हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

धर्म:भाषा:विज्ञान:गणित

अनेकदा आश्चर्य वाटते की लोकांनी त्यांच्या धर्मग्रंथांत एवढे चुकीचे लिहून ठेवले आहे ते सगळे खरे कसे मानले असेल? म्हणजे माणसे इतकी कशी बुद्धीहीन असू शकतात की कुणीतरी सूर्य बनवला म्हणून तो बनला, कुणीतरी प्राणी बनवले म्हणून ते बनले. हवेत उडणारी माणसे होती, उंदरावर बसणारा हत्ती होता, माणसाच्या भाषेत बोलणारे प्राणी होते, कुठूनतरी वेगळ्याच अवयवांतून माणसे जन्माला येत होती आणि एकंदरच जे काही जगातील तमाम धार्मिक पुस्तकांत लिहिले आहे ते बुद्धिमत्तेच्या कसोटीवर अजिबात टिकायला नको असूनही तब्बल तीन चार हजार वर्षे लोकांनी ते खरे म्हणून स्वीकारले?
इतका प्रदीर्घ काळ कोणतीही गोष्ट सत्य म्हणून तेव्हाच टिकते जेव्हा त्याला सामूहिकपणे सत्य म्हणून मान्यता मिळते. अर्थात मानव इतकेही मूर्ख नाहीत की कुणीही काहीही भंकस सांगितली तर ते सत्य म्हणून सहज स्वीकारतील. तर सामान्य माणसांना जी माणसे हुशार वाटतात, बुद्धिमान वाटतात, आपल्याहून स्पेशल वाटतात त्यांनी जर काही सांगितले असेल तरच माणसे गोष्टी स्वीकारतात. इब्राहिम, मोझेस असो की भारतातले ऋषीमुनी या लोकांना एक वेगळा आणि श्रेष्ठ दर्जा प्राप्त होता म्हणून यांनी जे सत्य म्हणून सांगितले ते सामान्य लोकांनी स्वीकारले. भारतातच बघा ना, ऋषी म्हणजे तप करणारे, ज्ञानी लोक अशी मान्यता आहे. मग अर्थातच ते जे सांगणार ते सत्यच असणार असे सामान्य लोक मानत होते.
 
बायबल हिब्रू मध्ये होते, युरोपात ते लॅटिनमध्ये होते, कुराण अरबी मध्ये आहे. वेद संस्कृत मध्ये होते. आणि आज हे धर्म एकमेकांचे कितीही विरोधक असले तरी या सगळ्यांत एक गोष्ट कॉमन आहे. सुरुवातीच्या काळात कदाचित बहुतांच्या असतीलही, पण त्यानंतरच्या हजारो वर्षांत या भाषा फक्त काही लोकांच्या भाषा होत्या. सामान्य लोकांच्या भाषा या भाषांहून वेगळ्या होत्या. अगदी इजिप्त असो की चीन, सगळीकडे विद्वानांची भाषा ही वेगळी होती आणि सामान्यांची वेगळी. आणि सगळे धर्मग्रंथ हे त्या विद्वानांच्या एलिट भाषेतच लिहिलेले होते जी भाषा सामान्यांना समजत नव्हती. त्यामुळे त्यात नेमके काय लिहिले आहे ते लोकांना कधी कळलेच नाही. लोकांपर्यंत आलेही काय तर त्या अनुषंगाने बनलेल्या काही मनोरंजक कथा. अनेकदा तर या कथा मूळ धर्मग्रंथांत अस्तित्वातच नसतात. 
तर हे एक मॉडेल आहे. लोकांच्या गळी काहीतरी उतरवण्याचे.  गाईड फिल्म मध्ये एक सिन आहे. काही पंडित देवानंदला चॅलेंज देतात की तू बोलतोय ते खोटे आहे. जर तू खरेच कोणी ज्ञानी असशील तर मी सांगतो त्या श्लोकाचा अर्थ सांग. मग तो पंडित एक श्लोक म्हणतो, देवानंदला अर्थातच तो कळत नाही. मग ते पंडित लोकांना म्हणतात, बघितले? याला काही कळले नाही, समझेगा कैसे, संस्कृत आती हो तब ना. मग देवानंद इंग्रजीत काही बोलून त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवतो पण मुद्दा हा आहे की हे जे मॉडेल आहे त्यात हे अपरिहार्य आहे की तथाकथित ज्ञान हे लोकांना कळेल अशा भाषेत असता कामा नये. ते लोकांना कळणार नाही, केवळ काही लोकांनाच कळेल अशा भाषेत असले पाहीजे. त्या भाषेत असेल तेच सत्य, इतर भाषांतील ते असत्य. लोकांनी एकदा या दाव्याला सत्य म्हणून मान्यता दिली तर त्या भाषेच्या नावाखाली जे काही सांगितले जाईल ते हजारो वर्षे सत्य म्हणूनच स्वीकारले जाईल.

आता कट टू विज्ञान
आज आपण खरे सत्य काय तर विज्ञानाने जे सिद्ध केले तेच सत्य होय असे मानतो. आपल्यातल्या कुणीही इलेक्ट्रॉन पाहिलेला नाही, ऑक्सिजन खरेच आहे का हे तपासलेले नाही, पृथ्वी गोल आहे हे आकाशातून स्वतः पाहिलेले नाही. पण आपण सगळे वैज्ञानिक लोकांवर विश्वास ठेवून हे सगळे सत्य आहे असे मानतो. कारण वर सांगितल्याप्रमाणे हुशार माणसांनी सांगितले तर ते खरे आहे असे मानण्याची आपली हजारो वर्षांची प्रवृत्ती आहे. ठीक आहे कोणीही आपल्या शरीरात आणि झाडांत कार्बन आहे हे तपासू शकते, पण खरेच जगातील किती लोक हे प्रत्यक्ष तपासतात? अगदी विज्ञानाच्याही किती विद्यार्थ्यांनी, वा अगदी वैज्ञानिकांनीही प्रकाशाचा वेग स्वतः मोजून पाहीला आहे? तरीही आपण हे सगळे काही सत्य म्हणून स्वीकारतो.

ही पोस्ट वाचणारांपैकी 90 ते 99 टक्के लोकांचा शाळेतील सर्वात नावडता विषय कोणता असेल तर तो म्हणजे गणित. तो नावडता का आहे? तर तो क्लिष्ट आहे, समजायला अवघड आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोपे आहे पण एकदा का गणितात एबीसीडी वा थिटा घुसले की ते अत्यंत अवघड होऊन जाते.
जी वैज्ञानिक तथ्ये आज आपण सत्य म्हणून स्वीकारतो ना, ती सगळी तशी स्वीकारली गेलीत कारण ती गणिताने सिद्ध होतात. ही गणिते सगळ्यांसाठी उपलब्ध असल्याने कोणीही ती सोडवू शकतो. म्हणून त्याला सत्य म्हणून मान्यता आहे. आणि ते नक्कीच योग्यही आहे. कोणतेही वैज्ञानिक शोध हे गणिताच्या सूत्रात बसल्याशिवाय त्याला सत्य म्हणून मान्यता मिळत नाही. थोडक्यात काय की गणित ही विज्ञानाची भाषा आहे.
जसे धर्मग्रंथ हे अवघड वा सामान्य लोकांना न समजणाऱ्या भाषेत होते, तरीही त्यांना सत्य म्हणून मान्यता होती तसे आज 90 टक्के लोकांना गणित अवघड जाते वा कळत नाही तरीही गणिताने सिद्ध झालेल्या तथ्यांना 100 टक्के विज्ञानवादी लोक खरे मानतात.

धर्म म्हणजे तरी मूळात काय होते, तर विश्व कसे चालते त्याचे त्याकाळचे उत्तर. त्या उत्तराला मग परंपरा रूढी जोडल्या गेल्या आणि तो संघटित धर्म बनला. विज्ञान म्हणजे सुद्धा काय तर विश्व कसे चालते याचे आजचे उत्तर. याच उत्तराला अनुसरून मग आपल्या उपयोगी येतील अशी काही तंत्रे बनवली गेली आणि ते उपयुक्त वा सत्य म्हणून स्वीकार झाले.

तर हिब्रू, अरामाईक, लॅटिन संस्कृत यांसारखीच विज्ञानाची भाषा आहे गणित. खूप अवघड.! म्हंटले तर कोणीही वापरू शकतो, पण तरीही 99 टक्के लोकांना प्रत्यक्षात वापरता येणार नाही अशी ही भाषा आहे.

रिसेंटली मी स्टीफन हॉकिंग (Universe in a nutshell), रिचर्ड फिनमन (Six easy pieces), ब्रायन ग्रीन (The hidden reality) यांची ही पुस्तके वाचली. क्वांटम आणि स्ट्रिंग थिअरी या दोन थिअरी या पुस्तकांत विश्वाचे रहस्य कसे उलगडतात ते सांगितले आहे. त्यातही स्ट्रिंग थिअरी ही आज सगळ्यात हॉट आहे. अनेकांच्या दाव्यानुसार स्ट्रिंग थिअरी ही हे विश्व कसे चालते त्याचे परफेक्ट उत्तर आहे. आज जवळजवळ सगळ्याच मोठ्या सायंटिस्ट लोकांची स्ट्रिंग थिअरीला मान्यता आहे. स्ट्रिंग थिअरीनुसार हे विश्व व त्यातील एकुणएक अणूरेणू हे स्ट्रिंग म्हणजे एक प्रकारच्या तंतूंपासून बनलेले आहेत. हे क्लिष्ट आहे पण समजून घ्या की विश्वातील प्रत्येक वस्तू या अविरत हलत्या तंतूंपासूनच बनली आहे असे ही थिअरी सांगते. आणि या थिअरीचे सगळे निष्कर्ष हे गणिताने सिद्ध होतात. यांचे खूप अचाट दावे आहेत आणि त्या दाव्यांसाठी अगदी क्लिष्ट अशी गणिते आहेत. हॉकिंग, ब्रायन हेही मान्य करतात की यातील अनेक गणिते त्यांनाही सोडवता येत नाहीत. पण तरीही स्ट्रिंग थिअरी आज सगळ्यात अधिक ताकदवान मानली जाते. 
पण गंमत सांगू का? ही फक्त आणि फक्त गणितावर आधारित थिअरी आहे. आजपर्यंत कुणीही कोणत्याही प्रयोगाने एकही स्ट्रिंग शोधू शकले नाहीय. तो लार्ज हॅड्रोन कोलायडर अविरतपणे शोधतो आहे पण अजूनही त्याला एकही स्ट्रिंग मिळाली नाहीय. 
या स्ट्रिंग थिअरीनुसार जगात आपण अनुभवतो तशी फक्त तीन डायमेंशन (मिती) नाहीत तर तब्बल 10 डायमेंशन्स आहेत. बरे ही एवढी डायमेंशन्स आहेत याचा काय पुरावा? वा काय निरीक्षण आहे ज्यामुळे इतकी डायमेंशन्स आहेत असे ही थिअरी म्हणते? तर काहीही नाही. केवळ आणि केवळ त्यांची गणिते पूर्ण होण्यासाठी त्यांना 10 डायमेंशन्स गृहीत धरावी लागतात म्हणून विश्वात 10 डायमेंशन्स आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण 10 डायमेंशन्स गृहीत धरली की त्यांचे गणित सुटते म्हणून ती आहेत असे ते मानतात.
आज स्ट्रिंग थिअरी जगात इतकी पॉप्युलर आहे की मी वा कुणीही म्हंटले की स्ट्रिंग थिअरी बरोबर वाटत नाही तर मला मूर्ख मानण्यात येईल, का? कारण जे गणितात इतके चपखलपणे बसते आहे त्याला तू चूक कसे म्हणू शकतोस? 
बरे यात इतकी एडवांसमेंट झाली आहे ना, की मुळात एका कल्पित संकल्पनेवर आधारित असलेले गणित घेऊन पुढे त्याभोवती अजून हजारो गणिते आणि हजारो गृहीतके मांडली गेलीत. या एकाही गृहितकाला काहीही प्रयोगाचा वा निरीक्षणाचा आधार नाही तर हा सगळा डोलारा म्हणजे फक्त आणि फक्त गणिताचा खेळ आहे. एकापाठोपाठ एक अत्यंत क्लिष्ट होत जाणारी गणिते मांडून या थिअरीचा विकास चालू आहे. पण जर मुळातच पायाभूत संकल्पना चूक असेल तर वरचे मजल्यावर मजले चढवण्यात काय अर्थ आहे? वर कितीही आकर्षक मजले चढवले तरीही पायाच बरोबर नसेल तर इमारत ढासळणारच.  जसे ईश्वर या मूळ चुकीच्या संकल्पनेभोवती कित्येक वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या कथा निर्माण झाल्या तसे स्ट्रिंग थिअरी भोवती 5 थिअरी निर्माण झाल्यात. एक त्या सगळ्यांना जोडणारी थिअरीही तयार झालीय. या थिअरीनुसार प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पेक्षाही छोट्या स्ट्रिंग आहेत आणि अगदी पृथ्वीला वेढा घालतील एवढ्या मोठ्या स्ट्रिंगही आहेत. काहींनी तर यातील ब्रेन (मेंदू नाही तर मेंब्रेन मधले ब्रेन. हे सतरंजी सारखे सपाट काल्पनिक प्रतल आहे) हे ब्रह्मांडाइतके मोठे आहेत असे गणित मांडले आहे. असे कसे असू शकेल ज्या स्ट्रिंगने मूळ कण म्हणजे इलेक्ट्रॉन वगैरे बनतात ते त्यांच्याहुन छोटे आणि त्यांच्यातून कोट्यवधीपट मोठेही असू शकतात? पण तरीही आज या एका थिअरीची हजारो गणिते आणि हजारो इंटरप्रिटेशन्स बनलेली आहेत.
मला वाटते आज जगात बेसिक रिसर्चसाठी जो पैसा खर्च केला जातो त्यातील अर्धा हा स्ट्रिंग थिअरीवर खर्च होतोय. पण जर मूळ संकल्पनाच चूक असेल तर ही सगळी संपत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात यात एंगेज असलेली सर्वोत्तम मानवी बुद्धी वाया जात नाहीय का? जर ही थिअरी चूक निघाली तर विज्ञानाची ऐन उमेदीची कमीतकमी लास्ट 50 वर्षे तरी वाया गेली असे म्हणावे लागेल. 

असो, तर मुद्दा आहे की गणित ही नवी भाषा आहे. विज्ञान हे सत्य शोधण्याचे नवे साधन आहे, आणि जशी पूर्वी धर्मांची भाषा न समजणारी होती तशी आज गणिताची भाषाही सर्वांना न समजणारी आहे. आणि तरीही जे गणिताने सिद्ध होईल तेच सत्य, अशी आज जागतिक मान्यता आहे. जसे धर्मग्रंथात म्हणजेच एलिट भाषेत लिहिले ते सत्य होय अशी मान्यता होती. नक्कीच गणित महत्वाचे आहे पण ठोस पुरावा नसताना फक्त गणिताने सिद्ध होते म्हणून एखाद्या संकल्पनेला सत्य मानणे हे मात्र चूक आहे असे माझे म्हणणे आहे.

(नेहमी फक्त देव, धर्म, अंधश्रद्धा यांचेच काय उणेदुरे काढायचे? विज्ञानजगत जर चुकत आहे असे वाटले तर त्याचेही उणेदुरे काढले पाहीजेत. विज्ञान असो की अंधश्रद्धा, एखादी गोष्ट पटत नसेल तर आक्षेप नोंदवलेच पाहीजेत. कारण आपण विज्ञानाचे अभ्यासक आहोत, भक्त नाही)

रविवार, २२ जून, २०२५

आर्थिक साक्षरता

१. इट्स ऑल अबाउट मनी हनी

सिकंदर, औरंगजेब, ओबामा, ओसामा, ट्रम्प, चंद्रगुप्त, नेपोलियन, थॉमस एडिसन, हडप्पा संस्कृती, मेसोपोटेमिया, मंदीर, चर्च, मशीद, रावण, मोझेस, मुंबई, मोझाम्बिक या सगळ्या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या धर्मात होऊन गेलेल्या लोकांत एक गोष्ट कॉमन आहे. सगळेच्या सगळे पैसा या एका संकल्पनेला हमखास मानतात. एकवेळ देवाला वा धर्माला यातील कोणी मानणार नाहीत, पण पैसा वा संपत्ती या गोष्टीला झाडून सगळेच्या सगळे खलपुरुष वा सत्पुरुष वा स्त्रिया हे मानतात म्हणजे मानतातच.
जेव्हा माणूस शेती करायला लागला आणि धान्य साठवू लागला, तेव्हा केव्हातरी 'संपत्ती' या संकल्पनेचा जन्म झाला. शेती आणि गाव हे मागेपुढेच अस्तित्वात आले. माणूस मोठे समूह बनवून राहू लागला. त्यावेळी त्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडू लागली. प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असू शकत नाही, म्हणून मग 'माझी वस्तू घेऊन तुझी वस्तू दे' असे व्यवहार सुरु झाले तेव्हापासून संपत्ती ही संकल्पना अस्तित्वात आली ती आजतागायत. देवाची, धर्माची रूपे आणि संकल्पना ही सुद्धा काळानुरूप मागच्या १०००० वर्षांत खूप बदलत गेली, पण आपल्याकडील संपत्तीच्या बदल्यात दुसरी संपत्ती घेणे व देणे हे मात्र जसेच्या तसे कायम आहे. हडप्पा संस्कृतीत धर्म होता का, जाती होत्या का, काव्ये होती का, राजा होता का हे आपल्याला नक्की माहित नाही, पण व्यापार मात्र नक्की होता याचे पुरावे मिळतात. ही पैशाची ताकद आहे.
'वीज चमकवणारी, पाऊस पाडणारी कोणतीतरी अज्ञात शक्ती' अशी देवाची सुरुवात होती, ती मग पुढे विश्वाचे निर्माण करणारा अज्ञात व्यक्ती अशी झाली. मग देवाला मानवी रूप मिळाले, मग देव अगदी माणसातही अवतार घेऊन आले. जगभरातले राजे स्वतःला ईश्वरच म्हणवून घेत असत. मग देवाचे पुत्र आले, मग प्रेषित आले. अशा प्रकारे काळानुरूप देव मुळातून खूप बदलत राहीला. पण 'तुझे दे आणि माझे घे' ही पैशाची संकल्पना काही बदलली नाही. इतकेच नाही तर देव, धर्म, राज्यव्यवस्था हे सगळे काही पैशाच्याच आधाराने वा आधारासाठी उभे राहीले. आपण सहसा म्हणतो की पैशापेक्षा सत्तेची ओढ जास्त असते, पण खरे तर सत्ता हा सुद्धा पैसा मिळविण्याचाच एक मार्ग/साधन आहे. लोक धर्मासाठी, देवासाठी जेवढे वेडे होणार नाहीत त्याहून जास्त पैशासाठी होतात. बिल गेट्सने दर तासाला २ कोटी रुपये खर्च केले तरी त्याची संपत्ती आयुष्यभर संपणार नाही. मात्र तरीही तो अजून पैसे कमविण्याच्या मागे लागलेलाच आहे. पैशाने मिळू शकेल असे त्याला जे पाहीजे ते सगळे काही उपभोगण्यासाठी सहज खरेदी करू शकत असूनही तो अजून अजून पैसे कमावण्याच्या मागेच लागलेला आहे. याहून मोठा अन्य वेडेपणा काय असू शकतो? ओसामा हा ओबामाच्या देवाला व धर्माला शून्य किंमत देत होता, मात्र ओबामाच्या डॉलरची जेवढी किंमत ओबामासाठी होती तेवढीच किंमत ओसामासाठीही होती. ती मात्र तो विनातक्रार अगदी तंतोतंत पाळत होता.
औरंगजेबाच्या साम्राज्यात म्हणे २८ परगणे होते आणि शिवाजी महाराजांचे राज्य हे त्यातील कोणत्याही एका परगण्याहूनही कितीतरी छोटे होते. तरीही तो ते संपविण्यासाठी दक्षिणेत आला. का? कारण पैसा. कोणताही राजा राज्यविस्तार का करतो? तर महसुलाचा म्हणजे कराचा मुलुख वाढविण्यासाठी. 'जितका आपल्या ताब्यातील प्रदेश मोठा, तेवढा कररूपाने मिळणारा पैसा जास्त' असे हे साधे गणित आहे. जेवढे होते त्याच्याहुन दहा टक्के छोटे इतकेच राज्य असते तरीही औरंगजेब हा सम्राट म्हणून जगातील सर्वोत्तम सुखांचा उपभोग घेऊ शकत होता. पण नाही. बिल गेट्सला जसा अजूनही पैसा कमवायचाच आहे, तसे तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत राजा असूनही औरंगजेबाला अजून पैसा कमवायचाच होता. तुलनेने अगदी छोट्या भूभागावर का असेना पण कुणीतरी विद्रोही राजा आपला महसूल हक्क मारतो आहे, आपल्या शहरांना लुटतो आहे, आपली संपत्ती बळकावतो आहे, वा वाढविण्याला विरोध करतो आहे हे कुणाही शक्तिशाली राजास कसे सहन होईल? म्हणून औरंगजेब इकडे महाराष्ट्रात आला. आज जसा इलॉन मस्क भारतात येतोय तसा तेव्हा औरंगजेब आला. दोघांची साधने वेगवेगळी आहेत पण उद्दिष्ट एकच... पैसा.!! जसा महाराष्ट्रात न येताही औरंगजेब हा तेव्हाच्या जगातील सर्वात श्रीमंत दुसऱ्या क्रमांकाच्या सम्राट चौदाव्या लुई पेक्षा दहापट अधिक श्रीमंत होता (अनेक दाव्यांनुसार), तसाच भारतात न येताही इलॉन मस्क हा ऑलरेडी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेच. आणि तशा अर्थाने त्याच्यासाठी भारतात येणे हे खरेतर इनसिग्निफिकंट आहे, पण तरीही माय फ्रेंड डोलान्डचा विरोध पत्करूनही तो भारतात येतोय. इंग्रज हजारो किलोमीटरवरून का आले? केवळ पैशांसाठी. 
धर्म, सत्ता ही पैशासाठीच वापरण्यात येणारी प्रमुख साधने आणि दुय्यम उद्दिष्टे आहेत. पण कोणीही मी हे पैशासाठी करतो आहे हे मान्य करायला तयार होत नाही. कारण का कुणास ठाऊक पण मी हे पैशांसाठी करतोय हे सांगणे लोकांना लज्जास्पद वाटते. त्याऐवजी मी हे जनतेसाठी करतोय, मी हे धर्मासाठी करतोय, मी हे राष्ट्रासाठी करतोय, मी हे प्रगतीसाठी करतोय हे सांगणे अभिमानाचे ठरते. पण हे तद्दन खोटे असते. मला इतिहासातील एक राजा वा राजनेता सांगा ज्याने जनतेकडून अजिबातही कर घेतला नाही. वा ज्याने इतर राज्यातील जनतेला वा राजाला अजिबात लुबाडले नाही, वा ज्याने इतर प्रदेश जिंकून घेतल्यावर तिथल्या लोकांवर, वा पराभूत राजावर अजिबात कर लावला नाही. असा कोणी राजा सांगा ज्याने आपला वारस म्हणून आपल्याच वंशातील कोणीतरी राज्य चालवेल अशी तरतूद करून न ठेवता पुढचा राजा जनतेतूनच एखादा योग्य माणूस बनेल अशी व्यवस्था बनवली. किमान असा कोणी राजा ज्याने त्याचा प्रदेश वा सत्ता वाढल्यावर आपल्या जनतेवरील कर हळूहळू कमी करत नेला? असा कोण राजा होता ज्याने स्वतःसाठी अजिबात लग्झरी न घेता, जनतेसारखे कपडे, रहायला जनतेसारखी झोपडी इत्यादिच वापरली? खरे हे आहे की असा कोणीही राजा या पृथ्वीवर कधी अस्तित्वात आला नाही. जर जनतेसाठी कुणाचे राज्य असते तर स्वतःच्या राज्यातील लोकांकडून घेतले जाणारे कर हे त्याने शून्य वा किमान अत्यल्प करायला हवे होते. आणि धर्मासाठी असते तर आपल्याच धर्माच्या दुसऱ्या राज्यावर त्याने स्वारीच करायला नको होती. पण तसे कधीही झाले नाही. स्वतःच्या धर्माच्या, भाषेच्या, देशाच्या लोकांनाही प्रत्येक राजाने ठार मारलेच आहे. यावरून सिद्ध होते की कोणीही धर्मासाठी, जनतेसाठी वा देशासाठी राज्य स्थापन करत नव्हता, तर पैसा हाच प्रत्येकाच्या मागचा सर्वात मोठा ड्रायविंग फोर्स होता. धर्म, राष्ट्र, जनकल्याण हे सगळे फक्त या संपत्ती मिळविण्याच्या कार्यातले मुखवटे असतात. कुणी कितीही मानवकल्याणाचा वा धर्मरक्षणाचा दावा करो, मेंकेन म्हणतो तेच खरे आहे की, "The urge to save humanity is almost always only a false-face for the urge to rule it." आणि फक्त राजसत्ताच नव्हे तर देव, धार्मिक स्थळांचेही तेच आहे. ओशो म्हणतात की तुम्ही जर पैसे देणे बंद केले तर सहा महिन्यांत जगातील तमाम मंदिरे, मशिदी व चर्चेस हे सपशेल बंद पडतील. या स्थळांना देव नाही तर पैसा चालवत असतो. गाडगे महाराज नाही का म्हणत की 'मंदिरात देव नसतो, तर मंदिरात पुजाऱ्याचे पोट असते'. देवाचे प्रार्थनास्थळ असो, की राज्यसत्ता की एखादा अन्य व्यवसाय. ही सगळी फक्त वेगवेगळी बिजनेस मॉडेल्स आहेत आणि अपरिहार्यपणे पैसा कमावण्याचीच साधने आहेत. देव आणि धर्म या बिजनेस मॉडेल मध्ये फसवलेल्या लोकांची अस्मिता आणि भीती हे बिनखर्चाचे भांडवल असते. मला जगातील एक धार्मिक स्थळ सांगा जे एकही पैसा स्वीकारत नाही, वा अशी राज्यव्यवस्था सांगा जी एकही पैसा मिळवत नाही, मग मी माझे म्हणणे नक्की बदलेल. 
अर्थात जशी कंपनी चालवायला काही पैसे लागतात, तसे राज्य चालवायलाही पैसे लागतात हे मान्य. पण दोन्हींत जास्तीतजास्त नेट प्रॉफिट कमावणे हाच उद्देश असतो. अगदी आजही ट्रम्पचे आकांडतांडव कशासाठी चालू आहे, तर जास्तीतजास्त पैसा ओढून आणण्यासाठी. आपले राजनेते निवडणूक कशासाठी लढतात? आयएएस बनण्यासाठी लोक का प्रचंड मेहनत घेतात? तर पैशांसाठी.!! हे पैसे स्वतः, कंपनी, मुले, संस्था, राजकीय संघटना, नातेवाईक, मित्र अशा आपल्या कोणत्याही हितकारक संस्थेसाठी असू शकतात. देशसेवा, धर्मसेवा, भाषासेवा ही सगळी फक्त त्यासाठीची साधने आहेत. खरेतर आपण पैशांसाठीच हे सगळे करतोय हे सांगण्याची सगळ्यांनाच लाज वाटते म्हणून ही बाकीची साधने मुखवट्याच्या स्वरूपात पुढे केली जातात. ही साधने पुढे केली की जनमान्यता तर मिळतेच वरून आपण पैसे मिळवावेत यासाठी फुकट वा अगदी अल्प मोबदल्यात काम करायला मूर्ख पण झपाटून काम करणारे कामगार उपलब्ध होतात हेही एक कारण आहे. एक धार्मिक बाबा आहे, जो त्याच्या आश्रमात सेवेच्या नावाखाली भक्तांकडून फुकट कामे करवून घेतो आणि त्यांनी बनवलेले प्रोडक्ट हे मोठ्या किंमतीला बाजारात विकतो. पण त्याच्या भक्तांना हे सांगितले तर ते भडकतील आणि आमच्या स्वामी महाराजांवर असा आरोप करतोस? म्हणून उलट आपल्यावरच उखडतील. म्हणून मी म्हंटले की अस्मिता या भांडवलावर मुबलक आणि जवळजवळ मोफत असे अगणित कामगार मिळवण्याचे हे फुलप्रूफ बिझनेस मॉडेल आहे. दहशतवादी लोक सुद्धा जे धर्माच्या नावाने तरुणांना भडकावून अतिरेकी कृत्ये करायला लावतात त्यामागे पैसे मिळवणे हे मुख्य कारण असते. दहशतवादी संघटनेत सामील झाला म्हणून अजमल कसाबच्या बापाला काही पैसे देण्यात आले होते. टेररिस्ट लोकांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे देणग्या, लूट आणि खंडणी. विशेषतः लूट आणि खंडणी यांसाठी त्यांना दहशत माजवणे जरुरी असते. अफगाणिस्तानात तालिबान वा त्यांचे विरोधी यांची लढाई खरेतर धर्मासाठी व देशासाठी नव्हती तर देशातील अफीमच्या अवैध उत्पन्नातील पैसे तसेच हायवे टोल टॅक्सचा पैसा मिळविण्यासाठी होती. धर्म फक्त साधन असते. फुकट किंवा अत्यल्प मोबदल्यात अगदी जीवावर उदार होणारे मजूर मिळविण्यासाठी धर्म हे एक सोपे आणि प्रभावी साधन आहे. 
हेच कमीअधिक प्रमाणात राजकीय पक्ष, कंपन्या हे सगळे करत असतात. कंपन्यांचे मालक नाही का आवाहन करत की ही कंपनी जगातील एक नंबरची कंपनी व्हावी अशी माझी इच्छा आहे, मग त्यासाठी तुम्ही माझी साथ द्यायला तयार आहात का? की लगेच कंपनीचे सगळे कर्मचारी अस्मिता अन अभिमानाने आणि जोशात अजून काम करायला तयार होतात. ऑलरेडी ग्रेट असलेल्या अमेरिकेला करायचे का पुन्हा ग्रेट? किंवा कोणत्याही खतऱ्यात नसलेल्या बहुसंख्य धर्माला वाचवायचे का अल्पसंख्यांकडून (or vice versa)? असे आवाहन केले की सारा सारासारविवेक गहाण टाकून कित्येक मंदबुद्धी लोक बिनपगारी कामगार बनायला स्वेच्छेने तयार होतात. अस्मिता आणि अभिमान गोंजारणे हे आपल्या देशातच नाही तर जगभरातले अगदी हुकमी असे चलनी नाणे आहे.
सांगायचे हे आहे की कोणतीही व कुणाचीही कामे करा, पण त्याचा योग्य मोबदला मिळेल याची सुनिश्चीती करून घ्या. जर तुम्ही फक्त अस्मिता, अभिमान आदी कारणांनी कुणासाठी तरी फुकट राबत असाल तर तुम्ही तुमच्या कष्टांनी इतर कुणालातरी श्रीमंत करत आहात. देव, धर्म, तत्व, कर्म या सगळ्यांपेक्षा पैसा हा जास्त शक्तिशाली आहे. किंबहुना ही सगळी अल्टीमेटली पैसा मिळविण्याचीच साधने आहेत आणि यात सहसा सामान्य जनता ही गमावणाऱ्याच्याच भूमिकेत असते, कमावणाऱ्याच्या नाही. त्यामुळे राबायचेच असेल तर स्वतःसाठी राबा. मी तर म्हणेल की इव्हन पैसा चांगला आहे की वाईट ह्या मंथनाच्या भानगडीत पडणे म्हणजे सुद्धा वेळ व्यर्थ घालवणे आहे. डोन्ट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. चर्चिल नाही का म्हणायचा की जर तुम्ही तुमच्या टीन एजमध्ये कम्युनिस्ट विचारांचे नसाल तर तुम्ही भावनाहीन आहात, आणि जर तुम्ही तुमच्या प्रौढ वयातही भांडवलवादी नसाल तर तुम्ही बुद्धिहीन आहात. जितके लवकर बुद्धिवान बनाल तितके तुमच्या फायद्याचे ठरेल. ठीक आहे सगळ्यांनाच अतिश्रीमंत वगैरे होता येऊ शकत नाही, पण किमान आपल्या क्षमता आणि प्रयत्न यांना योग्य न्याय आणि योग्य मूल्य मिळेल इतके तर प्रत्येकाने कमावलेच पाहीजे असे माझे म्हणणे आहे. तुम्हाला स्वतःला काही उत्पन्न मिळवून देत नसेल तर केवळ भावनेपोटी देव, धर्म, इतिहास यांत आणि स्वतः कमाईने एका कम्फर्टेबल लेव्हलइतके सक्षम बनलेले नसाल तर समाजोद्धार वा विश्वोद्धार यात तारुण्य व आयुष्य खर्च करणे हा माझ्यामते स्पष्ट मूर्खपणा आहे. पैशाने सर्व सुखे विकत घेता येत नाहीत हे १०० टक्के खरे आहे, पण पैशाने किमान जो काही कम्फर्ट मिळवता येतो तो कम्फर्ट देव, धर्म, जात, इतिहास, अस्मिता हे देऊ शकत नाहीत हेही १०० टक्के खरे आहे. त्यामुळे जर करायची खुमखुमीच असेल तर पाहीजे ते कुचकामी नाद खुशाल करा, पण त्याआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा असे मला वाटते.
जगातली सर्वात मोठी शक्ती पैसे हीच आहे. बाकी एकूणएक गोष्टी या पैसे मिळवण्याचेच मार्ग आहेत. राष्ट्र धर्म संस्कृती सगळ्यांचा आधार पैसा हाच आहे. 
पैशाची ही महत्ता जितक्या लवकर आपल्याला समजून येईल तितक्या लवकर आपली प्रगती व उन्नती होईल.

.......

२. पैसा म्हणजे काय 

आपल्या मनात पैशांबद्दल खूप गैरसमज वा अज्ञान असते. आपण सहसा नोटांना पैसा समजतो. पण नोटा या पैसा नाहीत तर चलन आहेत. दोन्हींत फरक आहे. मोदींनी नोटबंदी केली तेव्हा पैसा समाप्त झाला नाही तर फक्त जुन्या चलनाची किंमत संपली. नोट म्हणजे पैसा नाही. खरेतर नोटेचे पूर्ण नाव हे प्रॉमिसरी नोट असे आहे. म्हणजे काय की नोट हा एक असा दस्तावेज आहे ज्यावर ती नोट इशू करणाराने तिची विशिष्ट किंमत मिळण्याची हमी दिलेली असते. हे थोडे उदाहरणाने समजून घेऊ. शिवाजी महाराज हे आपल्या सैनिकांना नेहमी अगदी वेळेवर आणि सहसा ऍडव्हान्स मध्ये पगार देत असत. अनेक सैनिक महाराजांच्या सेनेत सामील होण्यास उत्सुक असत त्याचे एक महत्वाचे कारण वेळेवर पगार मिळतो हेही होते. पण अर्थातच दरवेळी पगार देण्यासाठी महाराजांकडे रोख रक्कम उपलब्ध नसायची. मग अशावेळी पगार हे 'वराता' पद्धतीने दिले जात. म्हणजे सैनिकांना शाही फर्मानासारखा एक कागद लिहून दिला जाई त्यावर त्या कागद दाखवणाराला किती रक्कम द्यायची ते लिहीलेले असे. मग हा कागद घेऊन सैनिक जेव्हा एखाद्या आधीच ठरवून दिलेल्या व्यापाऱ्याकडे जाई तेव्हा मग तो व्यापारी तो कागद घेऊन तेवढी रक्कम त्या सैनिकास देत असे. नंतर किती कागद जमले त्यानुसार त्या व्यापाऱ्याचे सुद्धा पैसे पे केले जात. ही पद्धत थोडी आजच्या चेक/डीडी/नोट सारखीच होती. आजही तुम्ही जर नोटा बघितल्या तर प्रत्येक नोटेवर गव्हर्नरच्या सही सहीत 'मै धारक को अमुक अमुक इतके रुपये अदा करने का वचन देता हूं' असे लिहीलेले असते. हे वचन म्हणजेच प्रॉमिस आणि म्हणून ती प्रॉमिसरी नोट होय. नोटेवरच्या अंकापेक्षा हे वचन लिहिलेला मजकूर हा जास्त महत्वाचा असतो.
पैसा म्हणजे खरेतर संपत्ती. संपत्ती म्हणजे एखाद्याकडे जी एकूण मालमत्ता आहे तिचे मूल्य किंवा किंमत होय. 
आपण अंबानींची संपत्ती अमुक इतके हजार कोटी रुपये आहे असे म्हणतो त्याचा अर्थ हा नाही की त्यांच्याकडे तेवढ्या किंमतीच्या नोटा आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे जी एकूण मालमत्ता आहे तिचे बाजार मूल्य तेवढे आहे. संपत्तीचे मूल्य कधीही फिक्स नसते. तर मागणीनुसार ते बदलत असते. मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे यावर कोणत्याही वस्तूचे मूल्य ठरते. आज जमिनीच्या, घरांच्या किंमती का वाढल्या? अचानक जमिनींची उत्पादकता खूप वाढली आहे का? 30 वर्षांपूर्वी होती त्याहून फार अधिक उच्च दर्जाची घरे बनताहेत का? नाही. जमिनीची उत्पादकता तेवढीच आहे आणि घरांचा दर्जाही तेवढाच आहे. पण वाढले काय आहे? तर मागणी वाढली आहे. भारताची लोकसंख्या 30 वर्षांत 50 कोटींनी वाढली आहे, म्हणजे 50 कोटींनी मागणी वाढली आहे. जमीन वाढत नाही, मागणी मात्र वाढते आहे म्हणून तिची किंमत वाढते. मागणी आणि पुरवठा यांत तफावत झाली की किंमती कमी जास्त होत असतात. मागणी आणि पुरवठा यांच्यानुसार वस्तूंच्या किंमती कशा बदलतात याचे भाजीपाला हे उत्तम उदाहरण आहे. कधी 2 एकरात टोमॅटो लावणारा शेतकरी एका सिजनमध्ये लक्षाधीश होतो तर कधी 10 एकरवाल्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. का? तर मागणी आणि पुरवठा यांच्या गणितामुळे किंमतीत प्रचंड मोठे चढउतार होतात. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असला की टोमॅटो 2 रु किलोनेही मिळतात, पुरवठा कमी असला की 100 रु किलोने विकले जातात.
पूर्वीच्या काळी नाणी हे चलन होते, आता नोटा आणि डिजिटल पैसा हे चलन आहे. आजचा पैसा हा पूर्णतः बँकींगने नियंत्रित केला जातो. प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते जी त्या देशातील पैशावर नियंत्रण ठेवते. जशी आपली रिजर्व बँक आहे. इतर सगळ्या बँका याच रिजर्व बँकेशी संलग्न असतात. प्रत्येक बँकेला आपल्या एकूण ठेवींतली काही रक्कम रिजर्व बँकेकडे ठेवावी लागते. सगळे मिळून साधारण प्रत्येक बँकेत खातेदारांकडून डिपॉजीट झालेल्या एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम बँकांना रिजर्व बँकेत किंवा त्यांनी सांगितलेल्या सरकारी बॉण्ड्स मध्ये गुंतवावी लागते. आणि उर्वरित 75% मधूनच त्यांना कर्जे द्यावी लागतात. जसे आपल्याला बँक सेविंगवर काही व्याज देते तसे रिजर्व बँक सुद्धा बँकांना काही व्याज देते, म्हणून बँका सुद्धा रिजर्व बँकेत पैसे सेव करतात.
मार्केट मध्ये किती पैसा असतो त्यावर देशाची इकॉनॉमी अवलंबून असते. आणि मार्केट मध्ये पैसा हा बँकांच्याच माध्यमातून येतो. उत्पादनात, सेवांत जितका पैसा जास्त असेल तितकी प्रगती अधिक होते. उद्योजक असोत की शेतकरी, ते बँकेकडून कर्ज घेतात, उत्पादन काढतात आणि ते विकून फायदा कमावतात. कितीही मोठी कंपनी असली तरी तिला एक्सपांड करण्यासाठी पैसा लागतोच जो नुसत्याच नफ्यातून मिळत नाही. त्यासाठी कर्ज काढावे लागते किंवा शेअर्स काढावे लागतात. जर अधिक उत्पन्नासाठी पैसे नसतील तर उत्पादन वाढणार नाही, नफा वाढणार नाही. हे झाले उत्पादकांचे. ग्राहकांचे काय? जर ग्राहकांच्या हातात पैसे असले तर ते जास्त खर्च करतील, त्यामुळे उत्पादकांचा नफा वाढेल, आणि एकूण आर्थिक प्रगती जास्त होईल.
जर बँकेत सेविंग किंवा एफडीचे रेट जास्त असतील तर लोक पैसे त्यातच गुंतवतील. खर्च करणार नाहीत, त्यामुळे प्रगतीला खीळ बसेल. म्हणून दिवसेंदिवस सेविंग आणि डिपॉझिटचे व्याजदर कमी कमी होत चालले आहेत. लोकांनी जास्त खर्च केला तरच इकॉनॉमी पुढे जाते.
म्हणजे काय की मार्केट मध्ये जितका जास्त पैसा येईल तितकी जास्त प्रगती होते. मग सरकार अमर्याद पैसे छापून मार्केट मध्ये खूप पैसे का आणत नाही? 
सरकार असे करू शकते, पण करत नाही. का? कारण वर सांगितलेल्या टोमॅटोच्या उदाहरणाप्रमाणे पैशाची किंमत ही सुद्धा मागणी पुरवठा याच तत्वानुसार चालते. किंमत पेक्षा क्रयशक्ती हा जास्त योग्य शब्द आहे. जसे टोमॅटोचा खूप जास्त पुरवठा झाला की त्याच्या किंमती कमी होतात, तसेच खूप जास्त पैसा मार्केटमध्ये आला की त्याची किंमत म्हणजे क्रयशक्ती कमी होते. म्हणजे समजा माझ्याकडे 100 रूपये आहेत आणि मला दोन आंबे घ्यायचे आहेत जे प्रत्येकी 50 रुपयांना आहेत. तर मी दोन घ्यायला शंभर वेळा विचार करेल. आणि म्हणेल की जाऊ द्या एकच आंबा घेऊ. पण जर माझ्याकडे 200 रु असतील तर मी दोन आंबे सहज घेईल. असेच सगळ्यांकडे 100 ऐवजी 200 रु आले तर सगळेच 2 आंबे घेतील. मग आंब्यांना मागणी वाढेल. पण आंब्याचे उत्पादन तर फिक्स आहे. पण मागणी जास्त आहे, अशावेळी मग मागणी व पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी आंब्यांची किंमत आपोआप वाढेल आणि ती 100रु ला एक आंबा अशी होईल. अशावेळी माझ्याकडे 200 रु असूनही मी परत एकच आंबा घेऊ शकेल. म्हणजे माझ्याकडे पैसे दुप्पट झाले तरीही त्यातून जी वस्तू मला घ्यायची आहे ती मात्र मला एकच घेता येतेय. थोडक्यात काय की जो आंबा मला 50 ला मिळत होता, तो सगळ्या लोकांकडे जास्त पैसे आल्याने 100 ला मिळू लागला. म्हणजेच काय की माझ्या पैशाची किंमत कमी झाली. किंबहुना ती निम्मी झाली. आता जर प्रत्येकाकडे 1000 रुपये आले तर आंबा 500 ला एक होईल, म्हणजे माझ्या पैशाची किंमत दहा पट कमी होईल. माझ्याकडे दहापट जास्त पैसा आला तरी वस्तू मात्र मी एकच घेऊ शकतो. माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मी एक आंबा घेऊ शकतो, माझ्याकडे 100 रुपये होते तेव्हाही मी एक आंबा घेऊ शकत होतो, तर माझे उत्पन्न 10 पट वाढल्याचा काही उपयोग नाही. बाजारात खूप जास्त पैसा आला की पैशाची क्रयशक्ती कमी होते. म्हणजेच काय की सरकारने खूप अमर्याद पैसे छापले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. झिम्बाब्वेमध्ये सरकारने अमर्याद पैसे छापले, त्यामुळे झाले काय की एक ब्रेड पॅकेट घ्यायला एक पिशवीभरून पैसे द्यावे लागायचे. 
इकॉनॉमी चालावी म्हणून सरकारला मार्केटमध्ये पैसे वाढवावे लागतात, आणि हे पैसे आल्यामुळे उत्पादन वाढेल हे सुनिश्चित करावे लागते. त्याशिवाय आर्थिक प्रगती होऊच शकत नाही, पण त्याचवेळी इतकेही जास्त पैसे वाढवता येत नाहीत की पैशाची क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पावरच नष्ट होऊन जावी. नेमका किती पैसा मार्केट मध्ये आणावा याचा बॅलन्स ठेवावा लागतो. जे सरकार हा बॅलन्स योग्य रीतीने ठेवू शकते तो देश प्रगत होतो. चीनने असाच प्रचंड पैसा छापून मार्केट मध्ये आणला, आणि तो पैसा उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यावरच खर्च होईल असे परफेक्ट नियोजन केले. त्याचा परिणाम असा झाला की चीन आज जगातला दुसरा श्रीमंत देश बनला आहे. अमेरिकेने कोविडमध्ये प्रचंड पैसा छापून बाजारात आणला, त्याने त्यांची इकॉनॉमी सावरली.
आपल्या देशात इंनोवेशन आणि उत्पादन होत नाही म्हणून आपण खूप स्लो आहोत. पियुष गोयल बरोबर बोलले होते की आपण फक्त होम डिलिव्हरी, बेटिंग ऍप, आणि खाण्याचे प्रॉडक्ट हेच बिजनेस करतो आहोत. खरेखुरे वस्तूंचे उत्पादन, नवनवे प्रॉडक्ट शोधणाऱ्या व बनवणाऱ्या कंपन्या उदयास येत नाहीत हा आपला प्रॉब्लेम आहे. येतील तरी कशा, इतिहासात कोण राजा श्रेष्ठ वा दुष्ट होता, आणि कुठे मंदिर वा मस्जिद आहे, आपल्या जुन्या पुस्तकांत काय लिहिले आहे, माझी भाषा, जात वा धर्म खतऱ्यात आहे आणि आपण विश्वगुरु आहोत यातच आपली सगळी सामूहिक बुद्धी व्यस्त आहे, आपण काय इनोव्हेशन आणि नवउत्पादन करणार? जे आहे तेच चालू आहे हीच आश्चर्याची बाब आहे. पूर्वीपासून सरकार नेहमी उद्यमशीलता वाढावी म्हणून अनेक योजना, अनुदाने, डिस्काउंट देत असते, पण देशातील प्रस्थापित उद्योजक त्याचा फायदा घेऊन अनुत्पादक व्यवसायांतच पैसे गुंतवतात. भले त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा होतो, पण देशाची प्रगती होत नाही. म्हणून तरुणाईने सरकारच्या योजनांचा, अनुदानांचा, कर्जाचा फायदा घेऊन MSME मार्फत नवनव्या उत्पादनांची निर्मिती करणारा बिजनेस केला पाहीजे. प्रस्थापित लोक त्यात इंटेरेस्टड नाहीत, नव्या उद्योजकांनाच ती जबाबदारी उचलावी लागेल. अन्यथा देशाची प्रगती होणार नाहीच, पण अन्य देश जर प्रगती करू लागले तर उलट आपली अधोगती सुरू होईल.

मतितार्थ असा की चलन म्हणजे संपत्ती नाही. लोक बँकेत पैसे जमा करतात, त्यातून बँक उद्योगांना पतपुरवठा करतात, त्यातून उद्योग व उत्पादने वाढतात आणि देशाची प्रगती होते. बँका या आधुनिक युगाच्या प्रगतीचा कणा आहेत.
दुसरे म्हणजे पैसा ही खरी संपत्ती नाही, ती तात्कालिक असून कायमस्वरूपी मूल्य नसलेली केवळ एक विनिमयाची वस्तू आहे. वस्तू उत्पादन ही खरी संपत्ती आहे. जितके देशातील उत्पादन वाढेल तितकी देशाची आणि माणसांचीही अधिक प्रगती होईल. पैशाने पैसा निर्माण होतो हे खरे आहे, पण तो थेट पैशाने निर्माण होत नाही तर पैशाने उत्पादन निर्माण झाले तरच त्या उत्पादनामार्फत शाश्वत पैसा निर्माण होऊ शकतो. आपली इकॉनॉमी ही सेवाधारीत वरून उत्पादनाधारीत होईल तेव्हाच आपली प्रगती वेगाने होऊ शकेल.

......

३. पैसा आणि भारतीय मानसिकता 

भारत हा औरंगजेबाच्या काळापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत देश होता म्हणे. भारतातून पूर्वी सोन्याचा धूर निघत असे म्हणे. मग ही श्रीमंती गेली कुठे?आणि ही श्रीमंती आजच्यासारखीच केवळ काही एखाद अर्धा टक्के अतिश्रीमंत लोकांची होती की सगळी जनताच श्रीमंत होती?अगदी औरंगजेबालाही कर्ज देणारे सावकार तेव्हा होते. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा अशाच एका सावकाराला सुद्धा लुटले होते. तर भारत 'सोने की चिडिया' होता म्हणजे भारताची सगळी जनता श्रीमंत होती का? 
अर्थातच याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. कारण भारतात नेहमीच 90 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेतीच होता. बाकी अदमासे साताठ टक्के हे सैनिक, एक दोन टक्के हे पुजारी, आणि एकाध अर्धा टक्के हे व्यापारी/सावकार असतील. शेतकरी आणि श्रीमंती हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत (मोठ्या जमिनींचे मालक हे शेतमालक/जमीनदार असतात, शेतकरी नव्हे. जो प्रत्यक्ष राबतो तो शेतकरी. जो राबवून घेतो तो शेतकरी नव्हे). देश कधीकाळी श्रीमंत असला तरी जनता ही कायम गरीबच होती आणि आहे.
तर बहुतांश जनता ही अठराविश्वे गरीब असूनही आपल्या समाजात कुठून काय माहीत पण पैसा म्हणजे वाईट ही प्रवृत्ती शिरली. माणूस कितीही मोठा झाला तरी श्रीमंत असला की तो वाईटच असणार ही भारतीय मानसिकता आहे. गांधीजींचे गरीबीत राहणे हे त्यांना ग्रेट मानण्याचे मुख्य कारण आहे. मोदींनी चहा विकलाय, त्यांची आई लोकांकडे घरकाम करत असे याचा त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड मोठा वाटा आहे. नेहरुंनी सगळी संपत्ती दान केली, संत तुकारामांनी सगळी संपत्ती दान/त्याग केली. गाडगेबाबांकडे एक गाडगे हीच संपत्ती होती, ज्ञानेश्वर भिक्षा मागत होते. शिवाजी महाराज सुद्धा खूप छोट्या सुभेदारीतून मोठे राजे झाले. रामाला, पांडवांना 14 वर्षे वनवास म्हणजे दारिद्र्य भोगावेच लागले. गरिबी हा आपण महानतेशी जोडलेला एक गुण आहे. एकतरी संत, एकतरी नेता महान मानण्यात येतो आणि जन्मतः श्रीमंत होता असा आहे का? एक तरी राजा वा महापुरुष सांगा जो वा ज्याचा कोणी पूर्वज गरीब नव्हता आणि तरीही त्याला महान म्हणतात? 
गरिबी या अवस्थेलाच भारतात खरे ग्लॅमर आहे, आणि श्रीमंतीला हमखास वाईट ठरवले जाते. अंबानी अदानी यांच्याबद्दल किती लोक चांगले बोलतात?ती मागे कोण प्रवचनकार होती तिची पर्स लाखो रुपयांची होती म्हणून तिच्यावर किती टीका झाली. कोणा नेत्याचा टी शर्ट महागाचा होता म्हणून किती टीका झाली. रोजच्या अशा अनेको उदाहरणांतून कळते की श्रीमंती म्हणजे वाईटच ही विकृती भारतीय समाजात अगदी खोलवर रुजली आहे. 
लोकांनी दर्जेदार कला दाखवावी पण त्याचे पैसे घेऊन श्रीमंत होऊ नये, समाजसेवा करावी पण त्याचा मोबदला घेऊन श्रीमंत होऊ नये, क्रिकेटपटुंनी खेळाव्यतिरिक्त जाहिराती करू नयेत, लेखकांनी पुस्तके जास्त किंमतीला विकू नयेत, व्यापाऱ्याने धंदा करावा पण जास्त प्रॉफीट कमावू नये, शेतकऱ्याने भाव वाढवू नयेत ही आपली सामूहिक सर्वदूर मानसिकता आहे. आणि जे लोक नफा कमावतात, कलेचे, बुद्धीचे पैसे कमावतात, तेही यामुळे आपल्या समाजात मनातून आपल्या श्रीमंतीबद्दल उगीच एक अपराधीपणाची भावना बाळगतात. भ्रष्टाचारी, चोर मात्र बहुदा ही अपराधीपणाची भावना बाळगत नाहीत. हुंडा घेणारे नामर्द लोक मात्र ही भावना बहुदा बाळगत नाहीत. साध्या हॉटेलवाल्याने फॉर्चूनर घेतली की ती सगळ्यांना खुपते, पण हुंड्यात मिळालेल्या फॉर्चूनरची चावी मात्र बिनधास्त नेत्यांच्या हस्ते दिली जाते. सन्मार्गाने श्रीमंत होणारे लोक उगाच अपराधी भाव ठेवतात आणि अनैतिक मार्गे श्रीमंत होणारे गर्वाने मिरवतात हे आपले चित्र आहे. 
पैसा/श्रीमंती वाईट आहे ही जी प्रवृत्ती आपल्या समाजमनात रुजली आहे ती सर्वप्रथम नष्ट झाली पाहीजे. किंबहुना मला वाटते की स्वतःच्या गरिबीचे दुःख सौम्य वाटावे म्हणून दरिद्री भारतीय समाजाने स्वतःत पेरलेली ही एक कृत्रिम, फसवी व नुकसानदायी भावना आहे. श्रीमंत लोक सुखी नसतात, त्यापेक्षा गरीब लोक खऱ्या अर्थाने सुखी असतात, श्रीमंतांना गाद्यागिर्द्यांवरही झोप येत नाही, गरीब मात्र फुटपाथवरही झोपतो ही एक तद्दन खोटी आणि खुळी समजूत आपल्या समाजात अत्यंत पॉप्युलर आहे. बरे ही समजूत फक्त दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी असती तर ठीक, पण ती आपल्याला निरुद्योगी बनवण्यास कारणीभूत ठरली आहे हे मात्र चूक आहे. श्रीमंताला झोप येत नाही म्हंटल्यावर कोण कशाला श्रीमंत होण्यासाठी अथक प्रयत्न करेल?जे करतोय त्याने सहज वा आपोआप श्रीमंत झालो तर ठीक, नाही झालो तर गरीब जास्त सुखी असतात ही समजूत समाधानासाठी सोबतीला आहेच. पैशाने सगळी सुखे विकत घेता येत नाहीत हे खरे आहे हे मान्य, पण मला सांगा जे पैशाने विकत घेता येत नाही असे कोणते सुख आहे जे फक्त गरिबांना मिळते व श्रीमंतांना मिळूच शकत नाही? असे कोणतेही सुख अस्तित्वात नाही जे फक्त गरिबांना मिळते व श्रीमंतांना हवे असल्यास मिळू शकत नाही. पण अशी अनेक सुखे/कम्फर्टस आहेत जी पैशांनी विकत घेता येतात आणि त्यामुळे गरिबांना ती मिळू शकत नाहीत. 
फक्त अनैतिक मार्गाने श्रीमंत होता येते ही एक आपल्यातील अजून चुकीची समजूत आहे. या समजुतीमुळे देशात भ्रष्टाचार प्रचंड फैलावला आहे. पण खरेतर अनैतिक पैसा हा गुन्हेगारीचा पैसा आहे. आणि गुन्हेगारीचा पैसा नेहमी वाईट व धोक्याचा असतो. प्रामाणिकपणे कमावलेला पैसा जास्त समाधान आणि शाश्वत सुख देतो. त्याउलट फसवणुकीचा, भ्रष्टाचाराचा पैसा म्हणजे सदैव कायद्याची टांगती तलवार..! ज्या श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही ते असे भ्रष्टाचाराच्या व हरामाच्या कमाईने पैसे मिळविणारे श्रीमंत असावेत. कायद्याच्या भीतीने त्यांची झोप उडत असावी. 
ठेविले अनंते तैसेचि रहावे ही आपल्या समाजात रुजलेली अजून एक वाईट प्रवृत्ती. हे खरेतर निरुद्योगी समाजाचे तत्व आहे. बिल गेट्सच्या वा स्टीव्ह जॉब्जच्या नावाने एक सुभाषित फिरत असते की 'तुम्ही गरीब म्हणून जन्मलात तर त्यात तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो मात्र तुमचा दोष आहे.' हा पाश्चात्य आणि आपल्या म्हणजे पौर्वात्य लोकांच्या दृष्टिकोनांतला फरक आहे. आपल्याला जसे नशिबाने ठेवले आहे तसेच राहणे क्रमप्राप्त आहे, 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता नही' हे आपल्याकडचे अगदी धार्मिक ऋचांइतके वा त्याहून अधिक पॉप्युलर असलेले वाक्य आहे. विकसित देशात लोक आपली स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. मी एवढ्यावरच का समाधान मानू?मी अजून खूप काही करू शकतो अशी तिथल्या बहुतांश लोकांची मानसिकता असते. त्याउलट आपल्या इथे जे चालले आहे त्यात उगाच ढवळाढवळ करून काही बिघडवण्याचा चान्स का घ्या ही प्रवृत्ती असते. आपल्या नि विकसित देशांच्या मानसिकतेत मोठा फरक आहे. आपण अत्यंत अल्पसंतोषी आहोत आणि ते लोक अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. यशाची शिखरे महत्वाकांक्षेच्याच पंखांनी गाठता येऊ शकतात, आहे ते ठीक आहे या मानसिकतेने नाही. आपली अजून एक विकृती म्हणजे आपले जे आहे ते कितीही निकृष्ट वा दर्जाहीन असले तरी आपण त्याला खूप महान आणि श्रेष्ठ मानतो. आपण कुपमंडूकासारखे आपल्या विहिरीतल्याच गोष्टींना जगातल्या बेस्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी समजतो. आपल्या कुपात राहून आपली मंडूक मानसिकता सदानकदा स्वतःच स्वतःला विश्वगुरू ठरवत असते. आपल्या वैचारिक क्षमता सुद्धा त्यामुळे अत्यंत मर्यादित आहेत. आपल्याच एवढ्याशा मर्यादित कोशात अडकलेले असल्याने आपल्याला यश, समृद्धी म्हणजे काय हेच माहित होत नाही तर त्यासाठी आपण प्रयत्न तरी कसे करणार?आपली संकुचित मानसिकता बदलणे, ती विस्तारणे गरजेचे आहे. आपली मानसिकता किती मागास आणि निरुपयोगी आहे याचे उदाहरण म्हणजे विकसित देशांत पैशांवरील पुस्तके बेस्ट सेलर्स होतात,आणि आपल्याकडे?धार्मिक पुस्तके.! 
आपली मानसिकता अगदी मर्यादित आहे असे मी म्हणतो कारण आपली श्रीमंत होण्याची पद्धत काय? किंवा आपले सर्वात हुशार विद्यार्थी काय करतात? तर मोठ्या पगाराची नोकरी, किंवा भ्रष्टाचार..!! उद्यमशीलता, व्यापार हे आपल्या पैसे कमावण्याच्या व्याख्येत किंवा ऑप्शन्समधेच नसतात. आपली बिजनेसची सुद्धा कॉमन आयडिया काय? तर दुकान, हॉटेल किंवा गाडी घेणे (ट्रान्सपोर्ट). या तीन व्यतिरिक्त किती लोकांना अन्य धंदे, व्यवसाय सुचतात? पाश्चिमात्य देशांतील लोक एकामागोमाग एक नवनवे प्रॉडक्ट लॉन्च करतात, नवनवे इन्व्हेंशन करतात, वेगवेगळ्या गुंतवणुकी करतात. आणि आपल्या इथे ९९ टक्के लोकांसाठी गुंतवणूक म्हणजे काय तर घर/जमीन/सोने विकत घेणे, एफ डी करणे किंवा अलीकडे थोडेफार शेअर मार्केटात इन्व्हेस्ट करणे. ठीक आहे घर, जमीन, सोने यांच्या किंमती वाढत जातात, पण त्या नॉन प्रॉडक्टिव्ह गुंतवणुकी आहेत. गुंतवणूक ही प्रॉडक्टिव्ह गोष्टीत केली पाहीजे. तिथे खरा जास्त आणि अस्सल परतावा मिळत असतो. आपण अशा गोष्टींत बुद्धी पैसा आणि मेहनतीची गुंतवणूक केली पाहीजे जी वारंवार वाढीव नफा देत राहील. एफडी हा गुंतवणुकीचा सगळ्यात फसवा मार्ग आहे. आज समजा 7 टक्के दराने आपण एफडी करतो, पण महागाई तर त्याहून जास्त दराने वाढत असते. एक वर्षाने जेव्हा एफडीमध्ये आपल्या 100 रुपयांचे 107 रुपये होतात तेव्हा महागाई वाढल्याने त्यांची क्रयशक्ती ही आजच्या 107 पेक्षा खूप कमी झालेली असते. त्याउलट तेच शंभर रुपये एखाद्या उत्पादनात गुंतवले तर महागाई वाढली तर उत्पादनाची किंमतही त्याच वेगाने वाढते, त्यामुळे जो नफा मिळतो तो जास्त व अस्सल असतो. म्हणून उत्पादक गोष्टींत गुंतवणूक करणे हे आवश्यक आहे. बहुतांश शहरी भारतीय हे होम लोन मध्ये आयुष्याची सर्वात मोठी गुंतवणूक करतात. अर्थात घर ही गरज असली तरी ती एक अनुत्पादक गुंतवणूक आहे. आणि बहुतांश कमाई ही या अनुत्पादक गोष्टीवर व्यय झाल्याने इतर उत्पादक गोष्टींत गुंतवणूक करायला मध्यमवर्गाकडे पैसाच उरत नाही. भारतीय मानसिकता ही खर्च करण्याऐवजी बचत करण्याची जास्त आहे. अर्थात गरिबी हेच त्याचे मुख्य कारण आहे. गरिबीमुळे आपण भविष्यातील आर्थिक सुरक्षेला अधिक महत्व देतो. गरिबी आहे म्हणून आपण पैसा खर्च करत नाही वा उत्पादक वा रिस्की गोष्टींत गुंतवणूक करत नाही, त्यामुळे बाजारात अधिक उत्पादन वाढत नाही, उत्पादन वाढत नाही म्हणून इकॉनॉमी वेगाने वाढत नाही आणि इकॉनॉमी पुरेशी वाढत नाही म्हणून आपण गरीबच राहतो अशा दुष्टचक्रात आपण फसलेलो आहोत. म्हणून आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अधिक व्यापक थिंकिंग आणि रिस्क घेण्याची वृत्ती जागवणे गरजेचे आहे. कोण्या मोजक्या दोनचार व्यक्तींत नव्हे तर एकंदरीतच सामूहिकपणे सगळ्या समाजात हा वैचारिक व प्रवृत्तीतील बदल होणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या आणि देशाच्याही प्रगतीसाठी जुन्या पारंपरिक,सामूहिक मर्यादा तोडून आपण सर्वांनी नवा व्यापक दृष्टीकोन अंगीकारणे गरजेचे आहे.   

....

४. समाज, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता

पैशाचे गणित एकदम साधे आहे. जितकी जास्त बुद्धी, वेळ आणि मेहनत तुम्ही पैसे कमावण्यासाठी लावाल तितका अधिक पैसा तुम्हाला मिळेल. जितके आपण निरुपयोगी गोष्टींत बुद्धी, वेळ आणि मेहनत वाया घालवू तितके आपण दरिद्री राहू.
मागे आमच्याकडे आदिवासी समाजात अचानक संस्कृती संवर्धन मेळावे चालू झाले. गावोगाव हे मेळावे अतिशय उत्साहाने पार पडले. मला एक कळत नाही की संस्कृतीमध्ये असे काय आहे की तिचे संवर्धन करायचे आहे? त्यावर माझे शंभरातले नव्व्यान्नव आदिवासी बांधव सांगतील की आज जगात जे क्लायमेट चेंज होतेय, ग्लोबल वार्मिंग आहे, नवनवे रोग येत आहेत त्यावर उपाय म्हणजे आदिवासी जीवन पद्धती आणि आदिवासी संस्कृती.! प्रगत समाजाने आदिवासी संस्कृतीचा स्वीकार केला तर हे जग टिकेल नाहीतर ग्लोबल वार्मिंग आणि क्लायमेट चेंज मुळे जगाचा सर्वनाश होईल... सकृतदर्शनी हा अत्यंत आदर्श असा दावा वाटतो, पण प्रत्यक्षात तसे आहे का? तर प्रत्यक्षात दुर्दैवाने तसे अजिबात नाहीय. हे जग जीवघेण्या वेगाने पुढे धावते आहे, सावरता येत नाही इतक्या वेगाने वृक्षतोड, संसाधनांचा ऱ्हास आणि पोलुशन होते आहे. हे सगळे थांबवले पाहीजे हे नक्की. पण ते थांबविण्याचा मक्ता काय फक्त आदिवासींनी घेतला आहे का? आणि तोही स्वतः प्रचंड दारिद्र्यात खितपत पडलेले असताना? ही कोणती बुद्धिमत्ता झाली की 95% लोकांनी पृथ्वीचा ऱ्हास करावा, त्याचे फायदे लाटून ऐषारामाचे आयुष्य जगावे आणि उर्वरित 5 टक्क्यांनी मात्र ते जपण्याच्या नादात दारिद्र्याचे भोग भोगत बसावेत? याव्यतिरिक्तही अनेक खऱ्याखोट्या गोष्टी सांगून आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे सगळ्या समाजावर असे मेळावे, समाजमाध्यमे, लेख, पुस्तके यातून वारंवार बजावले जाते. माझे स्पष्ट म्हणणे आहे की मी आदिवासी संस्कृतीला अजिबातही श्रेष्ठ मानत नाही. मी भारतीय संस्कृतीला अजिबातही श्रेष्ठ मानत नाही, मी कोणत्याच जुन्या संस्कृतीला श्रेष्ठ वा महान मानत नाही. कारण माझा रोख प्रश्न आहे की जर तुमची हजारो वर्षांची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे तर तुम्ही इतके दारिद्र्यात का आहात? जर तुमची संस्कृती श्रेष्ठ असेल तर तिच्यायोगे तुम्ही खूप समृद्ध असायला हवेत. तुमची जीवनपद्धती श्रेष्ठ असती तर तुमचे जीवन हलाखीचे असायलाच नको होते. कसे आहे ना की आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे प्रत्येक संस्कृतीच्या लोकांना वाटते. जगात कोणताही असा समाज नाही जो म्हणेल की आमची संस्कृती खराब आहे, वा आमचा समाज श्रेष्ठ नाही. तुम्हालाही तसे वाटते यात काही आश्चर्य वा विशेष नाही. उलट तसे वाटणे हे अल्पबुद्धीचे व अप्रगत राहण्याच्या दरिद्री वृत्तीचे लक्षण आहे.
मी अनेक वेळा बघतो, की सामाजिक, जातीय, धार्मिक कट्टरतेने आजची तरुणाई लिडबीडून गेली आहे. माझा इतिहास उज्ज्वल होता, आम्ही इतिहासात श्रेष्ठ होतो, आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत, आमच्यात मर्दांचे रक्त सळसळते आहे. आजही ठरवले ना तर ही पृथ्वी पालथी करून टाकू. अरे मग ठरव की, आणि पाडून दाखव पृथ्वी पालथी. उगाच आपल्या काहीही गमजा ठोकायच्या. 
यावेळी गावी गेलो होतो तेव्हा एक विशेष गोष्ट दिसली. अनेक पोरांच्या टी शर्टवर लिहीलेले होते, 'आम्ही सह्याद्रीचे राजे'. मी म्हंटले क्या बात है, पण हे सह्याद्रीच्या राजांनो, आज रात्री तुमच्या घरी भाकरीबरोबर खाण्यासाठी पुरेशी डाळ आहे का रे? याच्याकडे साधे तालुक्याच्या ठिकाणी जायला एसटीच्या भाड्याचे पैसे नाहीत पण हा कोण तर म्हणे सह्याद्रीचा राजा.! किती ही दांभिकता..!! दारिद्र्यातून बाहेर पडणे एकवेळ शक्य होईल पण दांभिक दरिद्री वृत्तीतून बाहेर पडणे अवघड आहे.
अजून एक विकृती मी समाजात बघतो की अनेक स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लोक मला भेटतात. यातील बहुतांश लोक हे एकतर शाळा वा कॉलेज ड्रॉपआउट झालेले असतात, किंवा नोकरीतून सस्पेंड झालेले असतात. यांना विचारले ना की का रे बाबा नापास झालास? तर म्हणतात समाजाच्या कार्यासाठी वेळ दिल्यामुळे अभ्यासाला वेळच मिळाला नाही. याच्याइतके लबाड आणि खोटारडे कारण अन्य असू शकत नाही. असे म्हणणारे सगळेच्या सगळे खोटारडे असतात. आपल्या वैयक्तिक अपयशाचे खापर ते लबाडपणे समाजकार्यावर फोडतात. माझे स्पष्ट म्हणणे आहे की समाजाचा उद्धार करणे हे एका स्वतःच दरिद्री वा मागासलेला असलेल्या माणसाकडून होऊ शकत नाही. आधी स्वतःचा उद्धार तर नीट करा मग समाजाचे पहा. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे कॉलेजमधले सहकारी चिडवत असत की अरे तू समाजाच्या आंदोलनांत का सहभागी होत नाहीस? सारखे काय अभ्यास? समाजाला गरज असताना तू डिग्रीच्या मागे काय लागलेला आहेस? त्यावर बाबासाहेब म्हणायचे की मी स्वतः सक्षम झाल्याशिवाय समाजाला सक्षम बनवू शकत नाही. माझ्याच पायात शक्ती नसेल तर मी समाजाचा गाडा वेगाने हाकू शकत नाही. बाबासाहेबांनी आधी स्वतःला सक्षम बनवले. आणि मग ते समाजाच्या कार्यात उतरले. मला सांगा, संपूर्ण जगात एखाद्या समाजाचा इतका आमूलाग्र प्रमाणातील उद्धार अन्य कोणातरी मनुष्याने केला आहे का? तेच बाबासाहेब जर कॉलेज मध्ये आंदोलनांत गुंतून पडते तर फारतर एखादे छोटेमोठे पुढारी वा नेते झाले असते. असे झाले असते तर आज भारत वजा बाबासाहेब आंबेडकर ही किती मोठी पोकळी आपल्याला बघावी, भोगावी लागली असती? 
माझे म्हणणे स्पष्ट आहे, समाजाच्या उद्धाराच्या फुक्या बाता मारू नका. समाजाचे राहू द्या, आधी स्वतःचा वैयक्तिक उद्धार करा. आधी स्वतःला तर सक्षम करा. स्वतः समृद्ध झालेला मात्र समाजासाठी काम न करणारा आणि स्वतः दरिद्री राहून समाजाचे काम करतोय असे दाखवणारा यांत मी स्वतः समृद्ध झालेल्याला श्रेष्ठ मानेल. कारण समाजातील प्रत्येकाने स्वतःला सक्षम केले की समाज आपोआप सक्षम होणारच असतो. समाज व्यक्तींनी बनतो. म्हणून व्यक्ती सक्षम होणे महत्त्वाचे आहे, तसे झाले की समाज आपोआप सक्षम होतो. उलट माझे निरीक्षण आहे की कोणीतरी दुसरा आपल्यासाठी लढतो आहे ही जाणीव समाजातील वैयक्तिक लढाऊ वृत्तीला मारक असते. त्यामुळे 'कुणीतरी दुसरा जीव लावून लढतोय ना मग होईल बदल, आपण फक्त त्याला सपोर्ट केले की झाले' ही समाजाची मानसिकता होते. त्याउलट तू एकटा आहेस, आणि तुलाच स्वतःसाठी लढायचे आहे ही जाणीव माणसाला जास्त प्रयत्नशील बनवते. म्हणून सामूहिक नव्हे तर वैयक्तीक प्रगतीवर जोर दिला पाहिजे.  
आज पारंपारिकतेला ठोकायचेच ठरवले आहे तर माझ्यापुढे अजून एक वर्ग आहे. हा समाजातील वर्ग बुद्धिमान आहे, आर्थिक दृष्ट्या अगदी श्रीमंत नसला तरी स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा आहे. हा वर्ग आता इतिहास संशोधन आणि आपल्या परंपरा कशा श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे आपली ऊर्जा लावू लागला आहे. हे लोक अतिशय तळमळीने व शुद्ध भावनेने प्रेरित होऊन हे काम करतात. पण जरी अतिशय प्रामाणिकपणे व समाजाचा उतराई होण्यासाठी ते लोक हे काम करत असले तरी खऱ्या अर्थाने ते एक निरुपयोगी काम आहे असे माझे स्पष्ट मत आहे. चला जर समजा आपला कोणी एक ऐतिहासिक पुरुष श्रेष्ठ होता हे सिद्ध झाले. आपल्या लोकांनी मदत केली नसती तर शिवाजी महाराजांना राज्य स्थापन करता आले नसते हे समजा सिद्ध झाले, शिवाजी महाराज नसते तर यांव झाले नसते वगैरे सगळे सिद्ध झाले, तर त्याने काय फायदा होणार आहे? आपले पूर्वज अफाट पराक्रमी होते हे सिद्ध झाल्याने नेमके काय होणार आहे? अगदी आपली एखादी प्रथा वा परंपरा जगाने श्रेष्ठ म्हणून मान्य केली (तसे कधीच होणार नाही पण उदाहरणासाठी मानू) किंवा आपल्या एखाद्या पारंपरिक पद्धतीचे एखाद्या आधुनिक टेक्नॉलॉजीशी साधर्म्य आहे हे सिद्ध झाले तर आपला नेमका काय फायदा होणार आहे? आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झाल्याने आपला पगार एक रुपयाने तरी वाढणार आहे का? आपल्या ताटात त्यामुळे आपोआप भाकरी येणार आहे का? आपण वा आपली संस्कृती श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झाल्याने आपल्या शेतमालाला जास्त भाव मिळणार आहे का? तर नाही, असे काहीही होणार नाहीय. मग हे सगळे तद्दन निरुपयोगी नाही का? आपण श्रेष्ठ आहोत, आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, आपला इतिहास जाज्वल्य आहे हे प्रबोधन केल्याने समाज उलट त्यात गुंतून त्यातच बुद्धी आणि ऊर्जा खर्च करून अजून मागास आणि निरुद्योगी राहतो आहे. तसेही आपण श्रेष्ठ आहोत हे आपण स्वतःच सिद्ध करून मानल्याने काहीही उपयोग नाही. प्रॅक्टिकली समाजाला आर्थिक, वैचारिक समृद्धीची खरी गरज आहे. निरुपयोगी गोष्टींऐवजी आपली ऊर्जा, समाजातील लोकांत जागरूकता, शिक्षण, उद्योजगता, कल्पकता, आहे ती परिस्थिती, दु:स्थिती बदलण्याची प्रवृत्ती निर्माण होईल असे प्रबोधन करण्यात घालवणे अधिक योग्य नाही का?
अर्थात ही जी नव्याने मध्यमवर्गात प्रवेश करणारी व प्रबोधनात रस घेणारी पिढी आहे ती स्वतःच आर्थिक दृष्ट्या साक्षर नाहीय. त्यामुळे ते समाजाला तरी काय शिकवणार म्हणा.! जसे अंधश्रद्ध पालक मुलांना अंधश्रद्धाच शिकवतात, तसे स्वतःच आर्थिक निरक्षर असलेली मार्गदर्शक पिढी समाजाला आर्थिक साक्षरता शिकवू शकत नाही. म्हणून आधी प्रबोधन करणारांतच आर्थिक शहाणपण येणे आवश्यक आहे. वैचारिक समृद्धी ही गरज आहेच पण आर्थिक समृद्धीची समाजाला जास्त गरज आहे. वैचारिक समृद्धी आणणे गरजेचे आहे असे मी म्हणतो तेव्हा कुणाचा तरी द्वेष करायला शिकवणे वा आपण सोडून इतर सगळ्यांवर संशय घेऊन त्यांच्यावर अविश्वास ठेवणे हा जर आपल्या वैचारिक प्रबोधनाचा रिझल्ट असेल तर असे प्रबोधन सुद्धा चुकीचे आहे. इतरांचा द्वेष करणे हे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे आणि संकुचित वृत्ती बाळगून कोणत्याही समाजाची व्यापक प्रगती होऊ शकत नाही. आपली भाषा, परंपरा, समाज, धर्म यातील जे चुकीचे आहे त्याला स्पष्टपणे चुकीचे म्हणून त्यागून टाकणे, जे चांगले व फायद्याचे आहे ते जपणे, जे दुसऱ्यांचे चांगले आहे ते स्वीकारणे, आधुनिकता, आधुनिक ज्ञान स्वीकारणे, उद्यमशील होणे, स्वतःच्या उत्कर्षासाठीच सगळी ऊर्जा बुद्धी व वेळ खर्च करणे हा खरा प्रगतीचा मार्ग आहे. संस्कृती, जात, धर्म अशा निरुपयोगी व अनुत्पादक गोष्टींना जीवनात जितके कमी महत्व, जितका कमी वेळ व मेहनत देऊ तितका आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. झाडे, जंगले, नद्या डोंगर हे नक्की जपा, पण आधी स्वतः सक्षम होऊन मग हे करा. हे जग पैशावर चालते हेच सत्य आहे. पैसा हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे हे स्वीकारणे ही पहिली गरज आहे. जगातील तमाम युद्धे, संघर्ष, करार हे प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे पैशांसाठीच आहेत. संस्कृती, जात, धर्म, इतिहास ही सगळी तुमच्या प्रगतीच्या मार्गातील जोखडे आहेत. ती झुगारून देणे आपल्याला जेवढ्या लवकर जमेल तितक्या लवकर आपली प्रगती होईल. आणि हो पैसा सहजासहजी येत नाही. त्यासाठी आधी ती वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. तिथून पुढे मग त्या वृत्तीला जोपासणारी कल्पकता आणि मेहनत यांची आपल्याला आवश्यकता आहे. आपला इतिहास महान होता, आपली संस्कृती महान आहे हे मानने वा शोधणे पूर्णतः बिनकामाचे आहे. आपली प्रगती कशी होईल, दारिद्र्य कसे संपेल यासाठी आपली बुद्धी व मेहनत खर्च करणे हे उपयोगी आहे. 
मी तर म्हणेल की वैचारीक प्रगती पेक्षाही आर्थिक प्रगती आजच्या युगात अधिक महत्वाची आहे. आपण सधन झाल्यानंतरही विचार सुधारता येतील की. मी खात्रीने सांगतो, कोणत्याही प्रबोधन मेळाव्यात भाषण देणारा कोणताही एखादा वक्ता हा मुकेश अंबानी यांच्यापेक्षा वैचारीक बैठकीत कितीतरी पट श्रेष्ठ ठरेल. पण प्रत्यक्ष आयुष्यात तो अंबानी यांच्याच कंपनीत एखाद्या साध्या पोस्टवर नोकरीला असेल. काय जास्त महत्वाचे आहे हे यातून स्पष्ट होईल असे मला वाटते. आपले एक श्रेष्ठ कवी आहेत, ते ज्या कंपनीत कामाला होते त्या कंपनीचा मालक ट्विटरवर इतका थिल्लरपणा दाखवतो की काय सांगू. कुणीही म्हणेल काय बालिश माणूस आहे.! त्याउलट या कवींची कोणतीही एक कविता वाचली तर आपण अगदी अचंबित होऊ की कोणी एवढा अफाट विचार कसे करू शकते. अर्थात हे झाले वैचारिक पटलावर. पण वास्तवातल्या दुनियादारीमध्ये तो बालिशपणा करणारा व्यक्ती मालक आहे आणि श्रेष्ठ विचार करणारा व्यक्ती त्याचाच अगदी साधा नोकर.! म्हणून वैचारिक प्रगती महत्वाची असली तरी तिची पुढची स्टेप आर्थिक प्रगती ही नसेल तर वैचारिक प्रगतीही कुचकामी आहे असेच मी म्हणेल. आर्थिक साक्षरता हीच सर्वात महत्वाची आहे. समाजात धर्म, संस्कृती, इतिहास यांचे प्राबल्य असणे हे आर्थिक निरक्षरतेचे द्योतक आहे. भारतीय लोक जितक्या लवकर आर्थिक साक्षर होतील तितक्या लवकर भारत विकसित होईल. फूनसुख वांगडू म्हणतो ना तसे आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याच्या मागे स्वतःच धावू नका, तुम्ही प्रगत आणि सक्षम बना, जग स्वतःहून तुमच्या संस्कृतीला श्रेष्ठ मानू लागेल. आज जगातील प्रत्येकाला अमेरिकेचा नागरिक का व्हायचे आहे? कारण अमेरिका आर्थिक ताकदीने समृद्ध आहे. तुम्ही आधी समृद्ध बना मग जग स्वतःहून तुम्हाला श्रेष्ठ म्हणून मान्यता देईल.

सोमवार, २६ मे, २०२५

आपले विश्व: भास आणि वास्तव

विश्वाचे रहस्य आपल्याला कधी उलगडेल का? मला नाही वाटत कधीच उलगडेल.
मुळात ज्याला आपण विश्व समजतो ते आपण समजतो तशा स्वरूपात अस्तित्वात तरी आहे का अशी मला शंकाच आहे. जे विश्व आपल्याला जाणवते ते काय आहे? तर आपल्या पाच सेन्सेसनी म्हणजे इंद्रियांनी जो काही सिग्नल आपल्या मेंदूला दिला त्याचा आपल्या मेंदूने लावलेला काहीतरी अर्थ. पण आपल्याला हेही माहीत आहे की आपल्या सेन्सेसला जाणवत नाही असेही खूप काही आहे या विश्वात. 

भाग 1: प्रकाश वा तरंग

साधारण 400 ते 750 नॅनोमिटर एवढ्याच तरंगलांबीचा प्रकाश आपल्याला दिसतो, त्याच्याहुन छोट्या वा मोठ्या तरंगलांबी आपल्याला दिसत नाहीत. आणि हे जे आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही त्याला आपण कसे शोधतो? तर काहीतरी क्लुप्ती लावून आपण या अननोन गोष्टींना आपल्या पाच इंद्रियांनी ओळखता येईल अशा अवस्थेत आणतो. उदा. आपल्याला एक्सरे दिसत नाहीत. पण ते आहेत हे कळते, कसे? तर फोटोग्राफीक प्लेटवर एक्सरे टाकले की ती प्लेट काळी होते. ते काळे होणे आपण आपल्या सेन्सेसनी पाहू शकतो म्हणून आपल्याला कळते की एक्सरे अस्तित्वात आहेत. पण अशा अगणित गोष्टी असू शकतात ज्यांना आपण कधीही अशा स्वरूपात आणू शकणार नाही जेणेकरून आपल्या पाच सेन्सेसला त्यांची जाणीव होईल. हे विश्व जे आपल्याला 400 ते 750 या खिडकीतून दिसते ती खिडकी जगातल्या एकूण प्रकाशाच्या वा एकूण इलेकट्रोमॅग्नेटीक तरंगांच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. जेवढ्या तरंगलांबी आपल्याला डिटेक्ट झाल्यात त्यांच्या तुलनेत ही खिडकी आहे फक्त 3 × 10⁻²⁶ टक्के इतकी. 10 चा वजा 26वा घात म्हणजे बघा आपल्याला किती अल्प प्रमाणात जाणवते हे विश्व. बरे हे झाले जेवढ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगलांबी आपल्याला आजपर्यंत कळल्यात त्यांच्या तुलनेत. ज्या आपल्याला अद्याप कळल्याच नाहीत त्या तर यात गृहितही धरलेल्या नाहीत. आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. पण हे रंग काही खरेच एखादी अस्तित्वात असलेली वस्तू नाहीयेत. तर ते फक्त आणि फक्त आपल्या मेंदूने काही विशिष्ट तरंगलांबींना दिलेला एक अर्थ आहे. आपले इव्होल्यूशन थोडे वेगळे झाले असते आणि आपल्याला एक्स रे किंवा गॅमा रे दिसत असते तर आपल्याला रंग नावाची कल्पनाही कधी आली नसती. इतकेच नाही तर इतर प्राण्यांना जाणवणारे रंग आणि आपल्याला जाणवणारे रंग हे पूर्णतः वेगवेगळे असू शकतात. इतकेच नाही तर आपल्यालाही एकमेकांना होणारा रंगांचा आभास वा त्यांची प्रतिमा ही प्रत्येकाच्या मेंदूत वेगवेगळी असू शकते. प्रकाश वा रंग म्हणजे केवळ आपल्या अवतीभोवती अस्तित्वात असलेल्या अगणित तरंगलांबींतील एका छोट्याश्या भागाचा आपल्या मेंदूंनी लावलेला एक कृत्रिम अर्थ होय. ज्या वेव्ह आपल्या मेंदूला जाणवेल असा सिग्नल तयार करतात त्यांना आपण प्रकाश समजतो. प्रकाश हा फक्त आपल्यासाठी अस्तित्वात आहे. विश्व हे ऑलरेडी अनंत तरंगांनी भरलेलेच आहे, प्रकाश आणि अंधार असे काहीही विश्वात अस्तित्वात नाही. आपल्या मेंदूला जे तरंग डिटेक्ट होतात तो प्रकाश आणि जे तरंग थोड्या वेगळ्या प्रकारे डिटेक्ट होतात तो आवाज असा आपल्या मेंदूने या तरंगांचा लावलेला कृत्रिम अर्थ आहे. अनेक लोकांना वेगवेगळे रंग पाहून आवाज ऐकू येतात तर अनेकांना आवाज ऐकून वेगवेगळ्या चवी जाणवतात. हे मेंदूचे आजार असतात. पण यामुळे आपण समजतो तसे रंग वा आवाज वगैरे काही अस्तित्वात नसून आपला मेंदू त्याचा काय अर्थ लावतो तेच आपल्याला खरे वाटते हे सिद्ध होते. प्रत्यक्षात प्रकाश नाही की रंग नाहीत की आवाज नाही. ते आहेत असे आपल्याला वाटते कारण आपल्या मेंदूने त्याचा तसा अर्थ लावलेला असतो. मेंदूने रंगाला आवाज म्हणून अर्थ लावला की आपल्याला रंग ऐकू येतात. प्रत्यक्षात विश्वात अनंत तरंगलांबी आहेत, त्यातील अगदी अल्पशा भागाला आपल्या मेंदूने दिलेले कृत्रिम अर्थ वा स्वरूप म्हणजे प्रकाश, रंग वा आवाज.

भाग 2: वस्तुमान, मॅटर

ढोबळपणे ज्याला आपण स्पर्श करू शकतो ते म्हणजे मास, मॅटर वा वस्तुमान असे आपण मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का? विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करत नाहीत वा करूच शकत नाहीत. पण मी हा मोबाईल हातात धरून लिहितोय, तो काय त्याला स्पर्श केल्याविना? माझा मोबाईल टचस्क्रीन आहे. टाइप करताना मी त्याला टच म्हणजे स्पर्श तर करतोच आहे ना? आपण वस्तूंना, इतर माणसांना स्पर्श करतो. एखादा स्पर्श तर आपल्याला किती रोमांचित करतो ते काय खोटे असते? सर्वात आनंददायी सुख तर स्पर्शातच आहे. ते खरे नाही का? तर याचे उत्तर आहे की होय जगातल्या कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना कधीही डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा थेट स्पर्श करू शकत नाहीत. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करू पाहतो तेव्हा तो स्पर्श नसतो. प्रत्येक पदार्थात ऍटम असतात, सगळ्या ऍटममध्ये इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तुजवळ जाते तेव्हा त्या दोन्ही वस्तूंमधले इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असल्याने ते एकमेकांना प्रतिरोध करतात. कितीही जोर लावला तरी दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना स्पर्श करतच नाहीत. ते एकमेकांना प्रतिरोधच करतात. त्यामुळे आपल्याला जी स्पर्शाची जाणीव होत असते तो खरा स्पर्श नसतो तर तो आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉन्सला दुसऱ्या व्यक्ती वा वस्तूतील इलेक्ट्रॉन्सनी केलेला केवळ प्रतिरोध असतो. तुम्ही कितीही ताकद वा प्रेशर अप्लाय करा की कितीही स्ट्रॉंग ग्लू लावून पहा. दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करूच शकत नाहीत. ऍटोमिक लेव्हलवरच नाही तर क्वांटम लेव्हलवर सुद्धा हेच खरे आहे.
साधारणतः जिथे आपल्याला प्रतिरोध होतो त्या ठिकाणाला आपण वस्तुमान किंवा मॅटर समजतो. त्याला आपण वस्तू वा मास समजतो. मास म्हणजे काहीतरी ठोस असा पदार्थ असे आपण समजतो, पण मास म्हणजे असा कोणताही पदार्थ नसतो तर मास म्हणजे फक्त अशी काहीतरी रचना असते जी आपल्याला वा प्रकाशाला वा इतर वस्तूंना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रतिरोध करते. जसे दोन चुंबकांचे समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. हे ध्रुव कोणत्याही माध्यमाविना एकमेकांना दूर ढकलतात. कुणालाही दूर ढकलण्यासाठी आपल्याला नेहमी हातांची वा एखाद्या वस्तूची गरज भासते. या मॅग्नेटसना मात्र अशा कोणत्याही हाताची वा वस्तूची गरज लागत नाही. मात्र तरीही ते एकमेकांना दूर ढकलतात. याचे कारण काय? तर या मॅग्नेट भोवती एक मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. आणि हे फिल्ड दुसऱ्या मॅग्नेटच्या समान ध्रुवाला जवळ येण्यास प्रतिरोध करते. अगदी असेच मॅटर म्हणजे कोणतीही वस्तू नसते तर ती फक्त एक वेगवेगळ्या फिल्ड्सची गुंडाळी वा कॉम्बिनेशन असते जे त्याच्याहून इतर फिल्ड्सला जवळ येण्यापासून वा स्वतःच्या आरपार जाण्यापासून विरोध करते. सगळे विश्व ज्या मूळ कणांपासून बनले आहे त्या कणांना कोणताही आकार नाही. इलेक्ट्रॉनला कोणताही आकार नाही. त्याला काहीही डायमेन्शन्स नाहीत. अशाच कोणताही आकार वा डायमेन्शन्स नसलेल्या मूळ कणांपासून हे विश्व बनले आहे. मुळातच डायमेन्शन वा आकार नसलेल्या वस्तुंपासून काहीही ठोस कसे बनेल? मॅटर ही कोणतीही आपल्या कल्पनेतील फिजिकल अस्तित्व असलेली ठोस गोष्ट नाही तर फक्त वेगवेगळ्या मूल कणांच्या वेगवेगळ्या फिल्ड्सच्या मिश्रणातून तयार झालेले व इतर फिल्ड्सला प्रतिरोध करणारे एक महाफिल्ड आहे. जसे एकमेकांना दूर ढकलणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड्ला कोणतेही फिजिकल अस्तित्व नसते तसेच मॅटरला सुद्धा कोणतेही फिजिकल अस्तित्व नाही. ते आपल्याला तसे जाणवते कारण आपल्याला होणाऱ्या प्रतिरोधाला आपले मेंदू तसे एक काल्पनिक रूप देतात. जसा प्रकाश वा रंग आपल्याला वाटतात तसेच अस्तित्वात नाहीयेत तर ते फक्त आपल्या मेंदूने लावलेले काल्पनिक अर्थ आहेत तसेच मॅटर हे सुद्धा आपल्याला वाटते तशी कोणतीही वस्तू नाहीय तर तेही फक्त आपल्या मेंदूने आपल्याला होणाऱ्या विविध फिल्ड्सच्या प्रतिरोधाचा लावलेला एक कृत्रिम व अवास्तव अर्थ आहे. कोणताही स्पर्श हा खराखुरा टच नसतो तर तो फक्त इलेक्ट्रॉन्सनी एकमेकांना केलेला प्रतिरोध असतो. मॅटरचे वजन किंवा वस्तुमान हेही त्या फिल्डमध्ये किती ऊर्जा आहे त्याचे एक प्रमाण असते. मास आणि एनर्जी हे एकच आहेत हे आपण जाणतो ना? त्यामुळेच मास हे सुद्धा फक्त एक विशिष्ट प्रमाणात एनर्जी अंतर्भूत असलेले फिल्ड असते. वजन, आकार वा ठोसपणा हा फक्त आपल्या मेंदूने त्या फिल्डला दिलेला अर्थ आहे.

भाग 3: अंतर आकार आणि दिशा

समजा विश्व पूर्णतः रिकामे असून पूर्ण विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय की एकाच जागी स्थिर आहे? तो गतिमान असलाच तर कोणत्या दिशेला जातो आहे? हे आपण सांगूच शकत नाही. का? कारण एखाद्या वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी जाणे वा दिशा बदलणे हे ओळखण्यासाठी आपल्याला काही ना काही संदर्भ बिंदू हवा असतो. कसे?
तर समजा आपण त्या इलेक्ट्रॉनच्या जवळ गेलो आणि मग त्याला पाहीले. मग जर तो आपल्यापासून जवळ वा दूर गेला म्हणजे त्याची पोजिशन आपल्या पोजिशन पासून बदलली तर आपल्याला कळेल की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. त्याचे अंतर आपल्या पासून वाढले तर आपल्याला कळेल की तो दूर जातोय. कमी झाले तर कळेल की तो जवळ येतोय. इथे आपण एक संदर्भ झालो. इलेक्ट्रॉन आपल्या पोजिशनच्या तुलनेत दूर गेला म्हणून आपल्याला वाटते की तो हलतो आहे. पण जर एका इलेक्ट्रॉनला असा कोणताही संदर्भ नसेल, त्याची पोजिशन जवळ आहे की लांब हे ठरवण्यासाठी कोणताही दुसरा संदर्भ बिंदू नसेल तर तो इलेक्ट्रॉन स्थिर आहे की गतिमान आहे हे आपण सांगूच शकणार नाही.
थोडक्यात काय की जर काहीही रेफरन्स किंवा संदर्भ नसेल तर आपल्याला अंतर समजूच शकत नाही. बंद लिफ्टमध्ये जर फ्लोअरचा नंबर डिस्प्ले केलेला नसेल तर आपण किती अंतर वा किती फ्लोअर पार केले हे आपल्याला कळूच शकत नाही. कारण अंतर कळण्यासाठी काहीतरी रेफरन्स बिंदू किंवा तुलना करण्यासाठी एखादी संदर्भ रेषा आवश्यक असते. बंद लिफ्टमध्ये ते नसते. म्हणजेच काय की अंतर काय असते तर एखाद्या संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूच्या वा जागेच्या पोजिशनची तुलना. अमुक तारा इतके प्रकाशवर्षे दूर आहे हे आपण आपल्या संदर्भात सांगत असतो. पण विश्वात फक्त एकच तारा असता इतर काही नसते तर तो तारा नेमका कुठे आहे हे सांगताच आले नसते. हेच दिशा किंवा डायमेंशन्सचे आहे. अनोळखी प्रदेशात आकाशात ढग असतील तर आपल्याला दिशा कळत नाहीत. का? तर दिशा कळण्यासाठी सूर्य किंवा ध्रुव तारा हे आपले रेफरन्स आहेत. तेच नसले तर दिशाच नसतात. एखाद्या वस्तूचा आकार सुद्धा आपण त्याच वस्तूतील इतर भागांपासूनचे अंतर वा उंची यांच्या संदर्भात ठरवतो. वा इतर वस्तूंच्या तुलनेत ठरवतो. डोंगर उंच आहे हे आपण पायथ्याच्या तुलनेत ठरवतो. एखादी बिल्डिंग चौकोनी आहे की त्रिकोणी हे आपण त्याच बिंडिंगच्या टोकांच्या एकमेकांतील अंतरावरून ठरवतो.
दिशा असो की अंतर की अगदी आकार हे सुद्धा कशाच्या तरी संदर्भातच आपण ठरवतो. कोणताही संदर्भ नसला तर आपल्याला अंतर, आकार वा दिशा हे कळूच शकत नाहीत. थोडक्यात काय की हे सुद्धा आपल्या मेंदूने कुठल्यातरी एका संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूंच्या पोजिशनला दिलेले अर्थ आहेत. जर आपल्या मेंदूला ही रेफरन्स बघण्याची क्षमताच नसती तर आपल्यासाठी अंतर, दिशा, आकार हे अस्तित्वात नसते. काहीतरी संदर्भ हवा असणे हा ती क्वांटीटी अबसोल्युट नसण्याचा पुरावा आहे.
जर विश्वात इतर काहीही नसेल फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर दिशा, अंतर, वेग हे सगळे अस्तित्वातच असू शकत नाही. तो इलेक्ट्रॉन भलेही गतिमान असो, म्हणजे फिरता असो, पण त्याचा वेग, त्याने कापलेले अंतर हे काहीही मोजले जाऊ शकत नाही. किंबहुना त्यावेळी स्पेसला स्पेस सुद्धा म्हणता येणार नाही. कारण स्पेस म्हणजे सुद्धा एक विशिष्ट एरिया/वोल्युम असते. आणि जिथे अंतर वा डिस्टन्सच अस्तित्वात नाही तिथे एरिया वा वोल्युम कुठून असणार.

भाग 4: काळ

अरिस्टॉटल म्हणतो की काळाला आपण भूत, वर्तमान, भविष्य अशा तीन भागांत विभाजित करतो. भूतकाळ घडून गेलेला असला तरी सध्या अस्तित्वात नाहीय. भविष्यही याक्षणी अस्तित्वात नाहीय. जे अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान. थोडक्यात वर्तमान म्हणजे काय तर दोन अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींच्या मधला अगदी अल्प असा काळ.
जावेद अख्तर म्हणतात की जसे आपण ट्रेन मधून जात असताना झाडे मागे जाताना दिसतात, पण प्रत्यक्षात ती एकाच जागेवर स्थिर असतात आणि आपणच पुढे जात असतो, तसे काय घ्या काळ हा एकाच जागी स्थिर असेल आणि आपणच पुढे जात असू.
असो, तर काळ म्हणजे काय हे बघण्याआधी एन्ट्रोपी या गोष्टीला उजळणी देऊ.
एन्ट्रोपी हा विश्वाचा स्थायीभाव आहे. स्थायीभाव हा शब्द किती बरोबर आहे माहीत नाही कारण स्थायी नसणे म्हणजेच एन्ट्रोपी. ते म्हणतात ना चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट.
एन्ट्रोपी म्हणजे विश्वात वाढत जाणारी अस्ताव्यस्तता किंवा फाफटपसारा. क्षणोक्षणी विश्वाची एन्ट्रोपी वाढत जात आहे. आता याक्षणी विश्व जसे आहे त्यापेक्षा पुढच्या क्षणी ते वेगळ्या स्थितीत असते. याला एन्ट्रोपी वाढणे असे म्हणतात. जर विश्व आहे त्याच स्थितीत कायमचे स्थिर राहीले तर एन्ट्रोपी वाढणार नाही.
जसे अंतर, दिशा यांच्यासाठी काहीतरी संदर्भ हवा असतो तसेच काळ मोजण्यासाठी सुद्धा काहीतरी संदर्भ हवा असतो. आणि काळ आपल्याला मोजता येतो वा जाणवतो वा भासतो तो केवळ आणि केवळ एन्ट्रोपी मुळे.
मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे जर विश्वात फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर इतर काही संदर्भ नसल्याने त्याची पोजिशन, मूव्हमेंट हे सगळे शून्य असेल आणि म्हणून विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल कारण विश्वात काहीही बदल होणार नाही. जेव्हा अजून एक इलेक्ट्रॉन येईल आणि त्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये काही इन्ट्रॅक्शन होईल तेव्हा विश्वाची एन्ट्रोपी वाढू लागेल. कारण मग एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्या तुलनेत काहीतरी हालचाल करेल. पण जर दोघेही स्थिर राहीले तर मात्र एन्ट्रोपी शून्यच राहील. कारण काहीतरी वेगळा बदल होणे म्हणजे एन्ट्रोपी. जर पुढे अजून अनेक इलेक्ट्रॉन, ऍटम वगैरे विश्वात येत राहीले तर मात्र विश्वाची एन्ट्रोपी वाढत राहील. कारण ते सगळे एकमेकांशी काही रीऍक्शन करतील ज्यामुळे पुढे पुढे अनेक बदल होत जातील. हे बदल वाढणे, त्यायोगे विश्व अधिकाधिक अस्ताव्यस्त होणे म्हणजे एन्ट्रोपी.
आज विश्वात असंख्य वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू एकमेकांच्या तुलनेत दर क्षणी बदलत असतात. सगळ्यांमध्ये नवनवे कॉम्बिनेशन आणि त्यायोगे नवनवे बदल घडत असतात, म्हणून विश्वाची एन्ट्रोपी लगातार वाढत आहे.
पण जर समजा, विश्व एका क्षणी जसे आहे अगदी तसेच्या तसेच दुसऱ्याही क्षणी राहीले, तिसऱ्याही क्षणी राहीले तर? म्हणजे जर विश्व आता या घडीला जसे आहे अगदी तसेच्या तसेच कायमचे राहीले त्यात अगदी सूक्ष्म बदलही झाला नाही तर? तर आपण म्हणू की विश्व स्थिर झाले. किंवा काळ थांबला.
पण आपल्या समजुतीप्रमाणे तर काळ कधीच थांबू शकत नाही. बरोबर ना? विश्व थांबले म्हणून काय झाले? काळ तर चालतच रहायला हवा.
ग्राउंडहॉग डे किंवा टॉम क्रूजचा 'एज ऑफ टुमारो' या फिल्म पाहिल्या आहेत का? त्यात काय होते? तर जग पुन्हा पुन्हा एका पूर्वस्थितीत पोचत असते. काल सकाळी 7 वाजता जे घडले अगदी तसेच्या तसे आज सुद्धा घडत असते. काल मेलेले लोक पुन्हा जिवंत होतात, काल घडलेल्या सगळ्या घटना अनडु होतात आणि आज सगळे विश्व पुन्हा पुन्हा त्या एकाच पूर्वस्थितीला पोचत असते. इथे काय होते? तर इथे विश्वाची एन्ट्रोपी कमी होते. क्षणोक्षणी काहीतरी बदल होत जाणे म्हणजे एन्ट्रोपी वाढणे. काहीच बदल न होणे म्हणजे एन्ट्रोपी स्थिर होणे, आणि जे बदल झालेत ते रिवर्स होणे वा अनडू होणे म्हणजे एन्ट्रोपी कमी होणे. या फिल्म मध्ये एका दिवसात जे जे बदल होतात, युद्ध होते, संहार होतो, एलियन येतात ते सगळे काही पुन्हा रिसेट होते. सगळे काही एका क्षणात रिवर्स होते. म्हणजे एका दिवसात जी अस्ताव्यस्तता वाढली होती ती परत तिच्या पूर्वपदावर येते. म्हणजेच एन्ट्रोपी कमी होते. आणि एन्ट्रोपी कमी होते म्हणजेच काळ मागे जातो.
विश्वाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याला आपण काळ असे समजतो. प्रत्यक्षात काळ वगैरे काही अस्तित्वात नाही. जर या फिल्म्सप्रमाणे काही बदलांनंतर विश्व पुन्हा जसेच्या तसे होत राहीले तर काळ हा एका लूप मध्ये फिरतोय असे आपण समजू.
फिल्म किंवा व्हिडीओ म्हणजे काय असते? तर अनेक फोटो एकामागून एक ठराविक स्पीडने डोळ्यापुढे आणले की आपल्याला ते फोटो हलत असल्याचा भास होतो. विश्वात होणारा प्रत्येक बदल हा त्या फिल्मच्या एकेका फोटो सारखा आहे, आपण ते एकामागून एक क्रमाने पाहतो म्हणून आपल्याला तो काळ वाटतो. फ्रेममध्ये बदल होतो म्हणून तो काळ वाटतो.
जर आपण एकच फोटो त्याच्या अनेक कॉपी बनवून त्याचीच फिल्म बनवून प्ले केली तर फिल्म तर रन होत असेल पण आपल्याला मात्र ती एकाच क्षणात थांबल्यासारखी वाटेल. कारण फ्रेम बदलत असल्या तरी सगळ्या फ्रेम्स मध्ये एकच फोटो असल्याने तो बदल तंतोतंत आधीच्या स्थितीसारखाच वाटेल त्यामुळे फिल्म चालू आहे की नाही हे आपल्याला कळूच शकणार नाही. सेम असेच काळाचे आहे. विश्वाच्या आपल्याला दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या फ्रेम बदलत्या असतात म्हणून आपल्याला काळाचा भास होतो. विश्वाचे निरंतर बदलणे किंवा एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम मध्ये जाणे म्हणजे एन्ट्रोपी. जर विश्व एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत गेले मात्र ती दुसरी स्थिती तंतोतंत आधीच्या स्थितीसारखी असेल तर एन्ट्रोपी वाढणारच नाही. आणि त्यामुळे काळ व्यतीत झालाय हे आपल्याला कळणारच नाही. विश्व जसेच्या तसेच राहीले तर काळाची जाणीवच होणार नाही. एन्ट्रोपी वाढलीच नाही तर आपोआप काळ नष्ट होतो, किंवा स्थिर होतो.
मात्र विश्व हे प्रत्यक्षात लगातार एका स्थितीतून दुसऱ्या नव्या स्थितीत परिवर्तित होत आहे. ते कधीही पूर्वस्थितीला येत नाही. हे जे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत परिवर्तन होणे आहे त्यालाच आपण काळ समजतो. म्हणजे काय की आपण एक रेफरन्स पॉईंट पकडतो. विश्वाची आजची स्थिती हा तो रेफरन्स पॉईंट. पुढच्या क्षणी विश्वाची स्थिती बदलते. आपल्या रेफरन्स पॉईंट पेक्षा विश्व हे एका वेगळ्या स्थितीत येते. फिल्म मध्ये नेक्स्ट फ्रेम येते तसे. हे पुढच्या क्षणामधील बदल विश्वाला पूर्णतः नव्या स्थितीत घेऊन जात असतात म्हणून आपल्याला ते वेगळे जाणवते. विश्वाच्या या परिवर्तनाच्या असंख्य स्टेप्स आहेत. आपला मेंदू जितक्या समर्थपणे या सगळ्या बदलाच्या स्टेप्स ओळखू शकतो त्याला आपण काळ असे समजतो. जसे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या एका फेरीला आपण एक दिवस समजतो, व सूर्याभोवतीच्या एका फेरीला वर्ष समजतो.
समजा आज जे बदल होताहेत त्याऐवजी विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा फक्त आहे त्या जागी व्हायब्रेट होत असता, इतर कोणतेही इन्ट्रॅक्शन वा रिऍकशन करत नसता. तर काय झाले असते? पृथ्वी आहे त्या जागी, सूर्य,चंद्र, सगळ्या गॅलक्सी आहेत त्या जागी फक्त व्हायब्रेट होत राहील्या असत्या तर एन्ट्रोपी वाढलीच नसती. जर हे व्हायब्रेशन एक सेकंदाचे असते. म्हणजे दर एका सेकंदाने प्रत्येक गोष्ट पुन्हा तिच्या मूळ स्थितीला आली असती तर जी काय एन्ट्रोपी तेवढ्या वेळात वाढली असती ती परत एक सेकंदात शून्य झाली असती. आणि त्यामुळे काळ सुद्धा वाढलाच नसता. जर फक्त एका सेकंदात व्हायब्रेट होऊन प्रत्येक वस्तू परत मूळ जागी आली असती तर विश्वाचे आयुष्य हे नेहमीकरता एका लूप मध्ये फक्त एक सेकंदाचे ठरले असते.
जर विश्वाची एन्ट्रोपी कमी होऊ लागली, म्हणजे विश्व पुन्हा पूर्वस्थितीला येऊ लागले तर काळ उलटा फिरू लागला असे आपण म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट ज्या क्रमाने बदलली त्याच क्रमाने उलटी झाली तर विश्वाची एन्ट्रोपी कमी कमी होत जाईल. असे झाल्याने आपण पुन्हा लहान होऊ, पुन्हा डायनोसॉर अस्तित्वात येतील. पुन्हा जग बिगबँगच्या स्थितीला येईल आणि त्या क्षणी एन्ट्रोपी शून्य होईल.
विश्वाच्या अ या स्थितीला आपण रेफरन्स पॉईंट धरतो आणि त्या क्षणापासून विश्वाची एन्ट्रोपी किती स्टेप्स मध्ये वाढली त्याला काहीतरी प्रमाण देऊन त्याला काळ असे समजतो. प्रत्यक्ष काळ वगैरे काही नाहीय. तर फक्त विश्वात जे परिवर्तन होतेय वा जे बदल होताहेत त्या बदलाच्या एका गृहीत संदर्भ स्थितीपासून होणाऱ्या परिवर्तनाच्या आपल्याला होणाऱ्या जाणिवेला आपण काळ समजतो. जर विश्वात आपल्याला जाणवेल असा बदल झालाच नाही तर काळ आपल्यासाठी स्थिर होईल. मग आपण काळ मोजूच शकणार नाही. जसे विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन असला तर तो जरी गतिशील असला तरी आपण तो गतिशील आहे की स्थिर आहे ते सांगूच शकणार नाही कारण त्यासाठी आपल्याकडे त्या इलेक्ट्रॉनच्या स्थितीत होणारा बदल ओळखायला कोणताही दुसरा संदर्भ बिंदूच नसेल. त्यामुळे विश्वात जर फक्त एकच इलेक्ट्रॉन अस्तित्वात असेल तर विश्वात काळ अस्तित्वातच असू शकणार नाही. कारण त्यावेळी विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल.
जरी एक इलेक्ट्रॉन नाही तर आता आहे तितक्याच वस्तू विश्वात असतील मात्र विश्वाची कोणतीही पूर्वस्थिती जर होणारा बदल ओळखण्यासाठी संदर्भाला नसेल, किंवा सगळेच बदल हे तंतोतंत पूर्वीसारखेच असतील तर एन्ट्रोपी वाढणार नाही आणि त्यामुळे काळही असणार नाही. जर विश्वाची एन्ट्रोपीच अजिबात वाढली नाही तर आपल्याला विश्व अगदी कोट्यवधी वर्षे आहे त्याच अवस्थेत अस्तित्वात राहीले तरी काळ मात्र स्थिर आहे असेच वाटेल.
थोडक्यात काळ म्हणजे विश्वाच्या स्थितीत होणाऱ्या जाणवण्याइतक्या बदलाचा त्या बदलाच्या पूर्वस्थितीशी असणारी तुलनात्मक विविधता ओळखण्याची आपल्या मेंदूची क्षमता. हे बदल होतात म्हणून आपल्याला काळ भासतो. जर विश्व पूर्णतः स्थिर असते तर काळ अस्तित्वातच नसता. किंवा आपले मेंदू काळ ही कल्पना करूच शकले नसते. काळ म्हणजे आपण समजतो तसा वेळ नाही तर फक्त विश्वाच्या बदलत्या स्थितींमधली आपल्या लक्षात येणारी क्रमवारी आहे.
जर विश्वातल्या आपण ओळखू शकतो त्या सगळ्या वस्तू नष्ट झाल्या तर काळ नष्ट होईल. कारण सगळे काही नष्ट झाले तर काही बदल होणार नाहीत, काही बदल झाले नाहीत तर एन्ट्रोपी शून्य होईल. विश्वाच्या स्थितीतील बदल मोजायला आपल्याकडे काहीही संदर्भ नसेल आणि त्यामुळे काळ नष्ट होऊन जाईल.
काळ नावाचे काही अस्तित्वातच नाही. काळ ही सुद्धा अंतर, वेग, दिशा यांच्यासारखी फक्त रिलेटीव्ह संकल्पना आहे. काळ हा या विश्वातील बदलांच्या फ्रेम्सच्या क्रमामुळे केवळ आपल्याला होणारा एक भास आहे. या फ्रेम्समधील बदल जितक्या क्षमतेने आपण ओळखू शकतो तितका त्याचा वेग ठरतो. प्रत्यक्षात काळाला वेगही नाही, तो फक्त आपल्या बदल ओळखण्याच्या क्षमतेचा एक आभास आहे.

टीप: सगळ्या इमेजेस ह्या एआयने जनरेट केल्या आहेत : चॅट जीपीटी, डीप एआय, एम एस डिझायनर इत्यादि

..

रविवार, २५ मे, २०२५

आभास आणि वास्तव

कुणालाही कळणार वा पटणार नाही अशी पोस्ट

.............

...............

...

शुक्रवार, २ मे, २०२५

क्षत्रियतेचा भारतीय भ्रम

स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणे ही भारतातली एक पॉप्युलर सामूहिक सणक आहे. क्षत्रिय म्हणवून घेणे हे उगाच एका श्रेष्ठतेच्या फुक्या किंवा फोल भावनेला खतपाणी घालते. मी नेहमी म्हणतो की ज्या लोकांना आपली वैयक्तिक लायकी कमी आहे हे जाणवत व जाचत असते तेच लोक मग सामूहिक ओळखीतून, वांशिक ओळखीतून ती वैयक्तीक नालायकी कम्पेन्सेट करू पाहतात. इतरांना कशाला नावे ठेवा, माझ्या जातीच्या नावाने सुद्धा इंटरनेटवर शेकड्यांनी स्वतःचा क्षत्रिय उल्लेख करणारी पेजेस, वेबसाईट अस्तित्वात आहेत, पण तो शुद्ध मूर्खपणा आहे हे माझे स्पष्ट मत आहे. तर चार वर्णांपैकी आज फक्त ब्राह्मण या नावाने ओळखले जाऊ शकतात असे लोक अस्तित्वात आहेत. बाकी वर्णांचे नामधारक लोक अस्तित्वातच नाहीत. फक्त ब्राह्मणांनी आपला वर्ण जपला आहे असे सकृतदर्शनी भासते, पण तेही खरे नाहीय. वांशिक ओळखीने तर नाहीच नाही. डीएनए अभ्यासावरून कळते की भारतात पूर्वी सरेआम आंतर्जातीय विवाह होत होते. त्यामुळे वांशिकदृष्ट्या तरी आपण कोणीही पृथक राहीलो नाहीय. गुप्त राजवटीच्या काळात म्हणजे साधारण दीड हजार वर्षांपूर्वी विक्रमादित्याच्या काळापासून आंतर्जातीय विवाह बंद झाले. विक्रमादित्यानेच जातीव्यवस्था (एंडोगामी) आणली असे म्हणता येईल. महाभारत वगैरे ग्रंथही याच्याच दोनेकशे वर्षे आधी लिहिले गेले असावेत आणि त्यात जे वर्णांवरून उल्लेख येतात ते याच काळात घुसवले गेले असणार अशी जास्त शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र अगदी ६०० वर्षांपूर्वीपर्यंत सर्रास आंतर्जातीय विवाह होत होते असे डीएनए अभ्यासातून कळले आहे, कारण आजच्या सगळ्या महाराष्ट्रीय जातींची कॉमन डीएनए अन्सेस्टरी (वांशिकता) ही ६०० वर्षांपर्यंतच मागे जाते. त्यांनतर मात्र ते इथेही बंद झाले. जाती आल्यावर ब्राह्मण वगळता इतर वर्णांच्या स्पष्ट ओळखी नष्ट झाल्या. आणि कुठेही लिखित स्वरूपात वांशिक ओळखीच्या नोंदी नसल्याने लोकांनी आपापल्या परीने आज स्वतःला बळेच कुठल्यातरी वर्णात बसवले आहे. काही स्वतःला क्षत्रिय म्हणतात, काही वैश्य तर काही शूद्र. पण खरेतर नावापुरती ब्राह्मण ही ओळख सोडता ब्राह्मणांसहीत कोणतेही वर्ण आज अस्तित्वात नाहीत. जिथे जन्मावरून जाती आल्या तिथेच वर्ण नष्ट झाले. मात्र पुराणकाळात वर्ण बनताना जी कर्मावरून व्याख्या केलेली आहे त्यावरून लोकांनी स्वतःला आज त्यांत बळेच फिट करून घेतले आहे. पण वर्णव्यवस्था बनली तेव्हाही तिची अगदी ठोस अशी वंशाधारित ओळख नव्हती. त्यातही माझ्यामते वैश्य हा वर्ण तर अगदीच अतर्क्य आहे. कोणत्या पुराणात कोण वैश्य होता, त्या एकातरी वैश्य व्यक्तीचा उल्लेख वा नाव सांगा. ना महाभारत ना रामायण, कोणत्याच कथेत कोणीही वैश्य व्यक्ती वैयक्तिकपणे अस्तित्वातच नाहीय. मग हा वर्ण बनला कसा? आणि आज जर 'आयएनजी वैश्य' ही बँक आहे तर ती बनवणारांनी ही वैश्य ओळख घेतली कशावरून? असे आहे की वर्णांच्या कर्माधारीत व्याख्येवरून आज सगळे लोक स्वतःला कुठेतरी बळेच फिट करून घेत आहेत. पण ते पूर्णतः चुकीचे आहे. ब्राह्मण ही सुद्धा एक जात नाहीय तर जातींचा एक समूह आहे. ब्राह्मणांतही अनेक जाती आहेत उदा. चतुर्वेदी, तिवारी, द्विवेदी, अग्निहोत्री वगैरे नुसती आडनावे नाहीत तर त्या वेगवेगळ्या जाती आहेत. विक्रमादित्य या गुप्त राजाने जाती आणल्या तिथेच वर्ण नष्ट झाले, परंतु कसे कुणास ठाऊक पण ब्राह्मण ही ओळख मात्र तशीच राहिली. अर्थातच त्यातील फायद्यांमुळे ती ओळख कृत्रिमपणे बनवून वा राखून ठेवण्यात आली असावी हे स्पष्ट आहे. 
असो तर आपला मुद्दा आहे क्षत्रियत्व. परशुराम जयंतीमुळे हे लिहायला सुचले. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली हे आपणाला माहीत आहे, पण आज जेवढे लोक स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतात ते बघता असे करणे कोणालाही शक्य नाही. अगदी हिटलरसारखा क्रूरकर्मा त्याच्याकडे आधुनिक विनाशक साधने असूनही फक्त जर्मनीतल्या सुद्धा सगळ्या ज्यूंना जे जर्मनीच्या लोकसंख्येत फक्त ०.८% होते (एकूण सव्वापाच लाख), त्यांनाही पूर्ण संपवू शकला नाही तिथे नुसत्या कुऱ्हाडीच्या मदतीने परशुराम हे कसे काय करू शकेल? आणि जर महाभारतात १८ अक्षौहिणी लढलेले सैन्य असेल आणि हे सगळे क्षत्रिय असतील तर तेच ४० लाख ठरतात, प्रत्यक्ष तर त्याहून खूप जास्त क्षत्रिय असायला हवेत कारण महाभारत युद्धानंतरच्या अर्जुनाच्या अश्वमेधाला भारतभर विरोध झाला होता. तरीही सोयीसाठी ४० लाख इतकीच संख्या गृहीत धरून मी चॅटजीपीटीला विचारले की जर एक माणूस तलवार घेऊन, घोड्यावर बसून एकूण ४० लाख केळ्याची झाडे भारतभर तोडायला निघाला तर प्रवास, झोप, जेवण वगैरे धरून त्याला किती वेळ लागेल? तर ते म्हणते ३० ते ३५ वर्षे. तेही एक झाड ५ सेकंदात तोडले असे गृहीत धरून. म्हणजे जागेवरून पळू न शकणारी व विरोध करू न शकणारी केळी तोडून २१ वेळा भारताला नि:केळीय करायला सुद्धा ३५x२१ म्हणजे ७३५ वर्षे लागतील. म्हणजेच या कहाणीत काहीतरी गोम आहे. पण ही कहाणी लिहिणारा इतके ऑब्व्हियस ब्लंडर कसे करेल?  
याचाच अर्थ हा की लढणारे सगळेच लोक क्षत्रिय होते ही आजची आपली संकल्पनाच चुकीची आहे. मुळात त्या काळी क्षत्रिय हे संख्येने अगदीच कमी असणार, आणि म्हणून परशुरामाने असे केले हे लिहायला त्या कथाकाराला फार चुकीचे वाटले नसणार. कसे ते पुढे पाहू. 
महाभारतात जेव्हा कर्ण अर्जुनाला राजकुमारांच्या युद्धशाळेच्या परीक्षेत आव्हान देतो तेव्हा कर्ण स्वतः क्षत्रिय नाही म्हणून तो क्षत्रिय अर्जुनास आव्हान देऊ शकत नाही असे द्रोणाचार्य म्हणतात. कारण क्षत्रियासोबत फक्त ब्राह्मण वा क्षत्रियच लढू शकतो. त्यावर दुर्योधन काय करतो? तो तिथल्यातिथे कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून राज्याभिषेक करवतो. का करवतो? तर त्यामुळे कर्ण क्षत्रिय व्हावा म्हणून. पण अर्थातच कुंती बेशुद्ध पडते, अधिरथ येऊन कर्णाला घेऊन जातो, व युद्धशाळेचा वेळही संपतो म्हणून कर्ण अर्जुन त्यावेळी एकमेकांशी लढत नाहीत. पण त्यांनतर मात्र दोघे एकमेकांशी आयुष्यात दोन वेळा लढले, एक विराटाच्या नगरीत अज्ञातवास संपताना आणि दुसरे कुरुक्षेत्रात. म्हणजेच काय की जन्माने असो की नसो, पण कर्ण राज्यभिषेकानंतर मात्र क्षत्रिय झाला होता. 
मला सगळ्या पुराणांत वा कथांत असा फक्त एक क्षत्रिय सांगा जो एकतर स्वतः राजा नव्हता वा राजवंशाचा नव्हता. असा एकही तुम्हाला सापडणार नाही. गंमत बघा, विदुराचा आणि धृतराष्ट्राचा बाप एकच असूनही धृतराष्ट्र क्षत्रिय होता पण विदुर क्षत्रिय नव्हता. का? तर विदुराची आई क्षत्रिय नव्हती. ब्राह्मण बाप आणि इतर वर्णाची आई असलेले अपत्य ब्राह्मण होऊ शकत होते किंवा आई ज्या वर्णाची आहे त्या वर्णाचे होत होते. क्षत्रिय बाप आणि इतर वर्णाची आई असेल तेव्हाही सेम होते. क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण आई याचे मला फक्त एक उदाहरण आठवते आहे. ययाती आणि देवयानी. 
तर मुद्दा हा आहे की क्षत्रिय हा वर्ण फक्त राजा किंवा राजवंशात जन्मलेला याच लोकांना मिळत होता. सगळे लढाई करणारे लोक क्षत्रिय नव्हते. इतकेच नाही तर राज्य कायमचे गेले तर ती व्यक्ती क्षत्रिय राहत नव्हती. विश्वामित्राने राज्य सोडले आणि तो पुढे क्षत्रिय राहीला नाही. कृष्णाचे आई वडील क्षत्रिय होते (वासुदेवाचा पिता राजा होता) पण त्यांचे राज्य गेले. म्हणून युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला अग्रपूजेचा मान देण्यास दुर्योधनाने विरोध केला होता. कारण हा मान श्रेष्ठ क्षत्रियांना द्यायचा असतो, एका गुराख्याला हा मान का देता असे त्याचे म्हणणे होते. म्हणजेच दुर्योधन कृष्णाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नव्हता. लक्षात घ्या की कृष्ण कधीही राजा झाला नाही आणि बलरामही झाला नाही. 
थोडक्यात काय की क्षत्रिय हा वर्ण फक्त राजा आणि त्याच्या वंशातील अपत्यांना मिळत होता. मात्र राज्य गेले की क्षत्रियत्व सुद्धा जात होते. म्हणजेच काय की तेव्हा क्षत्रियांची संख्या अगदीच अल्प असेल. अगदीच म्हंटले तर महाभारताच्या वेळी भारतवर्षात १५० ते २०० राजे असतील. इतक्या राजांना आणि त्यांच्या दोन तीन पुत्रांना मारणे परशुरामाला अवघड असले तरी अशक्य नाही. पण आपल्या समजुतीप्रमाणे सगळ्या लढणारांना क्षत्रिय मानले तर ४० लाख क्षत्रियांना मारणे मात्र नक्कीच कुणालाही अशक्य आहे. 
मग प्रश्न येतो की आज कुणी क्षत्रिय आहे का? त्याआधी माझा प्रश्न आहे की आज कुणी राजा आहे का? आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. जिथे राजाचा नातू असूनही प्रत्यक्ष देव म्हणून मान्यता असलेल्या कृष्णालाही त्याचे राज्य गेल्यामुळे दुर्योधन क्षत्रिय मानायला तयार नव्हता तिथे फक्त एखाद्या राजाच्या जातीचे, आडनावाचे, प्रांताचे आहोत म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत असे म्हणणारे लोक किती खुळ्या भ्रमात आहेत सांगा बरे. जरी तुम्ही एखाद्या राजवंशाचे थेट वारसदार असाल मात्र तुमचे राज्य अस्तित्वात नसेल तरीही तुम्ही क्षत्रिय नाहीत हे वर दाखवून दिले आहे. आणि त्यामुळे अर्थातच आज कोणीही राजा नसल्याने कोणीही क्षत्रिय नाहीय. उगाच छाती बडवून स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणारे वा तसा दावा करून ऊर बडवून घेणारे कोणीही लोक क्षत्रिय नाहीत हेच खरे आहे. लढाई करणारे सगळे क्षत्रिय असत हेच खोटे आहे. सगळे लढाई करणारे क्षत्रिय नव्हते तर फक्त राजे लोक आणि राज्य करणाऱ्या राजाचे पुत्र पुत्री हेच क्षत्रिय होते. आज भारतात क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्णच नाहीत, वा आपल्याला यापैकी कोणत्याही एका वर्णाचे मानणारे सगळे लोकही पूर्णतः चूक आहेत. खरेतर वर्णच नष्ट झाल्याने ब्राह्मण हा वर्णही अस्तित्वात नाहीय, पण त्यातील फायद्यामुळे काहींनी ती ओळख बनवून ठेवलेली आहे. म्हणून मी वर म्हंटले आहे की लढणारे सगळे क्षत्रिय असतील तर कोणत्याही पुराणातील असे एकच नाव सांगा जे राजा वा राजवंशातील नव्हते मात्र तरीही क्षत्रिय होते. तुम्ही नाही सांगू शकत. 
आज बहुतांश मागास असलेल्या जाती स्वतःला शूद्र समजतात. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनीही सगळे लढणारे क्षत्रियच असतात या समजुतीतूनच 'शूद्र कोण होते' हे पुस्तक लिहीले आहे. पण ते पुस्तक क्षत्रिय शब्दाच्या आजच्या चुकीच्या संकल्पनेवर आधारीत आहे असे म्हणावे लागेल. मी ते पुस्तक वाचले, त्यात बाबासाहेबांनी दिलेले दाखलेही अगदी समर्पक आहेत पण मूळ क्षत्रिय वा शूद्र या संकल्पनाच आजच्या परिप्रेक्ष्यात चूक आहेत. आज कोणीही क्षत्रिय वा शूद्र नाही. इतकेच नाही तर हेही अजिबात जरुरी नाही की आज जे स्वतःला शूद्र समजतात त्यांचे पूर्वज शुद्रच असतील. ते कोणत्याही वर्णाचे असू शकतात. ब्राह्मण, वैश्य वा अगदी अत्यल्प असलेले क्षत्रिय सुद्धा त्यांचे पूर्वज असू शकतात. मुळात पुरातन भारतात समाजात वर्णव्यवस्था असेल असेच मला वाटत नाही. मात्र असलीच तरी एकंदरीत आपली समाजरचना बघता मला वाटते की शूद्र हे फक्त राजदरबारात, व राजमहालातले सेवक वा सेवा करणारे असणारे लोक असतील. शेती करणारांना आज आपण शूद्र समजतो, पण ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसच्या लिखाणातून स्पष्ट होते की भारतात शेतकऱ्यांचा दर्जा त्या काळी खूप वरचा होता (विक्रमादित्याच्याही आधीच काळ). त्यामुळे कदाचित शेतकरी वर्ग आणि पर्यायाने सगळा समाज हा बहुतांशी असलाच तर वैश्य असेल. किंवा काय घ्या वर्ण हे कधी समाजात अस्तित्वातच नसतील. कारण मेगॅस्थेनिस हेही म्हणतो की भारतात तेव्हा फक्त दोनच जाती होत्या, ब्राह्मण आणि श्रमण. अस्पृश्यताही समाजात कधी घुसली माहित नाही. पण बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्ट दाखवून देतात की जे क्षत्रिय राजे वेदांच्या व यज्ञांच्या विरोधात गेले त्यांनाच अस्पृश्य ठरवण्यात आले. 
असो तर नेमके कधी ते सांगता येणार नाही पण कधीतरी काहीतरी मोठे सामाजिक चर्नींग होऊन ब्राह्मण आणि श्रमण एकत्र झाले, त्यांनी एकमेकांच्या संकल्पना, समजुती व अगदी देवही शेअर केले. कारण महादेव वा शिव जो भारतातला सर्वात मोठा देव आहे, त्याचा साधा नामोल्लेखही ऋग्वेदात नाहीय. ऋग्वेदात रुद्र आहे. जो पुढे महादेवात मिसळला गेला. ऋग्वेदातील विष्णूही अगदी साधी देवता आहे. त्याचे अवतार आणि बाकी कार्ये ही खूप नंतरच्या काळात निर्माण झाली. असेच ब्रह्माचेही आहे. त्यामुळे फक्त वेदिक ग्रंथात (व कदाचित फक्त मेगॅस्थेनिसने सांगितलेल्या ब्राह्मण धर्मातच) असलेले मात्र प्रत्यक्ष समाजात नसलेले वर्ण बहुतेक याच चर्नींग काळात समाजात मिसळले गेले असतील. ते काय झाले कसे झाले हे आपल्याला कदाचित कळणार नाही कारण आपणा भारतीयांना काहीही लिहून ठेवण्याची सवय नव्हती हे मेगास्थेनीस आणि अल बिरुनी अशा दोघांनीही लिहून ठेवले आहे. 
मुद्दा हा आहे की आज भारतात कोणीही क्षत्रिय व शूद्र नाहीय. खरेतर ब्राह्मण वर्ण सुद्धा वर्ण म्हणून अस्तित्वात नाहीय पण कसेतरी एका ग्रुप ऑफ जातींनी ती ओळख कायम राखली आहे. आपण वेगवेगळ्या वर्णाचे नाही. आपण सगळे सेम आहोत, किंबहुना बहुतांश भारतीय हे मुळात वर्णव्यवस्थेच्या बाहेरचेच असण्याची शक्यता आहे. कधी अस्तित्वात असलीच तर वर्ण व्यवस्थेत असणारे लोक अगदी अल्पसंख्य असावेत. मात्र त्यांनी रचलेले ग्रंथ टिकून राहीले, इतरांनी एकतर ग्रंथ रचलेच नाहीत वा टिकवून ठेवले नाहीत. त्यामुळे जे टिकून राहिलेय तेच सगळ्या भारताला लागू होत असावे असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात वर्णव्यवस्था फारच कमी लोकसंख्येत लागू असावी, नाहीतर जाती बनण्याचा प्रश्नच आला नसता. मेगास्थेनिसने सुद्धा क्षत्रिय, वैश्य, शूद्र या कोणत्याही शब्दाचा उल्लेखसुद्धा केला नाहीय. जे ग्रंथ टिकले त्यांवरून केवळ ग्रंथप्रामाण्य या दुर्गुणामुळे आपण आजच्या आपल्या जातींच्या व्यवसायावरून वा कामावरून बळेच स्वतःला कोणत्यातरी वर्णात घुसवतो.

...