हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

चंद्र आणि शुक्र

तुझ्या चेहऱ्यावरचे स्मित
वाऱ्यात भुरभुरणाऱ्या एका बटेत गुंतेल
आणि उडून माखेल आकाशाच्या कॅनव्हासवर
..लोक म्हणतील चंद्रोदय झाला

तुझ्या चुकार आठवणींचे आभास
जेव्हा अनुभूतींतून हळूहळू
पुसून विरत जातील तेव्हा
एक अश्रू ओघळेल चंद्राच्या डोळ्यातून
..लोक त्याला शुक्र म्हणतील

मी त्या आदिम काळोखी अवकाशाशी
एक अनंतापर्यंतचा करार केला आहे...
की चंद्राचे स्मित नेहमी तुझे
..आणि शुक्राचा अश्रू नेहमी माझा


 
... 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा