलेले तंत्र आहे त्याचा मोह रामानुजन यांनाही झाला असल्याची शक्यता कशी नाकारायची? आणि खरेतर हे दोघेही सोडा, देव वा इतरही आपली वैचारिक मर्यादा अत्यंत संक्षिप्त ठेवणारे भ्रम, पूर्वग्रह  यापासून अगदी नोबेल विजेते शास्त्रज्ञदेखील वाचू शकलेले नाहीत. आजपर्यंत अनेकांना दोन दोन नोबेल पारितोषिके मिळाली आहेत, पण या दोनपैकी एकतरी नोबेल हे सहसा विभागून एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिलेले नोबेल असते. मात्र दोन्ही नोबेल पारितोषिके ही एखाद्या व्यक्तीला एकट्यालाच मिळाली असा जगात फक्त एकच शास्त्रज्ञ आहे. तो शास्त्रज्ञ म्हणजे लायनस पाउलींग होय. तर पाउलींग याला सुद्धा विशेषतः व्हिटॅमिन सी बद्दल असाच एक भ्रम होता (आता करोना काळातही या व्हिटॅमिन सी वर लोकांची खूप मर्जी जडली होती). पाउलींगचा क्लेम होता की त्याला जी लाइफलॉंन्ग सर्दी होती त्यावर व्हिटॅमिन सी हा अत्यंत बिनतोड इलाज होता. म्हणून त्याने व्हिटॅमिन सी चे अत्याधिक सेवन केले, आणि त्याने आपली सर्दी बरी होत असल्याचाही दावा केला. पण अर्थातच व्हिटॅमिन सी ने सर्दी बरी होत नाही हे आता सिद्ध झाले आहे, मात्र पाउलींग उगीचच आयुष्यभर हा एक भ्रम उराशी बाळगून राहीला. तेच जर त्याने असा कोणताही पूर्वग्रह न बाळगता सर्दीवर काम केले असते तर कदाचित एखादे अत्यंत प्रभावी औषध शोधूही शकला असता. आता दोन वैयक्तिक नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या एकमेव महान शास्त्रज्ञाचीही एखाद्या अवैज्ञानिक वा पूर्वाग्रही भ्रमापायी जर ही स्थिती होती तर इतर कुणाची काय व्यथा.
 
आमची भक्तीभावना आहे तर तुला ती दुखावण्याचा वा खोटी ठरविण्याचा अधिकार कुणी दिला? हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देव यांच्या कॉन्फ्लिक्टमधला सर्वात पॉप्युलर प्रतिरोध (किंवा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रगतीसाठी अवरोधच) आहे. तर्काधारित प्रतिवाद उरला नाही की मग भावनांचे दुखावणे समोर आणले जाते. किंवा फक्त आमचेच का दिसते? अमक्याचे नाही दिसत का? अशी व्हाटअबौटरी केली जाते. आमचे आम्ही पाहून घेऊ तुला जशी काशी करायची ती कर आम्हाला लै ग्यान देऊ नको असे लोक सर्रास बोलताना आढळतात. अनेक लोक असेही म्हणतात की आमची तर श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. आणि अंधश्रद्धा इज रॉंग, बट श्रद्धा इज करेक्ट. पण खरेतर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. ज्या गोष्टी वैज्ञानिक वा इतर कायदेशीर पुराव्यांनी सिद्ध करता येत नाहीत तरीही त्या खऱ्या आहेत असे मानने म्हणजेच श्रद्धा. मग अंधश्रद्धा काय वेगळी असते? जी तर्काधारित चिकित्सेला घाबरते ती श्रद्धा ही अंधश्रद्धाच होय, किंबहुना श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वेगळ्या गोष्टी नाहीतच.

नव्या युगात आपल्या मानसिकतेत परिवर्तन येत आहे, मात्र त्याचा वेग कमी आहे. आपल्यातील बहुसंख्यांनी परिवर्तनाचा मार्ग अंशतः स्वीकारला असला तरी तो अगदी थोडासाच पादाक्रांत केला आहे. त्यामुळे होते काय की आपण अनेक बाबतींत विज्ञानवादी आहोत वा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आहोत हे सिद्ध करण्यासाठी लोकांकडे भरपूर अनुभव वा उदाहरणे असतात. मात्र खरेच बुद्धीची कसोटी पाहणाऱ्या काही बाबींत त्यांची भावना आणि बुद्धी यांच्यात कोण श्रेष्ठ आहे ते दाखविणारी मर्यादा अधिक स्पष्टपणे अधोरेखित होते. ही धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अवस्था असलेले आपल्या आजूबाजूला कोट्यवधी लोक आहेत, ज्यांना कुठेतरी देव वा इतर भ्रामक गोष्टी या अस्तित्वात नाहीत याची जाणीव तर असते पण कुठल्याशा अनामिक भीतीने वा संकोचाने वा ओढीने वा सामाजिक दबाव आणि वैयक्तिक भावनांपोटी ते हे पूर्णपणे स्वीकारण्यास तयार होत नाहीत. आणि म्हणून ते एखाद्या क्षेत्रात अतिशय प्रवीण झाले तरी त्यांच्या कक्षा अरुंदच राहतात. ते पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अमर्याद व्याप्तीची अनुभूती आणि फायदा घेऊ शकत नाहीत. व्यक्तिप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, पूर्वग्रह नाकारून आणि तर्क व बुद्धिप्रामाण्य स्वीकारूनच आपण वैज्ञानिक दृष्टिकोनावर खरे उतरू शकतो. पारंपरिक परिप्रेक्ष्यातील उदाहरण द्यायचे तर आपल्या भारतीय तत्वज्ञानात मोक्ष ही जीवनाच्या अंतिम ध्येयप्राप्तीची अवस्था सांगितली आहे. ती जशी इहलोकाच्या एकूण एका मोहाचा म्हणजे अगदी देह आणि प्राण याही मोहांचा त्याग केल्याशिवाय प्राप्त होत नाही असे सांगितले जाते, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन ही अवस्था देखील देव, धर्म वा इतरही सारे अवैज्ञानिक, अतार्किक भ्रम आणि पूर्वग्रह यांचे स्वतःतून समूळ उच्चाटन केल्याशिवाय पूर्णतः प्राप्त होत नाही.

..

English translation Follows


Einstein uses really simple and straightforward concepts to understand things. Einstein says that the all the scriptures, which are considered to be the holiest in the world, are filled only with mere entertaining and unrealistic childish stories. Believing them to be true or believing them itself is only the job of people with childish intellect. Considering Einstein's statement, isnt it true that these scripture contain totally fake and imaginary characters like people with wings, half human half animal characters, human beings born to animals and vice versa, animals that speak human language, people who die and come back to life, people who suddenly become invisible? Aren't all the holy scriptures in the world filled with such ignorant things as people walking on water, people flying in the air, people being born with mere prayers or blessings without sexual intercourse? Aren't these things totally childish? Then tell me if the people who believe these childish stories to be true, who fight for them with other people are completely fool or not?
The characters who do all the above mentioned childish deeds are called gods. And the very concept of God has been the biggest obstacle to man's progress throughout world history. Man got a brain of highly skilled ability, but the concept of God kept him away from valuable qualities like curiosity, rational thinking, reasoning, so that he could not use this brain properly. See, why does it rain, why do people get sick, why does the sun rise? Why lightning flashes, why a tree grows from a seed, why the same animal is born from the womb of the same species, why people die prematurely and so many other questions have been appearing in human mind for millions of years. However a fake but well fitting answer to all these questions was that God does all this. So when this answer or cause i.e. god is accepted, there is no need for humans to come forward and think of such questions, to find rational, rational reasons behind them. And so for most of the time, human life has remained like a stinking puddle. In the absence of scientific approach, millions of generations of human beings have been influenced by the concept of God to live a very limited Kupmanduk-like lifestyle. For example, why does a disease occur? If the accepted answer to this is that it is due to God's wrath, then there remains no question of all the activities like finding the exact cause of the disease, finding a cure for it, and thinking of ways to prevent that disease. As it has been entrusted to God to cure or cause a disease, millions of people have died unnecessarily in the past.
The progress that man has made today begins with breaking the concept of God. Why does a fire start? The answer was, its god who creates it. Thus it is the first and a very important stage of human progress to realize that even a human being can create fire by rubbing pebbles, and that its not the god who controls it. If fire had remained a divine thing without coming under the control of man, we would not have been able to make any progress. So god and progress are therefore mutually excluding to each other. It is true that progress will stunt when god is effective and progress will increase when god is weak. Thinking in backdrop of our mind that god is the cause or creator of things that seem unexplainable to us, we can not raise our level of reasoning and thinking beyond a certain limit. And the funny part is that it is also true that those who knew in history that god is non-existing, used this concept of god very cleverly for their own benefit and ruled other people by instilling fear of the same god in them.
We Indians think that we are very intelligent, and that is not incorrect too. But if we leave CV Raman, we have not won a single science Nobel since independence. Why? In my opinion, it is because we have unknowingly limited ourselves by unreal concepts like god, karma, spirituality, scriptures and so many other misleading beliefs and rites. Our ability to adopt a scientific approach and to think rationally outside the tradition has been limited under the guise of many such misconceptions.
The bad thing is that even though mankind has made such glorious progress using scientific approach, even today, the yoke of this totally false and childish concept of god has not come down from the necks of even the most educated people. Einstein cleverly explains such things too. Einstein says that the difference between being well-educated and being well-trained is the same as that between people who have a scientific approach to learning and those who do not. This means that if we train a dog or a circus animal, it can master and display very exciting athletic stunts. However, such a well-trained dog or animal cannot think of even the simplest of a scientific or rational question. Similarly, people who are highly educated but still believe in god or any other deceptive concept are no different from those well-trained dogs or circus animals. Such people may be very proficient in some field or a subject, but they cannot progress beyond a certain limit because they do not have the common sense or the scientific approach and the ingenuity to think outside the box.

Suppose that there is a top-ranked engineer in the whole country. He did not automatically become well-educated just because he hit the top. It just means that he has become very proficient in the work already done by others in that field. He can be said to be well educated only when he can go beyond what he has been taught, go beyond the limits of his old concepts, think scientifically and logically and add more different and new fundamentals to his field. If we are well trained but not well educated, then a genuine innovation or a very different, wonderful concept cannot take birth in our minds. Our educational system only makes us well trained, not well educated. In fact, we can make the best well-trained people in the world. But it does nothing more than just modifying the previous technologies or take a slightly different approach to the previous strategy. Of course, even though this also is a small step forward to progress, the truth is that due to the limitations of our scientific approach, we are not able to do any groundbreaking work. This does not mean that we are completely zero in on the scientific approach, but we only have the scientific approach to a safe and convenient limit. It has not reached deep into our roots.

It is a pity that even today, many people even in the field of science cannot cross the line of well trained and reach the level of well educated. They cannot get out of god or many other deceptive concepts, and thus they unknowingly limit themselves. Even if such people are very proficient in field of technology or science, it is true that they cannot think beyond a certain limit because the concept of god is influencing and limiting them somewhere in their psyche. Of course, god is not the only concept that underlines the boundaries of well-trained and well-educated. There are many other factors, such as prejudices, illogic, limited thinking etc. However, god is the most effective and most universal of all these factors.

A couple of years before, a woman scientist, who is the chief scientist of the Pune Meteorology Department, had lodged a complaint with the police alleging that her PITAR SHRAADDHA meal was made by a woman of lower caste and hence it got cursed. The first thing is that despite being a scientist, to perform PITAR SHRAADDHA etc, and to assume that it got cursed or spoiled because of being cooked by a certain caste person, was itself both a mistake and a utter non-sense. Despite being the chief scientist, she could not cross the line of well-trained and well-educated. Didn't a High Court judge state that female peacock gets pregnant not by having sex but by drinking peacock tears? Did not one of our RBI governors had said that the court should look into the possibility of floods in Kerala due to Ayyappa's humiliation? You see, all these people are highly educated and have reached to the top with the highest proficiency in their field. And yet they make such nonsensical statements. This is only due to their lack of scientific approach and their inability to cross the boundaries of being well trained and well educated. Now many people give the examples of Abdul Kalam who used to lean ahead of many babas, swamis etc and of Ramanujan who used to say that it was a goddess who used to come in his dreams and taught him mathematics. Unfortunately, there is no doubt that the proficiency of these two legends in their field was unmatchably superior, but being very proficient in one field, doesn't make the man ideal in every other field, isn't it? So even though Abdul Kalam was most proficient in his field, it is a mistake for him to bow in front of babas and swamis (Yes, I know I am nothing in front of Dr. Kalam, but it doen't need to be very great to realise what is wrong and whats not, isn't it?). Also Ramanujan's concern for his own degenerating health and declining self-confidence enforced him to find some support in the divine. We can not deny that Ramanujan was also tempted by the technique used by most of the founders of most religions to increase the importance of their work and avoid criticism by adding divine values or holiness to their work?
Its not just Dr. Kalam and Ramanujan, even many of the Nobel winning scientists were unable escape many misconcepts or prejudices like god. To date, many people have won two Nobel Prizes, but at least one of these two Nobel Prizes has usually been awarded to more than one individual. But there is only one scientist in the world who has won two Nobel Prizes, both individual. That scientist is Linus Pauling (it may be noted that the second Nobel was not for a scientific discovery). Pauling had a misconception about vitamin C in particular (people were very fond of vitamin C even in the Corona period now). Pauling's claim was that vitamin C was the ultimate cure for the lifelong cold he had. So he consumed a lot of vitamin C, and also claimed that his cold was getting better with it. However, it has now been proven that vitamin C does not cure colds, but Pauling however carried this misconcept throughout his life. Had he not have any such misconcept and had worked on the cold without any such prejudice, who knows he might have found a very effective medicine for the disease. So, if the only great scientist to win two individual Nobel Prizes had an unscientific or prejudiced delusion, what a pity for anyone else.

This is our devotion, who gave you the right to hurt it or deny it? This is the most popular resistance (or obstacle to one's own progress) during a conflict between the scientific approach and god. When there is no logical argument left, people draw this weapon of hurted feelings. Many people also claim that we have faith, not superstition. They also say that superstition is wrong, but faith is correct. However in fact, faith itself is also a superstition. Faith is the belief that things that cannot be proved by scientific or other legal evidence are true. Thats exactly what a superstition too is. So how is superstition different from faith? In fact both faith and superstition are indeed one and the same thing.

Change is certainly taking place in the world. Majority of us have even stepped towards progress and have reached much further on the path of scientific approach. So what happens is that most people have a lot of experience or examples to prove that they have scientific approach in many respects. But when it comes to certain things that really test the intellect and rational ability, their emotions get better of their intellect. There are many people who are aware that god or other deceptive things do not exist, but they are not ready to accept it fully out of some anonymous fear or hesitation or social pressure or personal prejudices. In our Indian philosophy, MOKSHA is the ultimate goal of life. Just as it is said that MOKSHA is not achieved without giving up even the desire of body and life itself, so do the scientific approach too is not achieved without eradicating god or all other unscientific irrational misconcepts and prejudices from oneself. 
 
...

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

व्हायरस

काही लाख करोड वर्षांपूर्वी, शुक्र आणि मंगळावर प्रचंड प्रगत सजीवांची वस्ती होती. आपल्या अतुलनीय तांत्रिक प्रगतीच्या संभ्रमात ते इतके गुरंफटले होते की येणाऱ्या विनाशाची त्यांना कल्पनाच आली नाही. दोन्ही ग्रहांवरची खनिज इंधने प्रचंड वेगाने संपत चालली होती. मग त्यांनी त्यासाठी एक नवे गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जेचे तंत्रज्ञान शोधले. या तंत्रानुसार त्यांनी काही गुरुत्वीय लहरींचे ट्रान्स्पोण्डर तयार केले ज्यांच्यात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वापरून ऊर्जेचे निर्माण करता येणार होते. शुक्र आणि मंगळ या दोहोंच्या मध्ये वर्षाचा खूप मोठा काळ पृथ्वी येत असते. पृथ्वी अशी मध्ये आली असताना दोन्ही ग्रहांवर जो गुरुत्वाकर्षणीय ताण निर्माण होत असे त्याचा वापर करून ते वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा बनवून साठवणार होते. पृथ्वी ही सदैव अशीच राहणार असल्याने अगदी अनंतकाळासाठी दोन्ही ग्रहांची ऊर्जेची गरज भागविणारे हे तंत्रज्ञान होते.
पण या तंत्रात एक अवघड अशी अडचण होती. पृथ्वीचा निळा रंग ट्रान्स्पोण्डरच्या रिसिव्हर्स समोर असताना त्यांचे ऊर्जास्रोत चार्ज होत असत मात्र पृथ्वीचा हिरवा भाग समोर आला की मग मात्र उलटे होऊन रिसिव्हर्स मधून चार्ज खूप वेगाने लीक होऊ लागे. पृथ्वीवर हिरव्यापेक्षा निळा भाग जास्त असल्याने त्यांना नेट ऊर्जा शिल्लक राहत तर असे, पण ती खूपच थोडी असल्याने त्यांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर आता ती ऊर्जा कमी पडू लागली होती. त्यामुळे या गुरुत्वउर्जिय संधारणात येणारा पृथ्वीवरच्या हिरव्या रंगाचा अडथळा हा त्यांच्या ग्रहांवरची जीवसृष्टीच संपवू शकणार होता. म्हणून मग पृथ्वीवरच्या या हिरव्या रंगाचा विनाश करण्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचे ठरविले.
तसे पृथ्वीवरील या हिरव्या सजीवांचा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने अभ्यास केलेला होता, त्यामुळे ही हिरवी जीवसृष्टी संपविण्यासाठी पृथ्वीवर व्हायरसची निर्मिती करावी हा उपाय त्यांनी योजण्याचे ठरवले. आणि मग त्यांनी संयुक्तपणे मंगळावरील वुहान शहरात असा व्हायरस निर्माण करायला सुरुवात केली. 
आपण जाणतोच की व्हायरस हा होस्टच्याच शरीरातील सत्व वापरून आपली लोकसंख्या वाढवतो आणि मग होस्टलाच खल्लास करतो. 
प्रयोगशाळेत व्हायरस तयार झाला आणि मग त्याला पृथ्वीच्या हिरव्या जीवसृष्टीत सोडण्यात आले. पण लाखो वर्षे गेली तरी पृथ्वी त्या व्हायरसने इन्फेक्ट होऊनही पृथ्वीचा हिरवा रंग काही कमी होईना. मग एकामागून एक असे करोडो व्हायरस म्यूटेट करून पृथ्वीवर सोडण्यात आले पण तरीही हिरवी जीवसृष्टी काही कमी होईना व त्यामुळे शुक्र मंगळावरील ऊर्जेचा तुटवडा हा काही भरून निघेना. 

पुढे एकदा शुक्र ग्रहावर एक खूप मोठा म्हणजे 56 इंच आकाराचा निर्बुद्ध पण गरम डोक्याचा नेता जन्मास आला. त्याच्या बावळट कल्पनेनुसार मग झटपट इलाज म्हणून शुक्रवासीयांनी एक प्रचंड मोठा धूमकेतू पृथ्वीच्या हिरव्या भागावर आदळवला, मात्र त्यानेही फक्त काही काळ हिरवा रंग थोडासा कमी झाला, पण नंतर पुन्हा खूप वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढून पुन्हा जैसे थे झाला. इतकेच नाही तर या गरम डोक्याच्या नेत्याने तज्ज्ञांशी मसलत न करता स्वतःच्याच हेकेखोरपणाने पृथ्वीवर धूमकेतू आदळविल्याने पृथ्वीवर जी कंपने निर्माण झाली त्यांच्यामुळे शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांवरील ऊर्जेचे ट्रान्स्पोण्डर व रिसीवर मोठ्या प्रमाणात बिघडले. त्यामुळे असे प्रचंड नुकसान झाल्यावर शेवटी व्हायरस हाच योग्य उपाय आहे हे त्यांना कळले.

दरम्यान दोन्ही ग्रहांची खनिज इंधने संपून गेली, आणि पृथ्वीच्या हिरव्या रंगात घट न झाल्याने नव्या तंत्रज्ञानाची गुरुत्वीय ऊर्जाही त्यांस पुरेशी पडेना. त्यामुळे उलट शुक्र अन मंगळावरचीच जीवसृष्टी आता लोप पावू लागली. दोन्ही ग्रहांवरच्या प्रगत जीवसृष्टीपुढे स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला. आणि मग करोडो वर्षानंतर शेवटी त्यांना एक आशादायक व्हायरस बनविण्यात यश मिळाले. हा व्हायरस त्यांनी आजपर्यंत बनविल्यांपैकी सर्वात अधिक इन्फेक्शीयस तर होताच, पण हिरव्या जीवसृष्टीसाठी अतिशय प्राणघातक सुद्धा होता.
लवकरच या व्हायरसने हिरव्या जीवसृष्टीला इन्फेक्ट करून संपवायला सुरुवात केली. पण जरी हा अत्यंत प्रभावी व्हायरस असला तरी तो म्हणावा तितका परिणाम साधू शकला नाही. मग शुक्र मंगळाचे सायंटिस्ट या व्हायरसमध्ये  हळूहळू स्टेप बाय स्टेप म्युटेशन घडवून त्याला अधिकाधिक घातक बनवू लागले. त्यांनी या व्हायरसची अल्फा, बीटा, गॅमा अशी अनेक म्युटेशन्स आणली जी अधिकाधिक घातक होत गेली. शेवटी 1000 वर्षांपूर्वीच या व्हायरस मध्ये एक डेल्टा वेरीएशन नावाचे म्युटेशन झाले आणि हिरव्या जीवसृष्टीचा वेगाने विनाश व्हायला सुरूवात झाली. मात्र तरीही या व्हायरसवर संशोधन चालूच होते. आणि मग अगदी अलीकडे म्हणजे जस्ट 200 वर्षांपूर्वी या व्हायरसमध्ये डेल्टा प्लस हे नवे खतरनाक म्युटेशन झाले, आणि हे म्युटेशन इतके प्रचंड प्रभावी ठरले की मागच्या 200 कोटी वर्षांतील तमाम व्हायरसांना जे जमले नाही ते या व्हायरसने केवळ 200 वर्षांत करून दाखवले.
हा व्हायरस हिरव्या जीवसृष्टीत घुसला. आणि त्या सृष्टीच्याच शरीरातील सामग्री वापरून सगळ्या पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात फोफावला. प्रचंड इन्फेक्शस असण्याबरोबरच हा व्हायरस इतका अधिक घातक सुद्धा निघाला की या लास्ट 200 वर्षांतच पृथ्वीवरची अक्षरशः निम्मी हिरवी जीवसृष्टी त्याने खतमच करून टाकली. 
आता मंगळ आणि शुक्रावरची त्यांना उपयुक्त ठरणारी ऊर्जानिर्मिती वाढली आहे. त्यांची विलुप्त होणारी जीवसृष्टी आता पृथ्वीवरच्या या लेटेस्ट व्हायरसमुळे पुन्हा समृद्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. साधारण पुढच्या 100 वर्षांत हा व्हायरस पृथ्वीवरची 90 ते 95 टक्के हिरवाई कायमची नष्ट करेल असा अंदाज आहे.
शुक्र आणि मंगळवासीयांनी या पृथ्वीसाठी प्रचंड प्राणघातक असलेल्या व्हायरसला 'ह्युमिना व्हायरस' असे इंग्रजी नाव दिले आहे. मराठीत त्याला काय नाव देता येईल?


..

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

रियल व्हर्चुआलीटी

आधी व्याख्या करू आणि मग हळू हळू विस्तारू. 

व्हर्चुअल वल्ड किंवा आभासी जग म्हणजेच अशा संकल्पना अथवा गोष्टींवर बेतलेले काल्पनिक जग ज्यास काहीही वास्तव/भौतिक अस्तित्व नाही. या आभासी जगाचे सर्वात पॉप्युलर प्रातिनिधिक मानक म्हणजे फेसबुक. किंबहुना संपूर्ण इंटरनेट हेच एक मोठे आभासी विश्व होय. विशेषत:  इंटरनेटनंतरच हा शब्द प्रामुख्याने वापरला जाऊ लागला. वास्तववादी लोक या व्हर्चुअल जगण्यावर खूप टीका करतात. ठीक आहे पण ज्याला आपण वास्तव जग म्हणतो ते तरी वास्तव आहे का? की आपण आभासालाच वास्तव समजतो आहोत? चला बघुयात.  

फार पूर्वी (कदाचित आताही येत असेल) बहुदा 'नवाकाळ' हा पेपर मी जेव्हा कधी वाचला तेव्हा त्यात एक वाक्य हमखास छापून यायचे ते असे की "अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत." आणि याच वाक्यात आपल्या आजच्या सगळ्या समस्यांचे, दु:खाचे किंवा अगदी आनंदाचे देखील कारण सामावलेले आहे. 

अगदी दैनंदिन गोष्टींपासून सुरुवात करू. पहिली आभासी गोष्ट म्हणजे पैसा.!! आता तुम्ही म्हणाल पैसा तर भौतिक गोष्ट आहे आपण ती पाहू शकतो हाताळू शकतो मग तो आभासी कसा? आपण जो बघतो हाताळतो ते असतात केवळ काही कागदाचे तुकडे. आणि पैसा म्हणजे ते कागदाचे तुकडे नव्हेत तर आपण त्यांना ठरवून दिलेली एक पर्टिक्युलर किंमत म्हणजे पैसा. आणि किंमत ही निव्वळ एक आभासी गोष्टच तर आहे. एखाद्या जागतिकीकरणाचे वारे न लागलेल्या खेड्यात जा आणि तिथे एखाद्यापुढे एक  १०० रुपयाची आणि एक १०० डॉलरची नोट धरा आणि यातली एक तुला घे म्हणा. तो माणूस १००% ती १०० रुपयाचीच नोट घेईल. १०० डॉलरचे मुल्य तुम्ही मान्य केले म्हणून त्याला तुमच्या लेखी किंमत. सोन्याला तुम्ही मान्य केले म्हणून किंमत. एखाद्या शेतकऱ्यासाठी गायीचे शेण हे खत म्हणून अत्यंत किंमती, पण तेच एका शहरातल्या माणसासाठी शून्य किंमतीचे किंबहुना त्रासदायकच म्हणजे निगेटिव व्याल्यूचे असेल. 

दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे नाव. 'राहुल भांगरे' नावाचे पंचवीसेक लोक आहेत फेसबुकवर. मात्र ही जी काही पकाऊगिरी चालविली आहे ती फक्त एकट्या मीच. मग हे राहुल भांगरेने लय भारी लिहिलेय असे कुणी (चुकून) बोलले तर इतर चोवीस राहुल भांगरे थोडेच खुश होणार आहेत? म्हणजे महत्व नावाला नव्हे तर व्यक्तीला आहे. माझे नाव पांडुरंग सांगवीकर असते किंवा अण्णू गोगट्या असते तरी तुमची माझ्याबद्दल जी काही प्रतिक्रिया असती ती सेमच असती. नाव म्हणजे केवळ एक संबोधन, आणि अगदीच सायंटीफिक बोलायचे तर एक पर्टिक्युलर आवाज, जो आपणास असाइन झाला आहे असे मानून तो ऐकून आपण पुकारणाराला प्रतिसाद देतो, ज्याला आपण ठरविले म्हणून काहीतरी मुल्य आहे अन्यथा नुसती शिट्टी वाजवली किंवा अहो शुक शुक असे केले तरी आपण अनोळख्यालाही प्रतिसाद देतोच की.! मला वाटते  'आपणांस प्रतिसाद देण्यास उद्युक्त करणारा आवाज म्हणजे नाव' या व्याख्येप्रमाणे शिट्टी हे तर एक वैश्विक नाम ठरेल. फार कशाला शेक्सपियर सुद्धा तर नावाबद्दल हेच म्हणतो.  

तिसरी गोष्ट म्हणजे आपली जात आणि धर्म. "गर्वच नाही तर माज आहे xxx असल्याचा,  xxx ला नडला तर फोडला,"वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजिती दात ही जात xxxची, गर्वसे कहो हम xxx है", म्हणजे ट्रकांच्या मागे लिहिल्या जाणाऱ्या शायरीच्या लायकीची ही वाक्ये xxx च्या जागी वेगवेगळी नावे लिहिली जाउन अत्यंत स्वाभिमानी आवेशपूर्ण स्वरूपात हजारांदा व्हाट्सअप इत्यादी ठिकाणी येत असतात. आणि वरून खरे xxx असाल तर निदान शंभर जणांना हे फोरवर्ड करा अशी निर्बुद्ध आवाहन कम मखलाशीही जोडलेली असते. ही विकृती एवढी पराकोटीची आहे ना आपल्या देशात की एखादा माणूस चांगला की वाईट किंवा तो आपल्याला आवडावा की नाही हे आपण त्याचे कार्य नव्हे तर त्याची जात/ धर्म पाहून ठरवतो. किंवा आवडला तर त्याची जात काय असेल हे शोधतो. Dhoni catches असे गुगलून पहा, catches चा c टाईप करताच पहिले सजेशन येते dhoni caste असे, अजय अतुल कम्पोझिशन्स असे टाईप करा तरी तेच. कसे काय लोक या माणसांची जात शोधू पाहत असतील? अरे कसला धर्म आणि कसली जात? आपण नावासारखीच हीही लेबले स्वत:स चिकटवली आणि त्यांना मुल्य देऊ लागलो बस्स. 'अमर अकबर एन्थोनी' पाहिलाय ना? बस फिर इतने समझदार तो दिखते ही हो तुम तो समझ जाव ना यार की ही जात आणि धर्म संकल्पना सुद्धा किती फोल आणि आभासी आहे ते. 

चौथी गोष्ट म्हणजे देव. तो कुणाला दाखवताही येत नाही आणि त्याला बोलावताही येत नाही, पण त्याला मानणारे आस्तिक असोत की शिव्या देणारे नास्तिक दोघेही एका भौतिक अस्तित्व नसलेल्या व्यक्तीस भजत किंवा निंदत असतात. असो, देव या संकल्पनेवर फॉर आणि अगेन्स्ट असा दोन्ही दृष्टिकोनांचा इतका वैचारिक चोथा पडला आहे की म्या पामराने अधिक तो काय भूस पांगवावा?

अशी हजारो उदाहरणे आहेत. चांगले, वाईट, सुख, दु:ख, श्रेष्ठ, नीच, पाप, पुण्य, आठवणी, बंधने, कायदे, सौंदर्य हे सगळे आभास. एवढेच कशाला, अरे जे जग आपण भौतिक म्हणतो तोही एक आभासाच आहे. रंग, टाईम, डीस्टंस, वस्तुमान,  उजेड, अंधार हे सगळे केवळ आभास होत. अंधार किंवा उजेड नावाचे काही नाहीच. विश्वात अनंत वेव स्पेक्ट्रम आहेत, अगदी अंधारातही ते आहेत. उजेड याही वेव्ज आहेत, फक्त त्या वेव्जची तरंगलांबी आपल्या दृष्य तरंगलाम्बीशी मैच झाली की आपण तिला उजेड समजतो. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात तर टाईम डीस्टंस या गोष्टी आपण समजतो त्या स्वरूपात अस्तित्वात नाहीत. जे काही आपल्याला दिसते ते फक्त उर्जेचे काहीतरी रूप किंवा तिचा प्रवाह. पण मूळ उर्जा दिसत नाही, फक्त भासते. ज्याला आपण वास्तव समजतो तोही केवळ भास. आणि आपण या अभौतिक संकल्पनांना गुळाच्या ढेपेसारखे चिकटून बसलेले मुंगळे. या निरर्थकतेसाठी आपण कोट्यानकोटी माणसे मारली/मारतो, रोज शेकड्यांदा आपली मने मारतो, प्रचंड रागावतो, बेचैन होतो, दु:खी होतो. असो, भौतिक-अभौतिकीच्या गर्तेत आपण गटांगळ्या खातच राहणार, जे आपल्याला जाणवते तेच सत्य किंवा तेच वास्तव असे मानायचे व स्वत:ला आणि इतरांनाही अधिकाधिक सुखी करायचे. जीना इसी का नाम है.!!  

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

Small Bang Theory-1 (The almighty and past miracles)

