जाऊ तिथे शहाणपणा हा आमचा दोघांचाही स्थायीधर्म.! मी आणि विज्या.! आमच्या जोडगोळीला सगळे "इज्या-बिज्या" म्हणतात, आम्हाला तिज्या मात्र कधी मिळाला नाही. तर, कुठेही जावो, काहीही कानावर पडो, आम्ही आपल्या मताची इथे तिथे पिंक टाकणारच. विषय अनोळखी असला तरी पत्ते वाटल्यासारखे धाड धाड सल्ले आम्ही वाटत असतो. आणि विषय ओळखीचा निघाला तर? मग मात्र आमच्या अस्मानभराऱ्यांस आभाळही थिटे पडलेच म्हणून समजा. गप्पा अशा मोठ्या मोठ्या आणि एवढ्या अविर्भावात की आजूबाजूच्या लोकांस वाटावे की हे कुणीतरी खूप मोठी असामी आहेत की काय. विशेषत: स्टेशनवर किंवा लोकलमध्ये अथवा एखाद्या पर्यटनस्थळी, हॉटेलात, किंवा कॉन्फरंसमध्ये, लग्नात इत्यादी, थोडक्यात काय तर जिथे खूप श्रोते असतील तिथे आम्हाला एक प्रकारचे स्फुरण चढते. एकदा एका लग्नात आमच्या "हिंदी चित्रपटसृष्टीतील विवाहाचे चित्रीकरण" या विषयावरची गहन चर्चा ऐकून तीन जणांनी आग्रह करून आमच्या बरोबर फोटो काढून घेतला होता. एकदा एका पार्टीत वाजत असलेल्या एका गीताची चाल ही कशी पॉल लुईस (कधीही अस्तित्वातच नसलेला गायक) याच्या गाण्यावरून घेतली आहे इथून सुरु झालेली चर्चा थेट वर्तमान भारतीय संगीतावर प्रखर ताशेरे ओढत राजा कृष्णकृतवर्मा (हा कोण कुणास ठाऊक) याच्या दरबारातील "पंडित धृत्पद्मनाग" या गायकाने रचलेल्या "बैसाख शलाका" या रागाच्या उत्पत्तीपर्यंत येउन ठेपली (आता हा गायक आणि त्याचा राग हे म्हणजेही केवळ "पुड्या" हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच). आमच्या या महान संगीत ज्ञानप्रकाशाने दिपलेल्या एका होतकरू मुलाने आवर्जून डायरीत आमचा पत्ता विज्याच्या सहीसहित लिहून घेतला. असे अनेकदा होई. आमच्या अद्वितीय व्यासंगाने (तो आतून कितीही पोकळ का असेना) भारावून कित्येक जण उगीचच हस्तांदोलन करतील, तुमचे कार्ड आहे का विचारतील किंवा प्लीज तुमचा मोबाइल नंबर देता का असे म्हणतील. तर असे आम्ही थोर. त्यामुळे कधी आमच्या दृष्टीक्षेपास पडलात तर लक्षात ठेवा आमच्या व्यासंगाशी संग, प्राणाशी गाठ.!! कधी कुणी बकरा सापडला आणि त्यास आमच्याशी वाद घालण्याची दुर्बुद्धी झाली की त्याचा बळी गेलाच समजायचा.
तर असेच एकदा सुरतला निघालो होतो. ट्रेनने. गर्दी बऱ्यापैकी, पण आमचा पट्टा सुरु होईना. हे गुजराथी पण ना, मोजून मापूनच बोलणार, त्यामुळे आम्हाला गप्पा टाकायला माणूस आणि विषयच मिळेना. तेवढ्यात एकजण डोळे मिटून हनुमानचालिसा म्हणू लागला. फिनिश झाल्यावर मी उठून गेलो आणि म्हणालो, "हे काय मधेच? काही मुहूर्त वगैरे होता काय सहस्त्रनामाचा?" तो म्हणाला, "मुहूर्त नाही हो, अहो इथे ४ वर्षांपूर्वी एक ट्रेन अपघात झाला होता. ३३ लोक मेले होते. म्हणून इथून ट्रेन जाताना आपली ट्रेन सुखरूप रहावी म्हणून मी नेहमी अशी रामरक्षा म्हणतो." (अच्छा म्हणजे ती ह.चा. अथवा स. ना. नसून रा. र. होती तर!) काही असो आता आम्हाला एक गिऱ्हाईक भेटले होते. मी फासे टाकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला काय वाटते त्या ३३ जणांचे आत्मे ही ट्रेन उलथून टाकतील की काय? "असे बोलू नका हो. असे बोलू नये. एकदा मला इथेच रात्री एक लाल शर्टवाला माणूस भेटला होता. जो त्याच ट्रेन अपघातात मरण पावला होता. तो नेहमी रात्रीच्या ट्रेनमध्ये थोडावेळ येउन बसतो" (माझे स्वगत: वा रे पठ्ठ्या कसा नेमका भेटलास, आता रामरक्षा तुझी भुतांपासून रक्षा करील कदाचित, पण आमच्यापासून कदापि नव्हे. ही ही हा हा)