आजपासून तब्बल १० हजार वर्षांनी (एका संस्कृतीचा काळ आपण ५-७ हजार वर्षे धरू). एक मोठे उत्खनन झाले तर त्या माणसांस आपली शहरे गावे इत्यादि पाहून आजच्या आपल्या ज्ञानाबद्दल नक्कीच आश्चर्य वाटेल. आज जशा आपण मोहेंजोदडो, हडप्पा, मेसोपोटेमिया इत्यादी संस्कृती उत्खननात बघतो आणि त्यांचे ज्ञान पाहून अचंबित होतो तशीच भविष्यातील माणसे आपले अवशेष पाहूनही अचंबित होतील. हडप्पा मेसोपोटेमिया आणि तशाच कित्येक जुन्या प्रगत संस्कृती त्यांच्या सर्वोच्च उत्कर्ष काळातच नष्ट झाल्या असाव्यात, आणि बहुदा सर्वसंहारक युद्ध हेच त्याचे कारण असावे. मला वाटते प्रगत मानवी समूह हे ५-७ हजार वर्षांच्या कालावधीनंतर अंतर्गत कलहांपरांत नेहमीच स्वत:ला पूर्णत: नष्ट करून टाकत असावेत. आणि मग कुठेतरी विजनात तग धरून राहिलेली अप्रगत माणसे अथवा त्या नष्ट झालेल्या प्रगत संस्कृतीतील अलिप्त (बहुदा मागासपणामुळे/ अशिक्षितपणामुळे अथवा बंड करून वेगळी लपून राहिलेली) माणसे पुन्हा नव्याने नवीन मानवी प्रगती आणि संस्कृती निर्मितीस सुरुवात करीत असतील.
शक्यतो ही नव्याने सुरु करण्याची सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानीक प्रगती अथवा सांस्कृतिक नवनिर्मिती मोठी भ्रमीत करणारी एवं गोंधळपूर्ण असेल. म्हणजे कसे? हे समजून घेण्यासाठी आपण थोडे कल्पनारंजन करूयात.  
तर असे समजू की आजच्या काळात म्हणजे आजपासून काही वर्षांत एक मोठे महायुद्ध होऊन आजचे सगळे देश त्यात पूर्णत: विनाश पावले. मात्र या विनाशातूनही समजा सोमालियातले काही  बंडखोर जे समुद्रात पळून जाउन एखाद्या बेटावर जाउन लपून राहीले असतील ते, अथवा ब्राजीलमधील जंगलांत अजूनही प्रकाशात न आलेली एखादी आदिम जमात हे मानवी समूह बचावले. तर मग पृथ्वीवर मानवी वंश पुढे चालविण्याची पूर्ण जबाबदारी ही या समूहांवर येउन पडेल.  आता प्रगती हा मानवी स्थायीभावच असल्याने समयपरत्वे हे दोन्ही समूह उपलब्ध साधनांचा उपयोग करून जीवन अधिकाधिक सुखकर आणि सुसूत्र करण्यासाठी हळूहळू विविध प्रकारे प्रगती करू लागतील. 
आता ब्राजीलातील ती आदिम जमात ही जशी अश्मयुगातील माणसाची झाली असे आपण म्हणतो, तशी त्यांच्या नैसर्गिक वेगाने प्रगतीकडे वाटचाल करती होईल, पण सोमालियातील बंडखोर हे मात्र सगळा सावळा गोंधळ माजवतील. हा गोंधळ या गोष्टीमुळे माजेल की सोमालीयनांना आजचे उपग्रह, कम्प्युटर, मोबाइल, इन्टरनेट, चंद्रावर मानवी पाऊल, विमान, रॉकेट, पेट्रोल/डीजेलवर चालणाऱ्या गाड्या, अणुबॉम्ब आदी सगळे माहित तर असेल मात्र त्याविषयीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान त्यांचेकडे असणार नाही. मग ते या साऱ्यांचे अस्तित्व आणि उपयोग हे माहित असूनही यातली कोणतीही वस्तू बनवू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रगत तंत्रांची अथवा साधनांची संकल्पना तर त्यांना माहित आहे, किंबहुना तिचा वापर करण्याचा अनुभव सुद्धा आहे मात्र त्यांचे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्या साधनांची निर्मिती करून वापर करता येत नाही म्हणून त्यांच्यात एकप्रकारच्या हतबलतेतून आलेल्या न्यूनगंडाने मोठा गोंधळ माजेल. म्हणजे त्यांचेकडे मोबाइल असतील, गाड्या असतील अथवा जिथे ते लपून बसले होते त्या बेटावरून परत मुख्य भूमीत आल्यावर त्यांना ते सापडतील, मात्र ते मोबाइल वगैरे साधनांचे इन्फ्रास्ट्रक्चरच नष्ट झालेले असल्यामुळे त्याचा उपयोग करू शकणार नाहीत. वाहने ते थोडाकाळ फारतर उपयोगात आणू शकतील पण एका काळानंतर तीही निरुपयोगी बनून गंजून नष्ट होऊन जातील. आणि मग अर्थातच उपयोगात नसल्याने त्या गोष्टींबद्दलची माहिती अथवा त्यांचे एकूण अस्तित्व हेच संपुष्टात येइल. अशा प्रकारे मग आजच्या मानवाची तंत्र आणि विज्ञानातली एवढी मोठी प्रगती ही पुरेशा ज्ञानाअभावी नष्ट होऊन जाईल. 
नव्याने जन्मलेल्या पिढीला तर ते सगळे कळणार नाहीच पण जुन्या पिढीतील ते लोक ज्यांनी हे सगळे पाहीले अनुभवले आणि वापरले असेल तेही मग वेगाने झालेल्या या अध:पतनामुळे अतिशय निराश होऊन जातील. त्यातील काहीजण बऱ्यापैकी संवेदनशील असतील आणि त्यांना वाटले की निदान पुढच्या पिढ्यांना या सगळ्या प्रगतीची माहिती तरी व्हावी जेणेकरून पुढच्या कुठल्याशा पिढीत कोणी न्यूटन अथवा आइनस्टाइन जन्मला तर तो किमान या साधनांच्या संकल्पनेचा धागा पकडून त्यांचे तंत्र शोधू शकेल. अन्यथा संकल्पना शोधण्यातच किती तरी बुद्धिवंतांची बुद्धी खर्च पडून कालपरत्वे वाया जात असते. म्हणून मग ते त्यासाठी किमान ही सगळी तंत्रे काय होती आणि ती कशी काम करायची हे माहित नसले तरी काय काम करायची हे तरी लिहून ठेवतील. आणि ही त्यांनी लिहिलेली माहिती सुद्धा येणाऱ्या काळात नष्ट होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांकडून ते ती वदवून, रटून घेतील. अर्थातच मग ही माहिती लिहून ठेवलेली पुस्तके ही त्यांनी एकेकाळी स्वत: अनुभवलेल्या तांत्रिक प्रगतीचे म्हणजेच जुन्या मानवी इतिहासाचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणून गणले जातील. तंत्राचा उपयोग तर माहित आहे पण बनविण्याचे ज्ञान तेवढे नाही आणि त्यामुळे एकंदर जीवन फार कठीण होणार आहे, त्यामुळे निदान पुढे कोणती तरी पिढी हुशार निपजेल तेव्हा ही तंत्रांची जुजबी माहिती त्यांना खूप उपयोगी होईल या भावनेने ते सदर माहिती अंतर्भूत असलेले ग्रंथ हे फार महत्वाचे ठरवून पिढी दरपिढी ते पुढे दिले जात रहावेत, अभ्यासले जात रहावेत म्हणून त्या ग्रंथांना काहीतरी अत्यंत महत्वाचा अथवा दैवी दर्जा देतील. पुढे मग एखादी पिढी त्या माहितीला एखाद्या वेधक आणि नाट्यमय स्वरूपात मांडून सुधारीत आवृत्ती बनवतील. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांस ते अभ्यासणे रटाळवाणे वाटणार नाही. अशा प्रकारे नाट्यमय बनविल्याने व महत्वाचा दर्जा देण्यामुळे आगामी अनेक पिढ्या त्यांचे पठन करत राहतील. मात्र यामुळे नव्या पिढ्यांत ग्रंथप्रामाण्य मानण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टीकोण येण्याऐवजी त्या अधिकाधिक दैववादी होत जातील. 

या सगळ्या घटनांच्या नंतर जवळ जवळ चारेक हजार वर्षांनी वैज्ञानिकतेचा पाया रोवला जाईल. आणि मग थोड्याफार वैचारिक संघर्षानंतर विज्ञान हळूहळू जुन्या परंपरा आणि संकल्पनांवर आघात करू लागेल. नवे शोध लागतील, नवी तंत्रे विकसित होतील. थोडक्यात काय तर प्रत्यक्ष स्वयंअनुभूती आणि प्रायोगीकतेवर आधारीत नवयुगाची सुरुवात होईल. 

आता समजा या नव्या प्रगतीच्या ओघात त्या भविष्यातील मनुष्यांस आपले आजच्या युगाचे जे शोध लागले आहेत म्हणजे जसे की लॉज ऑफ मोशन, फिशन, रिलेटीविटी, इलेक्ट्रोनिक्स इत्यादि ते न लागता त्यांचेकडून वैश्विक रचनेची आताहुन काही वेगळीच तत्वे शोधली गेली तर काय होईल? म्हणजे समजा इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोध या नव्या प्रगत संस्कृतीस लागलाच नाही आणि त्यांनी आपली संचार, उर्जादि गरज भागविण्यासाठी दुसऱ्याच एखाद्या तत्वाचा शोध लावला, तर मग आपली आताची इलेक्ट्रोनिक प्रगती ही त्यांच्यासाठी एक मिथकच ठरेल. असे झाले तर त्यांस त्या सोमालियातील बचावलेल्या आपल्या काळातील माणसांनी लिहिलेली व परंपरागत श्रेष्ठ दर्जा दिलेली पुस्तके, ग्रंथ हे त्यांच्या संस्कृतीने सत्याचे दस्तऐवज म्हणून पिढ्यान पिढ्या अभ्यासले असले तरीही ते त्यांच्या तेव्हाच्या वैज्ञानिक ज्ञानाने सिद्ध होऊ शकत नसल्याने ते खोटे वाटू लागतील. इलेक्ट्रोमेग्नेटीझम माहीतच न झाल्याने आज आपण वापरत असलेले मोबाईल, उपग्रह, इंटरनेट, कम्प्युटर, एलईडी इत्यादी सर्व साधने काम करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसणार नाही, कारण या किंवा अशा सोयस्कर कामांसाठी त्यांनी विज्ञानाच्या दुसऱ्या नियमांवर आधारित शोधांवरून काही अन्य तंत्रे शोधली असतील. आणि ज्या मूळ इलेक्ट्रोमेग्नेटीझम या तत्वावर आपली आजची सगळी तंत्रप्रणाली बेतलेली आहे तिची कल्पनाच न आल्यामुळे त्यांना आपले आजचे शोध आजिबात खरे वाटणार नाहीत.
अशावेळी पारंपारिक आणि नवविचारांत संघर्ष होणे अटळच. मग नवविचारांचे समर्थक परंपरावाद्यांस म्हणजे कम्प्युटर उपग्रह आदि गोष्टींवर विश्वास ठेवणारांस अनेक प्रकारे मागास आणि निर्बुद्ध सिद्ध करतील. ते सरळ सरळ म्हणतील की तुमच्या या परंपरागत ग्रंथांत लिहिलेल्या गोष्टी या केवळ कल्पनेचे मनोरे आहेत. एक सहज हातात धरता येणारे यंत्र (म्हणजे मोबाईल) ज्याद्वारे जगाच्या कुठल्याही व्यक्तीशी थेट (लाइव) बोलले जाऊ शकते असे अस्तित्वात असणे शक्यच नाही. आणि एक असे यंत्र (टीवी) ज्यात माणसे जगातली कुठलीही घटना घरात बसून पाहू प्रत्यक्ष शकत, ती अस्तित्वात होती असे मानणे म्हणजे तर निर्बुद्धपणाच होय. आणि काय तर म्हणे तेव्हाची माणसे एका यंत्राच्या सहाय्याने (कम्प्युटर) केवळ काही कळा दाबून बसल्या बसल्या मोठमोठी कामे करत. कितीही गोष्टींची माहिती कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकत, मोठमोठी गणिते केवळ काही सेकंदांत करू शकत, आणि आकाशात सोडलेल्या यंत्रांच्या (उपग्रह) आधारे संपूर्ण पृथ्वीवर नजर ठेऊ शकत असे मानणे ही तर बौद्धिक दिवाळखोरीच होय. तुमची परंपरागत दैवी पुस्तके ही कुठल्याही वैज्ञानिक कसोटीवर खरी ठरू शकत नाहीत. त्या केवळ कवीकल्पना असून, नाट्यमय रीतीने मांडलेल्या या कल्पनांस खरे मानणे हा मूर्खपणा होय. जर तुम्ही ती यंत्रे बनवून वापरून दाखवू शकत नसाल तर त्यांचे अस्तित्व होते असे मानणे हे निव्वळ मागासपणाचे लक्षण होय. हे मोबाईल, कम्प्युटर, विमान, टीवी, उपग्रह इत्यादि कधी अस्तित्वात असणेच शक्य नाही. आणि अर्थातच इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोधच लागलेला नसल्याने परंपरावादी लोक अशी काही साधने अस्तित्वात होती हे सिद्ध करूच शकणार नाहीत.  मग ते आपोआप खोटारडे अथवा कनिष्ठ ठरतील.
हेच सद्य स्थितीतही खरे नाही का? शंकराने मारलेल्या हत्तीचे मुंडके गणपतीस जोडणे, येशुने मृत मुलांस जिवंत करणे अथवा स्वत: मृत्युनंतर ३ दिवसांनी जिवंत होऊन परत येणे, कृष्ण, हनुमानाने पर्वत उचलणे, अल्लाहने आपले संदेश पैगंबरास सांगणे, हलाल केलेले पक्षी अल्लाहच्या चमत्काराने जिवंत होऊन उडत उडत परत येणे, संजीवनी विद्या, आकाशवाणी, अमृत, स्वर्ग, पाताळ, नरक, देवदूत, शाप, वरदान, अक्षय्य भाता, वज्र या जुन्या ग्रंथांतील नोंद केलेल्या गोष्टींपैकी एकतरी कल्पना आज विज्ञानाच्या कसोटीस उतरते का? मग हे सगळे नेमके काय? केवळ कपोलकल्पिते की आजच्या विज्ञानाच्या आवाक्याबाहेर असलेले सत्य?

सोमवार, २ मार्च, २०१५

गॉड अंडरस्कोर रिलिजन डॉट एक्स वाय झेड

देव जे सर्वप्रचलित आहेत ते मी मानत नाही की मानतो हा भाग अलाहिदा पण माझ्यापरीने प्रचलित किंवा रूढ देव आणि धर्म ही संकल्पना सर्वाधिक सामर्थ्यवान आधुनिक साधनाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
कम्प्युटर हे ते आधुनिक साधन.  या स्पष्टीकरणात एकदा कम्प्युटर बनला की त्यात बाहेरून युजर काहीही हार्डवेअर बदल करत नाही असे मानावे.

१. समजा की कम्प्युटर हे ब्रम्हांड आहे. आणि माणसे या त्यातल्या फाईल्स. आधी कम्प्युटर निर्माण झाले आणि नंतर फाईल्स. त्यामुळे फाईल्सना हे कळणेच शक्य नाही की कम्प्युटरास कुणी किंवा कसे निर्माण केले. फाइल्सच्या कुठल्याही डाटाबेसची नोंद त्यांच्या निर्मितीच्या शोधात जास्तीतजास्त त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या इंस्टोलेशनपर्यंत जाऊ शकते. जशी आपली बिग बँग पर्यंत जाते. 
२. या कम्प्युटरमधील ऑपरेटिंग सिस्टीम हे जीवनचक्र आहे. तर हार्डवेअर हे फिजीकल मॅटर (म्हणजे आपली पंच महाभूते). इव्होल्युशन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट होत राहणे. ओ.एस.मध्ये बदल होत राहतो, मात्र हार्डवेअर बदलत नाही (जशी पंच महाभूते कायम आहेत). समजा फ़ाइल्स एका इंटेलीजंट सिस्टीमचा भाग असल्याने त्यांस स्वत:चा सोर्स कोड शोधण्याची भावना निर्माण झाली तर काय होईल? फ़ाइलची जी अड्रेस इन्फो असते त्या धाग्याने मग फाईल्स त्यांना रन करणाऱ्या इनिशियल अड्रेसला म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टोलेशन फाइललाच आपला निर्माता किंवा देव मानतील. त्यातही पुन्हा काही जण त्या संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टोलेशन फाइलला एकच फोल्डर मानतील आणि म्हणतील की देव एकच आहे. तर काही जण त्यातल्या सगळ्या सब-फोल्डरांना देव मानून अनेकेश्वरवादाचा पुरस्कार करतील.  प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम हे एक वेगळ्या कल्पनेतले विश्व असेल. जसे भारतात भारतीय उपखंड हीच संपूर्ण पृथ्वी किंवा विश्व होय असा प्रघात पूर्वी प्रचलित होता, तर आज आपली गैलेक्सी हे आपले विश्व आहे.

३. आताची जी क्लिष्ट धर्म पद्धती आहे ती स्पष्ट करण्यासाठी वर सांगीतल्याप्रमाणे ओएसला विश्व मानू.
सगळ्या फ़ाइल्स सारख्या काम करत नाहीत. काही फ़ाइल्स गाण्याच्या असतात, काही व्हिडीओच्या असतात,  काही संख्या साठवणाऱ्या तर काही लिखित माहिती साठविणाऱ्या असतात. त्या वेगवेगळ्या मुख्य प्रोग्रामद्वारेच चालतात. उदाहरणार्थ वीएलसी प्लेअर हा विडीओ आणि गाणीच वाजवतो. तर फोटोशोप हे फक्त फोटो फाईल्स प्रोसेस करते. म्हणजे विशिष्ट फ़ाइल्स या फक्त त्या विशिष्ट प्रोग्रामने ठरवून दिलेले नियम आणि मर्यादा यांचेच पालन करतात. थोडक्यात दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास प्रोग्राम्स हे धर्म आहेत. हे प्रोग्राम्स फ़ाइल्स्च्या जीवनपद्धतीचे नियम ठरवून देतात. मग ऍडोब ऍक्रोबॅट हा एक धर्म, विंडोज ऑफिस हा दुसरा धर्म. मॅटलॅब हा एक धर्म, कोरेल ड्रॉ हा एक धर्म असे अनेक धर्म बनतात. आणि माणसांसारखी ईर्ष्या त्यांत निर्माण झाली तर  प्रत्येक धर्म/प्रोग्राम हा स्वत:लाच श्रेष्ठ समजेल हे वेगळे सांगायला नकोच.   
४. आता फक्त विंडोज या विश्वापुरते पाहू. यातील प्रत्येक प्रोग्रामची म्हणजे धर्माची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यांच्या फाईल्सचे स्वरूप वेगवेगळे असते. वेगवेगळी नावे असतात. उदाहरणार्थ .mat हे मॅटलॅबच्या फाईल्सचे नाव असते तर .doc हे एमएस ऑफिसच्या.  काही प्रोग्राम इतरांच्या काही फाईल्स ओपन करू शकतात किंवा स्वत:त सामावून घेऊ शकतात तर काही प्रोग्राम इतरांना आपल्यात सामावून घेत नाहीत. उदाहरणार्थ ऍडोब ऍक्रोबॅट हा टेक्स्ट फाईल किंवा वर्ड फाईल किंवा अगदी पिक्चर फाईलसुद्धा स्वत:त सामावून घेऊ शकतो. जसे काही धर्म इतरांना स्वीकारतात तर काही स्वीकारत नाहीत. काही प्रोग्राम म्हणजे धर्म तर असे असतात की आपल्याच उपजातींना एकमेकांत मिसळू देत नाहीत. जसे एमएस ऑफिसमधील एक्सेलच्या फाईल्स वर्डमध्ये किंवा वर्डच्या एक्सेलमध्ये उघडत नाहीत. हाच तो धर्मांतर्गत जातीवाद होय.

५. आता श्रेष्ठ कोण असा प्रश्न निर्माण झालाच तर  धर्माधर्मात तेढ निर्माण होणे स्वाभाविक आहे. असे झाल्यावर अनेक अडचणी उद्भवतात. मग एक प्रोग्राम दुसऱ्या प्रोग्रामच्या फाईल नुसते उघडणे टाळत नाही तर बहुतांश वेळा ब्लॉक सुद्धा करतो, किंवा अनइंस्टोल करण्यास भाग पाडतो. हा दहशतवाद होय. याउलट काही प्रोग्राम फुकट मिळतात जेणेकरून फुकटच्या लालसेने त्यांचे युजर्स वाढतील. हे म्हणजे लालूच दाखवून धर्मांतर करणे होय.

६. आता जर समजा हे प्रोग्राम एकमेकांवर कुरघोडी करू पाहत असतील तर ते एकमेकांची उणीदुणी काढत आपापला धर्मप्रसार कसा करतील? 
ऍडोब ऍक्रोबॅट हा ऑफिस फाईल्सना सांगेल की बघा तुम्हाला सर्वांना सारखी वागणूक मिळत नाही. वेगवेगळ्या जातींत भेदभाव केला जातो. सर्वात सुंदर आहेत त्या .ppt फाईल्स. कुठेही प्रेजेंट करण्यासाठी .ppt वापरले जाते. बिचारे .doc आणि .xls एवढी मेहनत घेतात पण त्यांना हा मान मिळत नाही. एवढेच नाही तर तुमच्या फाईल सगळ्या भाषांना समान वागणूक देत नाही. फक्त प्रस्थापितांच्या फॉंन्टला रेकोग्नाइज केले जाते. विशेषत: भारतीय फॉंन्टशी तर फार भेदभाव केला जातो. त्याउलट आमच्याकडे पहा, आमच्या सगळ्याच फाईल्स .pdf आहेत आणि सगळ्यांना सारखाच दर्जा आहे, मग भलेही तिचे कंटेंट हे चित्र, संख्या किंवा मजकूर असे काहीही का असेना. एवढेच नाही तर आम्ही प्रत्येक भाषेच्या फॉंन्टला सुद्धा समान दर्जा देतो. म्हणून हे .doc आणि .xls फाईल्सनो तुमच्यावरील .ppt चा अन्याय टाळायचा असेल, भेदभाव नष्ट करायचा असेल, समानता आणायची असेल तर .pdf बना.
कोरेल ड्रॉ म्हणेल तुम्ही आमच्यात या आम्ही तुम्हाला सुंदर बनवू. तुमचा दर्जा वाढवू. हेच पहा ना आमच्या छोट्यात छोट्या फाईलची साइज सुद्धा २ एमबी पेक्षा कमी नसते. तुम्ही २० केबीचे असाल तरी आम्ही तुम्हाला २० एमबीचे बनवू. म्हणून स्वत:चा दर्जा वाढवायचा असेल तर आमच्यात या.  
ऑफिस म्हणेल आमची परंपरा उज्वल आहे, उदात्त आहे.  आमचा धर्म वैश्विक आणि सर्वमान्य आहे. बाकीच्या सगळ्या धर्मांचा मूळ पाया आम्हीच आहोत. तेव्हा या उदात्त परंपरेचा भाग व्हायचे असेल तर पुन्हा आमच्यात या. 
...............
तर एकंदर सारे असे आहे. या कम्प्युटर प्रमाणेच आपला देव, धर्म हे सारे इतकेच काल्पनिक अथवा अमूर्त आहे. या सगळ्या आपण विनाकारण पाडून घेतलेल्या कल्पित सीमा आहेत.
आपल्या उत्पत्तीविषयी बोलायचे झाले तर एकच खरे की जर आपल्याला निर्मिणाऱ्या शक्तीला आपणांस सांगायचेच नसेल तर आपली  खरी निर्मिती कशी झाली, कुणी केली हे आपल्याला काहीही केल्या समजू शकत नाही. कारण आपली क्षमता, पोहोच ही मर्यादित आहे. तसेच प्रत्येक प्रोग्रामसारखा प्रत्येक धर्म आपापल्या जागी योग्य आहे. कुणी आम्हीच श्रेष्ठ आहोत असे म्हणत असेल तर ते खरे नाही. प्रत्येकाची निर्मिती काही विशिष्ट कार्य सिद्धीस नेण्यासाठी झाली आहे. इन्डीविज्युअल फाईल आणि तिच्यात असलेल्या माहितीचा दर्जा महत्वाचा. ती कोणत्या प्रोग्राममध्ये बनली अथवा कोणत्या प्रोग्राममध्ये कार्य करते हे महत्वाचे नाही. असे विभ्रमित करणारे भेदभाव अथवा श्रेष्ठ कनिष्ठता कम्प्युटर आणि त्यातल्या फाईल्स पाळत नाहीत. म्हणून एकत्रितरीत्या ती एक उच्च दर्जाची सिस्टीम ठरते. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी हे जग चांगले बनविण्यास आपापल्या परीने हातभार लावला तर आपल्याही सिस्टीममधून एक अत्यंत सुंदर आणि मौल्यवान आउटपुट मिळेल.