आम्ही पुढे बोलणार तेवढ्यात एक विचित्र प्रसंग घडला. एक ट्रेन आमच्या बाजूच्या पटरीवरून आम्हास क्रॉस झाली. आणि आम्हाला दिसले की एक लाल शर्टवाला माणूस त्या ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. (मग काय विशेष? असेल तिकडच्या ट्रेनमधील एखादा माणूस दरवाजात उभा.!! हे तुमचे स्वगत बरे का चाणाक्ष वाचकहो) तर यात विचित्र असे की ती बाजूची ट्रेन पूर्णपणे आम्हाला क्रॉस होईपर्यंत बाहेर फक्त तोच माणूस आणि तोच दरवाजा दिसत होता. आता पुढच्या ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या दारात तर एक माणूस लाल शर्ट घालून उभा नसणार ना? आणि असला तरी तो असा कंटीन्युअसली कसा दिसेल? आणि हे दृश्य फक्त आम्हीच नव्हे तर डब्यातल्या सर्व जणांनी पाहिले. डब्यात दोनचार मिनिटे एक चिडीचूप शांतता पसरली. "इतना सन्नाटा क्यों है भाई" असे म्हणून हा सन्नाटा तोडायचा या बेतात मी असतानाच जोरजोरात रामरक्षा चालू झाली. मी त्याला थांबविले पण तो थांबेना. सगळे लोक भेदरले आहेत हे स्पष्ट दिसत होते. मग विज्या बोलू लागला "अरे घाबरण्याचे काही कारण नाही लोकांनो. मी सांगतो काय झाले असणार. आपल्या ट्रेन एका वळणावर क्रॉस झाल्या असणार त्यामुळे त्या ट्रेनचे बहिर्वक्री आणि आपल्या ट्रेनचे अंतर्वक्री रुपात सामना झाला. त्यामुळे एक भिंग तयार झाले आणि एकच प्रतिमा या भिंगाच्या वक्रतेमुळे आपल्याला शेवटपर्यंत दिसली. एखाद्या चमच्याच्या नाही का बोट खोलगट भागासमोरून फिरवले तर त्याचे रिफ्लेक्शन बरोबर उलट्या दिशेने पुढे पुढे जाताना दिसते? असे सांगून विज्याने लोकांकडे कौतुकाच्या अपेक्षेने पाहीले पण याच्यापेक्षा तो रामरक्षेवालाच बरा अशीच लोकांची भावना दिसली. एकजण म्हणाला, अहो पूर्ण मुंबईपासून तर वलसाडपर्यंत ट्रेनच्या रस्त्यास एकही वळण नाही.काहीही सांगता काय? परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून मग अजून सायंटीफिक फंडा टाकावा म्हणून मी बोलू लागलो. वळण नसले तर नसू द्या हो पण तुम्हाला प्रकाशाचे डीफ्राक्शन हा प्रकार माहित आहे का? प्रकाश किरणांच्या मार्गात जेव्हा एखादा शार्प अडथळा येतो तेव्हा त्यांची दिशा बदलते. आता वेळ काय झालाय? १२ वाजून ३० मिनिटे. सूर्य नेमका मध्यावरून पश्चिमेला झुकलाय, त्यामुळे सूर्यकिरण तिरपे होऊन आले, आपल्या गाडीचा त्यांस अडथळा निर्माण झाला, प्रकाशाचे वक्रीकरण झाले आणि एकच प्रतिमा आपल्याला प्रकाशाच्या वक्रीकरणामुळे दिसली.
"उगीच काहीही फेकू नका हो." गाडीच्या उजव्या दरवाजाकडून आवाज आला. सगळ्यांनी दचकुन तिकडे पहिले तर तोच मघाशी बाजूच्या ट्रेनमध्ये दिसलेला लाल शर्टवाला माणूस डब्यात शिरत होता. भर दुपारीमुळे की काय कुणास ठाऊक पण डब्यातल्या प्रत्येकाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. प्रकाशाचे वक्रीकरण होऊन प्रकाश जेवढा वळतो त्यापेक्षा हजारपट अधिक माझी बोबडी वळली होती. रामरक्षा अतिशय वेगाने पण अत्यंत दबक्या आवाजात चालू झाली. लाल शर्टवाला पुढे येउन आमच्या सीटजवळ उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला (पिवळी होणे म्हणजे काय ते तुम्हाला काय माहित हो?)
मग तो म्हणाला, "काय राव मघापासून ऐकतोय तुम्ही काहीही बोलताय. अहो तो माणूस मीच होतो. आणि समोरच्या ट्रेनमध्ये नव्हे तर याच ट्रेनच्या दारात उभा होतो. ही जी ट्रेन क्रॉस झाली ना ती होती राजधानी एक्स्प्रेस. ती आहे संपूर्ण एसी गाडी.! त्यामुळे सगळ्या डब्यांना काळ्या काचा आहेत. त्याच काळ्या काचांवर मी आपल्या डब्याच्या दारात उभा असल्याने माझे रिफ्लेक्शन तुम्हाला ट्रेन संपूर्ण पास होईपर्यंत कंटीन्युअसली दिसले.
त्या दिवसापासून आजतागायत विज्या आणि मी कोणत्याही ट्रेनमध्ये कुणाशी काही बोललो नाहीये.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा